Showing posts with label जाणीव. Show all posts
Showing posts with label जाणीव. Show all posts

Thursday, October 2, 2014

कातरवेळ

                    सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ . त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळात नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही . एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते ,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ . थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं…… 
                     प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा अनुभव सुधा असु शाकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं . निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले  तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत  हि भावनाही तितकीच तीव्र असते . तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल . 
 तर ……………. तर  ती मिसळली त्या रांगेत जणू  कधी ती दुरावलीच नवती अचनक त्यांचा एक भाग झाली होती . 
माणसाच हि असच काही होत असेल का .………? 
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण  नावाच फेरोमोन पेरत असेलच  न………?
 ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….?  
 ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .

 त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले  
कुठे दुरावलास तू ……………?  
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… ! 
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते  अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……! 
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….? 
 मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
 मला आठवण पडली होती त्याची शाळेतल्या त्या एकमेकाना लपून छपून पाहणाऱ्या प्रेमाची .शिकवणीच्या तासाला माझ्या काडे लापून छपून पाहण्याऱ्या त्या डोळ्यांची . शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ  करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान . आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस . सगळे आता चिडवु  लागले होते  काही गोष्टी घरी हि कळल्या होत्या . अल्लड वय म्हणून घरातल्यांचा  खूप आक्रोष हि सहन करावा लागला . अर्धवट शाळा कशी बंद करणार म्हणून दादा आता सोडायला आणायला येऊ लागला होता .मला काही त्रास होऊ नये आणि  आमचं अस वागण सगळ्यांच्या नजरेत येत आहे हे पाहून माझ्याकडे त्याने  बघण बोलण टाकल होत . फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढाच काळात होत . काही दिवस झाले मी आजारी होते म्हणून सुट्ट्या घेतल्या . वाटल एखादा तरी निरोप येईल मैत्रिणी कडे त्याचा पण तस काही झालं नवतं . उलट कळलं कि तो खूप आजारी आहे . नंतर बरं वाटल्यावर रोजनिशी सुरु झाली अजून अशक्त पणा होताच  पण दहावीच वर्ष त्यात परीक्षा जवळ आल्या मुळे शाळेत जाण गरजेच होत . तो दोन दिवस आलाच नाही . जीव कासावीस झाला खूप काळजी वाटू लागली . आणि तिसऱ्या दिवशी कंटाळत शाळेत गेले तर तो आला होता . पण खूप अशक्त . माझे डोळे पाणावले होते त्याला पाहून आणि त्याचे हि . मग नंतर नंतर आमच बोलणच व्हायचं नाही . असेच काही दिवस गेले आणि शाळेचा निरोप समारंभ जवळ आला . आम्ही खुश होतो . थोड बोलायला मिळेल पण आता परीक्षेसाठी सुट्ट्या मिळणार होत्या म्हणून थोड नाराज ही . आम्ही सगळे सजून निरोप समारंभां साठी आलो . थोड  बोलणं झाल मन शांत झाल . गाण्यांच्या भेंड्या खेळलो , खाऊ खाला , वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना .आज दादा आणायला येणार नवता कारण  मैत्रिणीनी घरी येउन मला न्यायचं आणि सोडायचं मान्य केलं होत . मी त्यांना सांगून थोडा वेळ त्याला भेटायला गेले त्या रोजच्या ठिकाणी  खूप रडले मी त्याला बिलगून आणि तो हि . आज आम्ही काही बोलोच  नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .थोडावेळ थांबून मी निघाले मैत्रिणी सोबत .नंतर काही दिवसानी परीक्षा हि सुरु झाल्या . दहावीचा अभ्यास म्हणून सगळे अभ्यासात मग्न झाले होते .काही दिवसांनी परीक्षा संपली . कसे बसे २ महिने गेले . आणि वेळ आली रिजटची . आम्ही सगळे जमलो एकत्र . वर्गात सगळे पास झाले होते . तो हि आणि मी हि . आम्ही खूप आनंदात होतो . शाळे नंतर आम्ही त्या तळया जवळ भेटलो . आमच्याकडे आजही बोलायला काही नवता फक्त रडून हाल झाले होते . त्याने मला सावरल 
डोळे पुसून मला शांत केलं .
 मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी … मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… पण मी येईन नक्की मला तुझ्या सोबत राहायचं आहे . …………. !
मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल . 

******************************

                            पण ……… पण ………… तो आलाच नाही .मी बरीच वर्ष वाट पहिली त्याची ……तो कुठेतरी दूर निघून गेला होता माझा विचार न करता . मला न सांगता . पण मग माझी हि काही कर्तव्य होती आणि मग माझ माझ्या आई वडिलांना लग्ना साठी नाही म्हणनं कठीण झाल होत .त्यांनी माझ लग्न लाऊन दिलं . स्वसोईने सुशिक्षित , श्रीमंत ,उच्च घराण सगळ्या सुखसोई सवाईने पडताळून दिल्या होत्या . मी खूप खुश आहे तो खूप छान आहे . एक व्यक्ती म्हणून , मित्र म्हणून , प्रियकर म्हणून आणि नवरा म्हणून हि . मला तो खूप खुश ठेवतो .पण आज तुझी आठवण आली . कारण कुठे तरी मी पोखरली गेलीये तुझ्या मुळे . तुझ्या वरच प्रेम मला या कातरवेळी सतत आठवत राहत आणि मला रीत करत जात . रोज दिवेलागणीच्या वेळी मला ओढ लागते ती त्या तळ्याकाठच्या भेटीची 
वाटतं……………वाटतं  आज हि तू माझी तिथेच वाट पाहत अशील  पण हा माझा निवळ गैर समाज आहे . पण आता मला भूतकाळात आणि वर्तमानकाळात गल्लत नाही करायची . माझा नवरा मला खूप जपतो त्याची पत्नी म्हणून मला खूप मान मिळतो . आणि त्याच्या बद्दल माझी हि काही कर्तव्य आहेत  . माला सगळ मागे ठेऊन त्याच्या सोबत पुढे जावच लागणार . आणि मला ते आवढेल . माझी करतवेळ जरी तुझ्या साठी चुकचुकली तरी  कधी ना कधी ती गोड आठवण होऊन माझ्या नवऱ्या साठी हि चुकचुकेल .
आता ………. आता या गोष्टीला पूर्ण विराम लावला पाहिजे . आणि मी ठामपणे तो डबा बंद केला . 


चैताली कदम 

Monday, September 15, 2014

मी आणि माझ करियर

                        

                       ट्रेन प्ल्याटफॉर्मवर लागली होती.ती धावत पळत गर्दीतून रस्ता काढत धक्के खात धडा धड शिड्या उतरत प्ल्याटफॉर्म वरआली आणि तितक्यातच ट्रेन सुटली .पण ऑफिसला उशीर झाल्या मुळे तिने रोज प्रमाणे धावत ट्रेन पकडली .
हुश ...SSSSS असा आवाज काढत दीर्घ श्वास घेतला .आत पाहिलं तर सगळ्या सीट्स फुल
 "आज शनिवार असून हि बसायला जागा नाही "स्वतःशीच ती पुटपुटली .
पलीकडच्या दाराजवळ उभी राहिली .हँड्सफ्री कानाला लाऊन रेडीओ वरची गाणी ऐकत बँगेतील पुस्तक काडून वाचू लागली.गाणी ऐकत पुस्तक वाचनं हि तिची जुनी सवय .परत तिने पुस्तक बंद केलं.आज कसल्या तरी विचारात होती ती .थोडी गाड्बडलेली .त्या पुस्तकाला कवटाळून डोळे मिठून शांत उभी राहिली ते तिचं स्टेशन येई पर्यंत.जनु ते पुस्तकाच्या कुशीत विसावली असावी .स्टेशन आलं तशी ती उतरीली बँगेत पुस्तक ठेवत .मोबाईल रेडीओचा आवाज वाढवला .इकडे तिकडे पाहत सगळं काहीं नव्याने अनुभवत ती ऑफिस पर्यंत पोहोचली तिची हि रोजची सवय रोज नवीन काहीतरी शोधायचं.आज शनिवार असूनही खूप काम होतं .पण तिने ते सहज निभावलं .जवळ जवळ ऑफिस सुटायची वेळ झाली. सगळ्या मैत्रिणी मिळून आज हॉटेल मध्ये पार्टी करणार होत्या .ती पार्टी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची होती .पार्टी इंजॉय केली .आणि परत आपल्या रस्त्याने घरी निघाली गड्बाडलेली ती परत आपल्या मूळ परिस्थितीत आली काही तरी बनण्याचं स्वप्न मनात घेऊन जगत असलेली ती .आज काचेसारखे स्वप्नाचे तुकडे हातात घेऊन जगात होती .चालता चालता तिची पाऊलं एकांतासाठी आपोआपच जवळच्या बागे कडे वळल.बागेत अगदी शांतता होती .सगळी कडे हिरवळ हवेतील गारवा .जागोजागी लावलेल्या दिव्यांनी बाग अगदी उजळून निघाली होती .ती बागेतील बेंच वर जाऊन बसली .


परत शांत अशी स्वतः मधेच अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती नुकतीच रुमालाने डोळे पुसू लागली .स्वतःशीच पुटपुटली मला तो  M.B.A. कोर्स करायचा होता .पण त्या पेक्षाहि  वाईट वाटल  ते बाबांच्या म्हणण्याचं बाबांनी कसला हि विचार न करता मला असं का म्हंटल माझं शिक्षण झाल्यावर मी भावंडाना सांभाळणार नवते का . M.B.A.ची विचार पूस करण्या खातर आम्ही इंस्टीटूट मध्ये गेलो .फी ऐकल्यावर बाबा त्यांना फक्त "हो आम्ही सांगतो तुम्हाला  नंतर "अस म्हणत बाहेर पडले .
मी बाबान कडे पाहिलं तर म्हणाले 
"कसं जमेल आपल्याला" मी म्हणाले "
"बाबा तुमचे ते सर्विस मिळालं ते वापरूयात का ?म्हणताच बाबा 
"नको तुला दिले तर मग माझ्या दोन मुलाचं काय मी ते पैसे फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवणार आहे
तुम्हा सगळ्यांच्या नावावर "
मला हे ऐकून खूप वाईट वाटलं ते पैसे माझ्या साठी खर्च करून मी माझ्या भावंडाना बघणार नवते का ते पुढच्या शिक्षणा साठी तयार होई पर्यंत मी चांगली कमावती झाले असते .आणि ठाम पणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली असते .हे का नाही कळलं बाबांना .असो त्या वेळी बाबांना जे पटल ते त्यांनी  केलं .मला जे पटत ते त्यांनी कराव अशी माझी अपेक्षा हि नवती . फक्त दुख झाल ते त्यांच्या बोलण्याच.आज मी एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कामाला आहे .माझ्या कुटुंबाला आणि माझ्या भावंडाना व्यवस्तीत सांभाळते आहे आणि ते दोघाही आज शिकून एका चांगल्या कंपनीत नोकरी करत आहेत .माझे कष्ट सार्थकी लागले याच विचाराने सुखावले आहे मी आज .आणि मन दाटून आले सकाळी हि याच विचारात होते मी. पण आज दुख होण्या पेक्षा अभिमान वाटतो आहे स्वतःचाच कि आपण इतक्या छान वडिलांच बाळ आहोत. कारण जरी त्यांनी मला ते पैसे त्या वेळी दिले नसले तरी कदाचित त्यांना माहित होता कि मी माझ आयुष  फक्त त्या कोर्सपुर्तच नाहीये . ते जर का नाही झाल तर मी नवीन पर्याय शोधेनच करियर साठी आणि  मी तो शोधलं हि.  माझ लग्न हि झाल . बाबांनी माझ लग्न लावताना कसलाही विचार न करता ते फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवलेले सगळे पैसे काढून माझ लग्न खूप धूम धाम मध्ये  केल अगदी माझ्या मनासारखं कसलीही उणीव न ठेवता .तेंव्हा मला कळलं बाबा तेंव्हा नाही का म्हणाले होते त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता कि मी काही तरी मार्ग काढेन किंव्हा नवीन पर्याय शोधेन करियर साठी आणि सगळ निट  करेन पण त्यांना ते पैसे माझ्या लग्नाला वापरायचे होते.त्यांच्या आयुष भाराची कमी त्यांनी माझ्या लग्ना साठी वापरली एकही पैसा न ठेवता. त्यातच सगळ आल किती मोठी आहेना हि भावना त्यात माझाच भवितव्य होत आणि त्यांना माहित होता कि मी माझ्या भवंडाना सोडून नाही राहू शकत. आणि अस घडल माझ करियर त्यातून मी कमावलं माझ्या वडिलांचा प्रेम त्यांच्या आयुष्य भाराची कमाई म्हणजे माझ धामधूम मध्ये झालेलं लग्न जे प्रत्येक बाबांचं स्वप्न असता

चैताली कदम 

Sunday, September 14, 2014

वेडा पाउस


वेडा पाउस चिंब भिजून गेला
नकळतच काही आठवणी देऊन गेला 
आठवणी एकत्र खेळलेल्या 
आठवणी एकत्र रुळलेल्या

कधी त्या दप्तरातून शाळेत गेलेल्या
शाळेच्या खिडकीतून पावसात भिजलेला
बाईंच्या खडूत ठळक उमठ्लेल्या
मित्रांच्या डब्यात पोठ भरून वाटलेल्या

मैदानाच्या मातीत धुंद दरवळलेल्या
कँटीनच्या खाउत मनसोक्त रमलेल्या
मधल्या सुट्टीत कल्लोळ मांडलेल्या
ऑफ तासात भेंड्या खेळलेल्या

कधी हसून टपली मारलेल्या
डोळे पुसून समजूत काढलेल्या
खिश्यातल्या चिंचा लपुन खालेल्या
गृहपाठाच्या वह्या उतरून काढलेल्या

शाबासकी मधून हवेत उढलेल्या
बाईंच्या आशीर्वादात प्रगती गाठलेल्या
रिझल्टच्या दिवशी धडधडून उठलेल्या
मित्रांच्या आठवणीत भरभरून जगलेल्या



                    चैताली कदम 

Tuesday, June 11, 2013

परी स्वप्नातली


थंडीच्या त्या धुक्यात मला शोधणारी ती 
मी दिसता क्षणी मला बिलगणारी ती 
धुंद पावसात चिंब भिजणारी ती 
सर होऊन भिजवणारी ती 

फुलांच्या गंधात दरवळणारी ती 
पाखरांच्या रंगात मिसळणारी ती 
इंद्रधनुषातील रंग उधळणारी ती 
दव होऊन चमकणारी ती 

रात्रीच रुपेरी चांदण ती 
पाण्यातील चंद्राच प्रतिबिंब ती 
वसंत ऋतूचा मोहक मोहर ती 
पालवीचा सुंदर बहर ती  

पावसातील हवेचा गारवा ती 
अंगावर येणारा शहर ती 
माझ्यातला मी पणा जपणारी ती 
तासान तास माझ्यात रुळणारी ती 

ती असावी परी माझ्या स्वप्नातली 
बेधुंद होऊन गाणारी 
मनसोक्त नाचणारी 
खळखळून हसणारी 
रिमझिम बरसणारी 

आणि मी 
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा 






चैताली कदम 


Thursday, March 28, 2013

आठवण येणार नाही


नं तुझे राहिले काही 
नं माझे राहिले
तुटले माझे हृदय होते 
पण पाणी डोळ्यातून वाहिले 

त्या क्षणाची आठवण म्हणून
कोवळीशी फुंकर घाल येउन
या तुटलेल्या हृदयाला हातात घे
आणि जाळ कुठेतरी  नेउन

म्हणजे तुझी आठवण येणार नाही


चैताली कदम 



Monday, November 12, 2012

दर्वळ


हंतरुणावर कोणाला तरी चाचपत ती उठली.बार्थ्रूम मध्ये बादली भरून धो......धो......वाहत होती.अंथरुणातच बसून पाठीवरचा सैल झालेला अंबाडा सोडून तिने परत घट्ट गुंडाळून बांधला.पाण्याचा आवाज ऐकून कपाळाला आट्या आणून तोंडातून "चक्क...."असा आवाज काढत ती बाजूला झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहू लागली.डाव्या बाजूला कोपऱ्यात तिची गोंडस निरागस मुलगी आणि उजव्या बाजूला ३मुलगे अशी ४ मुलं आहेत तिला.तरी सुद्धा देखणी,लांब काळ्या भोर केसांची होती. आपल्या मुलांकडे ती पाहत हसली.त्यातला सर्वात लहान मुलगा तिच्या कुशीतून गडबड लोळत तिच्या पाया पर्यंत पोहोचला होता.त्याला त्याच्या जागी निट ठेवत ती उठली.थंडीचे दिवस होते.त्यांच्या अंगावरची सरकलेली चादर तिने नीट केली.आणि सकाळची कामं आटपायला सुरवात केली.साडीच्या निऱ्या खोचत वाहून चालेली बादली सरकवून दुसरी बादली नळाला लावली.कामं आटपून अंघोळी नंतर तयार होऊन चहा घ्यावा म्हणून कंटाळलेल्या अवस्थेत ती किचन जवळ गेली.खोली तशी छोटीच होती.मुलांच्या शिक्षणा खातर मुंबईत येवून राहिलेली हि जनी. आधी कुठल्या तरी पडक्या चाळीत राहत होती.चाळ मोडीत गेल्या मुळे मुलांच्या हट्टा खातर एका ५ मजली इमारतीत दुसऱ्या माळ्यावर भाड्याने राहत आहे.जनीला स्वच्छता फार प्रिय.तिच घर नेहमी स्वच्छ आणि घरात मोगऱ्याचा एक मंद सुहास दर्वळत असे.बरीच वर्ष मुंबईत राहिल्या मुळे तुटक-मुटक इंग्रजी शब्द येत होते.पण भाषेवर काही प्रभुत्व मिळवता आल नाही अजूनही.किती झालं तरी माणूस आपली बोलण्याची पद्धत नाही बदलू शकत.हे तिच्या आणि तिच्या मुलांच्या भाषेतून बोलण्यातून जाणवत असे.पण तिची मुलं या भाषेचा उपयोग जनिशीच करत असत शाळेतील किंव्हा इतर लोकांशी व्यवस्तीत अशी मराठी शुद्ध भाषा वापरात असत.काही वर्षां आधीच तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना निराधार आणि पोरखं करून गेला.तेव्हा पासून जनीच मुलांची आई आणि बाबा झाली.राब राब राबून धुनी भाडी करून मुलांना वाढवू लागली.

जनी :- "हुश...!!........आई ......आई गं !......." लई पाठ दुखू लागलीया.कामाला जातानि मेडिकल मधून दवा घीन " 

ती स्वतःशीच पुटपुटली.चहा साठी ठेवलेल्या पाण्यात चहा पावडर टाकून साखरेचा डबा उघडला तर रिकामी.कमरेकडे खोचून ठेवलेली चिल्लर मोजू लागली नेमके पाचच रुपये होते.आता तिला हायसं वाटू लागलं 

"रव्या ?........ए...!...रव्या?  बघ की रं.....साखर संपलिया ! 
आंतूस का जरा दुकानातून?कामाला जायचं हाय!" 

ए ....पोर...!..ऐकतूस का रं ! 
"उठकी बाबा बग कि दिस उजाडला बी!कवा पतुर असं गडबाड लोळणार हाईस "

रवी:- "ए आय..!....नग ना गं तरास दिवूस. झोपुदे कि ग मला........."
रव्या आता जाणार नाही हे तिला कळालं.

तिने अगदी चेहेरा गरीब करून तिच्या मुलीला हाक मारली .
"मुग्धे जा कि ग माय तू तरी......."लई तलप लागलिया बग "ए! मुग्धे............."

मुग्धे :- "अं! ............."ए आय !एक दिस जा की अशीच.मला कटाळा आलाय गं !.....लई झोप आली बग "

आता मात्र जनीने तोंड वाईट केलं.कोणी उठायला तयारचं नवतं.आगीने चहा उकळून अर्धवट झालेलं पाणी तिने कस कस गिळल...........आणि निघाली कामाला.लांब सडक केस अगदी घट्ट गुंडाळून बांधलेले.बोट भर टिकली लावलेली थोडी गोरी मघ्यम बांद्याची काटकिळी.साडी एका बाजूने खोचून पदरही कमरेला खोचला होता.पायाला अपुरी पडणारी दोन ठिकाणी शिवलेली ती चप्पल रेमटवट ती चालत राहिली .मधेच तिचं लक्ष एका मेडिकल कडे गेलं.हातातली ती ५ रुपयांची चिल्लर पाहून ती म्हणाली .
"मयो..!....बर झालं साखर न्हाई आणली ते.दवा कशी घीणार व्हती म्या .!...........पण माझी लेकरं.?..ती तरी बिन साखरेचा चहा कसा पिणार हाईत. ताई कड मागते थोड पैस."
जनी मन मिळवू असल्याने ज्या घरी काम करायची त्यांना ताई म्हणून हाक मारत असे.मेडिकल जवळ जावून ती नुसतीच उभी राहिली खूप गर्दी होती.मेडिकल मधल्या मुलाने विचारलं 
"काय पाहिजे मावशी..........."

जनी:-"अंग फार दुखायल रे लेकरा कोणती तरी गोळी दि कि !.........जरा बर वाटन अशी....."

त्याने आतून एखादी पेनकिलर दिली असेल बहुतेक आणि ती हसून गोळी घेत तिथून निघाली . न थांबता चालत चालत कामात पोहोचली.शिड्या चढून दम टाकत दारावरची बेल वाजवली.एक १२/१३ वर्षाची चिमुकली दार उघडत जनीला आत घेत म्हणाली .

"काय झालं मावशी ? एवढ्या जोरात श्वास का घेताय? दम का लागला तुम्हांला  ?" 

जनी:-"काय नाय गं माय उशीर झाला म्हणून पटापटा शिड्या चढून आलेना.
"पण चिऊ घरी कशी आज तू सुट्टी हाय व्हय !"

चिऊ :- "हो......मावशी आज दसरा आहे न. विसरलात कि काय ? "
"बर थांबा तुम्ही बसा जरा.मी पाणी आणते तुमच्या साठी.फार लांबून येता न तुम्ही ? "

जनी :- (तिच्या कडे २ मिनिट बघून  विचार करू लागली चिऊ पाणी आनते म्हणली आणि मला सकाळची आठवण झाली.माई लेकरं मया साठी साखर आणून देवू नाही शकत.पण हि जिच्या घरी मी मोलकरीण आहे ती माझं दुखं जाणून पाणी आणत होती.

"नगं म्या घेती आपसूकच ........तुला नगं तरास बळे माझ्या मुळ."

कमरेचा पदर काढून तोंड पुसत म्हणाली 


पुढे जाता जाता पुटपुटली," आज दसरा हाय म्हणून आपली पोर अशी आबड धोबड लोळत व्हती आणि काल मुग्धी माझ्या ब्लाउज ला हात शिलाई मारीत व्हती.आज घालायची आसन तिला मई साडी."

डोक्याला हात लावत ती म्हणली "मयो सनसूद बी कळत न्हाई मला . अशी कशी इसरले म्या दसरा "कामाच्या आणि घरातल्या दगदगीत संन बी इसरले म्या !"

बोलता बोलता  किचन कडे वळली "ताई म्या आले बर का !" 
"आज काय बनवायचं जेवणला?"

ताई :"आज आपण पुरण पोळी बनवूया.पण त्या आधी जरा चहा नाश्ता बनवून सगळ्यांना दे आणि स्वतः पण घे कामात वेळ कसा जाईल कळणार नाही."

जनी चहा नाश्ता घेऊन चिऊच्या आजी कडे गेली "आजी ! ओ आजी! चाय आणली बगा . दार उघडतान का आज तुम्ही? " जनी हसऱ्या स्वरात म्हणाली 

"जनी !बाळा थांब गं! आलेच मी"आजीनि बेडरूमचा दरवाजा उघडला जनी ने ते ताट टेबलावर ठेवलं आणि निघाली 

आजी :-(आजी तिच्या कडे पाहू लागल्या )"जनी तबेत ठीक नाही का गं तुझी "  
जनी :-"न्हाही आजी म्या ठीक हाय "
आजी :- "नाही ग तोंड अगदी उतरलं आहे.बस बघू माझ्या जवळ "
जनी :- "नाही आजी काम पडल्याती. म्या जाते (नजर चोरत ती म्हणली तिला ठाऊक होतं आजी काळजाला हात घालतील आणि तसाच झालं )
जनी :- "न्हाई आजी मई पाठ अगदी भरून आल्यागत झालय बगा पण....पण म्या दवा खाल्ली हाय . तस आता जरा बर वाटू लागलं "
आजी :- "अग एवढी ३/४ कामं कशाला करतेस लागोपाठ शरीराला थोडा आराम मिळाला पाहिजे "
जनी :- "व्हय आजी आता कोण हाय करायला.संध मालच करायला लागतं.घरी बी आणि बाहेर बी कुठं कुठं लक्ष द्यायचं.तशी माई पोरगी करते घरचं काम पण तिला बी शाळेत जायचं असतना तरी बी ती जमन तीवढ काम करती "
आजी :-"किती मुलं तुला "
जनी :- "चार हाईत पण चारी बी चार परीची हाईत बगा....एक मुलगी तीन मुलगे 
"ठिवून गेलाय त्यो मया साठी माग.मला बी घेऊन गेला असता तर बर झालं असतं "
आजी :- "अगं ..!अस का बोलतेस "
जनी :- "व्हय आजी म्या खरच बोलती पार थकून गेलीया पोरात "जाउद्या म्या जाते मला काम करायची हाईत येते म्या . तुम्ही खावून घ्या पटा पटा  "
आजी :-"बर ठीक आहे पण काळजी घे "
जनी :-"व्हय! व्हय!...." म्हणत ती आजीच्या खोलीतून बाहेर पडली 
चहा नाश्ता सगळ्यांना देऊन उरले-सूरलेला स्वतः केला.आता जरा पोटाला बऱ्या पैकी आधार झाला होता.मग तिने खोचून ठेवलेली ती गोळी घेतली .
जनी ने जेवणाची सगळी कामं आटपली पण पुरणपोळी करताना तिचे डोळे भरून आले.तिच्या नवऱ्याला पुरणपोळ्या खूप आवडत.त्याच्या आठवणीने तीच मन जरा मावळालं होत. पण आपलं दुख कोणाला कळू नये म्हणून ती वरवर हसतचं होती.ते आटपून आता कपडे भांडी करण्यासाठी निघाली ते आवरे पर्यंत दुपारचे २ वाजले होते.सकाळच्या ९ चा नाश्ता होऊन बराच वेळ झाला होता. आता मात्र पोटात कावरी भरून जनी भुकेने आतुर झाली.कामं आटपली होती.पदराने हात पुसत
 "ताई !......ताई !.....निघाले म्या" 
"थांब जरा जनी...."डब्याच झाकण लावत त्या तिच्या जवळ आल्या "हे.. घे...घेवून जा तुझ्या मुलां साठी "आणि हे घे (हातात ५०० रुपयांची नोट टेकवत म्हणाल्या ) बराच वेळ झाला नं जेवणा मुळे "
जनी ने हसत तो डबा पिशवीत टाकला आणि "चला निघते "म्हणून निघाली .आज ती थेट घरी जाणार होती . बाकीच्या कामावरून सुट्टी मिळाली होती.थकलेल्या अवस्थेत ती इकडे तिकडे पाहत चालत राहिली ते घर येई पर्यंत.धापा टाकत दोन माळे चढून दार उघडून आत आली तर घरात पसारा पुढ्यात मुलगा गडबड लोळत अजून हंतरुणात पडला होता.मुलगी किचन जवळ काही तरी खटपट करत होती.आणि लहान दोघं दंगा करून.त्या झोपलेल्या भावाला अजून का नाही उठत म्हणून त्रास देत होती.
"रव्या! ए रव्या !" अजून लोळतोस व्हय " उठ की रं आता. बग की साडे तीन झाले " हातातली पिशवी पुढ्यात आलेल्या मुलांच्या हातात दिली "घी खा थोडं थोडं ताईनं पुरणपोळ्या दिल्या हाईत "लहान मुलाने हसत हातातली पिशवी उघडत एक घास तोडला.

जनी :-"माय पाणी दितीस का गं "
आपल्या मुलीला ती म्हणत भिंतीला टेकून बसली 

मुग्धा :-"ए आय घी कि काम करायले म्या "

जनी :-(रागाने)"लई चालावं लागतं.आल्यावर हातात पाण्याचा गलास पण दिऊ शकत नाही का दिस भराचा तुम्ही.फकस्त खायचं तीवढ कसं जमतंय तुम्हासनी "

मोठा मुलगा तिची बडबड ऐकून बिछान्यातून उठून बार्थरूम कडे वळला.पण पसारा तसाच ती चिडलेली पण काही न बोलता निमूट पणे हंतरुणाची घडी घालत स्वतःशीच पुटपुटली.तितक्यात लहान मुलगा येवून तिला बिलगला
"ए आय आपल्याला बी कर ना गं पुरणपोळी लई खावीशी वाटायली"
जनी:-"व्हय रं लेकरा करती म्या.तस पण आज दसरा हाय ना मग करू कि 
"रव्या ! रव्या ! जा जरा भाऊला घिऊन बाजारात आणि गूळ घिऊन ये "

रवी :-" म्या न्हाही जाणार.आताच उठलोय लगीच कुठं जाऊ "आणि लहान भावाला टपली मारत "पुरणपोळी खायची म्हनतुय ढवाळं लागल्यात का?"अस काहीस पुटपुटला 

जनी:-"अय! काय मारतूस त्याला.राहुदी कि एवढ्या आवडीन मागायल पोर "

रवी:-"मग पाठव कि त्याया  बा ला "

जनी :- (हात उगारून त्याच्या कड दोन पावल टाकत म्हणाली ) "कोणाचा बा काढतुस रं तुआ न्हाई का त्यो "

रवी :-(जनीचा हात धरत तिला हिसकावत तो म्हणाला) "अय म्हतरे का म्हुण माराया लागलीस सामान अंतू म्हणतोय नं "
जनी खाली कोसळली आणि रडू लागली तिची मुलं तिच्या भोवती गोळा झाली कोणी डोळे पुसत होतं कोणी केसांवरून हात फिरवत होतं.कोणी बिलगून नुकतच रडत होतं .

जनी :- "आपल्या बा वाणीच निघालास मुडद्या !"पण एवडं खर त्यो असता तर असं दारोदरी भटकाया नसतं लागलं मला "
(त्याच्या कडे हात दाखवत )ह्या भाडखाऊ च्या अश्या शिव्या आणि मार नसता खावा लागला मला "त्यो बी मारायचा.पण जवळ बी घ्यायचा .लई मार खालाय म्या त्याचा.भाऊच्या वेळी गरवार असतानी मला खूप मारलं व्हत त्यांन.मला चांगलच आठवतय.घरात लय भांडण झाल व्हतं तव्हा.तुया बा लई दारू पिऊन अला व्हता.कुणाशी तरी झगडे बी जाले व्हतं . इवढा उशीर का केलात म्हणले तर रागारागात दोन थोबाडीत मारून लात मारून खाली पाडलं आणि डाव्या बाजूला पोटात घपदिशी चाकू घुसवला .म्या खूप कळवले काही सुचेच ना हाताला रगत आणि डोळ्याला पाणी.संध अंग सुन्न झालं व्हतं आणि म्या बेसुध झाले डोळे उघडले ते दवाखान्यातचं.मला झाग आली तर हा माया वाजूला बसलेला जणू ह्याला माई लई काळजी.त्याच्या डोळ्यात माझ्या साठीच पिरेम मला अगदी येगळी असल्याची जाणीव करून द्यायचं.पण अस व्हतं तर मारलं कशाला.माझं नशीब म्हणून तो चाकू टीचभर आत गेला.माझ्या भाऊला काही नाही झालं. मार बी तेवडाचं आणि पिरेम बी  तेवडाचं
"भिंतीला टेकून गुढग्यावर डोक टेकत ती म्हणली.आणि मुलं एखादी गोष्ट सांगतात तशी आ करून ऐकत होती.

रव्या :-(भिंतीला टेकून उभा होता )"झालं का कीर्तन गाऊन.अय बये! दि कि पैक उगा टाइमं खोटी नग करू.दि आता लवकर "

जनी :-(रागारागात कंबरेला खोचलेले पैसे काढत फेकत म्हणाली ) "धर ऐ मुडद्या घी घी "

रवी :-(हसत)"मयो ! पगार झाला वाटतं म्हतारीचा पैक वाली झाली "दि कि ग मला बी थोड पैक
तो निर्लजा सारखा हसत म्हणाला जणू काही झालंच नाही.आपल्या आईला इतका त्रास झाला ती रडली याचा त्याच्या चेहेरऱ्यावर काहीही परिणाम दिसत नवता.

जनी :-"हाय का लाज मुडद्या.भाजून खाल्ली का लाज तव्यावर"तरी बी हसतंय कस बेन "
रागाने बाजुची चप्पल फेकून मारत ती म्हणाली "सांग त्याला डाळ आणि गुळ आणाया" 

तो हसतं टिंगल करत चपल्ल घालत निघून गेला.मग ती त्या मुलांना जवळ घेत डोळे पुसत गप्प करू लागली "जा काही तरी आन खायला भूक लागली आसन पोरांना.काई खाल्ल व्हतं का ?"

मुग्धा :- "न्हाई आय कुनी बी काय बी खाल्लं न्हाई.हे दोघ आताच थोड्या येळा आधी उठलेत. आंगोळी झाली पण खानंपाणी काय बी नाही.आज सुट्टी हाय ना "आणि त्यो गड बड लोळत पडला व्हता. कवा पासून हाका मारायले म्या.पण जरा सुधिक हल्ला न्हाई "

तिच्या गालावर हात फिरवून म्हणली "जावूदी तू जाय काही तरी आन जेवायला.मला बी भूक लागली "आता मुग्धाला हि कळाल आपल्या आईला भूक लागली.पण ती एवढी शी पोर तिला काय आणि कितपत येत असेल जेवण.कसंबसं तिने आपल्याला जमणारा डाळ भात आणि बटाट्याची भाजी तेवढी केली होती. तिघांनी हि जेवून घेतलं आणि एका जुन्या कामात बक्षीस म्हणून मिळाली खोपट्यात ठेवलेली ती टीव्ही लावली आणि जे दिसेल ते मुकाट पने पाहू लागले.तेवढ्यात खालून हाक ऐकू आली भाऊ !ऐ भाऊ! आणि भाऊ खिडकी पाशी येवून उभा राहिला खाली पाहिलं तर रवी सामान घेऊन उभा होता भाऊ वरून खिडकीतूनच ओरडला "काय दादा" 
रवी :-"खाली ई लवकर माया हातातलं समान घिवून जाय."

भाऊ :-"वर ई दादा आई बोलवती"

रवी :-"न्हाई तुचं ई मी भाईर जातुय "

तितक्यात जनी भाऊच्या मागे खिडकीत आली.
जनी :- "आरं रेड्या वरी ई कि ! "कवाचा आरडायलं लेकरु.तरी बी समजत न्हाई का?"

                 आता रवी चिडून धावत वर आला पण तो खूप चिडलेला असल्याने घरात येताच जनी कडे पाहत हातातलं तिला शिवी घातली समान आणि पैसे फेकले सामानाची पिशवी भिंतीला जावून आदळली सर्व डाळ आणि गुळ घर भर पसरलं.आता मात्र जनी खूप चिडली होती.ती धावत त्याच्या कडे गेली.त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला रागाने गदागदा हलवत विचारू लागली
"इवडा राग इयाला रेड्या तुला.लई मोठा झालास व्हय रं ! माज आलाय तुला.पैक गेलना पाण्यात आता कुठून आणू म्या.कस करून घालू मया पोरांना " आणि तिने रागात त्याच्या गालावर एक चापट ओढली.त्या मुळे तो आणखी चिडला आणि कॉलर वरचा तिचा हात झटकत तिला हिसकावलं आणि शिव्या देत तिच्या पाठीत जोरात फटका मारला  "मला मारतीस"  
जनी ला काही सुचेच ना.आपल्या मुलाने आपल्यावर हात उघरला.या झटक्याने ती कळवळत रडत तिथेच पडून राहिली.तो तावातावाने तिथून निघून गेला.आता सगळं शांत झालं.दमल्या मुळे डोळ्यातून ओघळणार पाणी सुखायच्या आतंच ती झोपून गेली होती.तोड्या वेळाने हळू हळू डोळे लुकलुकत ती उठली घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे पाच संव्हा पाच झाले होते.घर अगदी स्वच्छ लखलखीत चमकत होतं.मुलं बाहेर खेळायला गेली होती.शांतता पसरलेली तिची मुलगी मुग्धा तिच्या जवळ आली तिला माहित होतं आईच्या डोळ्यालं पाणी काठावरच आहे.मी काही बोलले तर आई खूप रडेल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "जा तोंड धुवून घी म्या चाय दिती तुला " 

                  थोडं झोपल्यामुळे आता जनीला तसं बंर वाटत होतं भिंतीचा आधार घेत ती उठली तोंड हातपाय धुवून बाहेर येवून बसली."चहा हाय का ?"
मुग्धा :- "हाय आय" 
जनी :-"साखर आणायची आसन ना?"
मुग्धा :-न्हाई म्या माझ्या साठवलेल्या पैशान आणली कि साकार सकाळी "
चहा पिता पिताच तीने आशेने विचारलं "डाळ आन गुळ कुठंय गं " त्यावर खांद्यावर हात ठेवत मुग्धा म्हणाली "मी पसारा आवरून ठीवलाय डाळ बी साफ करून ठिवली आणि गुळ बी तसाच हाय फकस्त दोन तुकडं झाल्यात" जनीला हायसं वाटलं आणि ती मनापासून हसली चहा झाल्यावर कप उचलत ती म्हणली "चला बाई पुरणपोळ्या करायच्या हाईत डाळ शिजवायची हाय.तुया बा ला लई आवडायच्या पुरणपोळ्या.मला परतेक सनाला कराया लावायचा अन आवडीन खायचा .पुरणपोळ्या म्हनलं ना कि त्याई आठवण व्हती मला.सकाळी बी आली त्याई आठवण आन डोळ भरलं पर कामात कस बस रडू आटपलं.कुणाला सांगू म्या दुख.ह्यो लेक तर हयो असा.जावुदि उगा कशाला तरस करून घिऊ.आता कामाला लागते." तिने सगळं विसरून खुप आवडीने पुरणपोळ्या बनवायला सुरवात केली.पुरणपोळी होता होता मुलं हि घरी परतली होती. 
"मला दि ना ग पुरणपोळी "म्हणत तिच्या भोवती घोळका घालून बसली. 
"थांबा पोरानो जरा.आधी हात पाय धुवून घ्या बगु .तोवर म्या देवाला निवद दावती अन मग खायला बसा सगळे "



सगळं आवरून तिने घरातला केर-कचरा काढून हात पाय धुतले. देवाला नैवद्याच ताट पुढ्यात ठेऊन साकडं घालू लागली "देवा माझ्या घरात सुख शांती नांदू दे.का अस दारोदरी भटक्या लावतूस." 
तीतक्यात शेजारच्या मुली नट्टा-पट्टा करून दसऱ्याच सोन द्यायला आल्या 
"काकू!काकू!"सोन घ्या " करत तिच्या हातात अपट्याची पान कोंबत तिच्या पाया पडू लागल्या 
"बस ! बस ! नगा मया पाया पडू .राहुदि खूप शिका आणि मोठ्या व्हा "वाकत असलेल्या प्रत्येक पोरीला ती म्हणत होती.मुलांना हा सन खूप आवत असावा.या आपट्याच्या पानांचा सोनं म्हणून वाटप म्हणजे गंमत वाटत असावी.हातात आपट्याची पानं टेकवत पायाला हात लावत हा गंमतीशीर प्रोग्राम चालत असे सगळ्यांचे कैतुकाचे बोल ऐकून मुलं खुश होत असत आणि मुली हि "छान दिसतेस"असं म्हणतातच मुलीच्या गालावारीची कळी खुलत असे.अशा रीतीने हि मुलं मोठ्यांचा आशीर्वाद आणि मज्या करत असत. 

"मुग्धा ! तू का नाही तयार झालीस अजून"चाल लवकर तयार हो " तिच्या मैत्रिणी तिला आग्रह करू लागल्या 
"बर ! तुम्ही व्हा पुढे मी येते तयारी करून " मुग्धा ने आधीच आईची पेटीतील साडी काढून ब्लाउजला टाके मारून आपल्या मापाचा करून ठेवला होता.सगळी तयारी करून ठेवली होती पण भांडणा मुले तशीच राहून गेली. 

जनी:-"मुग्धे ! जा कि ग ! म्हणलीस न त्यांना मग व्हय कि तयर आणि जाय त्यांच्या बरोबर " काढ पेटी म्या काढून दिती साडी तुला " 

मुग्धा :-"नग आई म्या काढून ठिवली हाय पर मला न्हाई जायचं आता.राहुदी "

जनी :-(तिला पोटाशी कवटाळून म्हणाली ) "जा बाळे म्या निसवती साडी तुला तू नग मन नाराज करूस जाय बिगी बिगी " 

आणि मुग्धा तिथून निघून गेली.फ्रेश होऊन "आय मला हि साडी निसव " म्हणत आतल्या खोलीतली साडी आणून तिने जनीच्या हातात दिली.आणि काही तरी आणायला म्हणून आत गेली .हातातली ती साडी पाहून क्षणभर ती स्थिरावली आणि डोळे भरून आले.पण तिने ते पाणी डोळ्यातच सुखु दिलं . तितक्यात मुग्धा आली

"आई ! आई ! नेसवतेस ना साडी " 
"हो गं ! निसवती बाय "
तिला साडी नेसवून तिचे केस विंचरून दिले.मुग्धा नटूनथटून आईला दाखवायला आली 
आई!...बघ....
"मयो छान दिसायलीस गं !"असं म्हणत तिच्या कानामागे जनीने काळ तिठ लावलं 
"तुया बा असताना आता तर डोळ भरून पाहिलं असतं त्यानं.कशी गोजिरवाणी दिसायली माझी मुग्धा म्हणत डोळ पाणावल असतं आता पतूर त्याच "आणि जनीचे डोळे पाणावले 

तिच्या मैत्रिणीनी तिला हाक मारली "मुग्धा ! झाली का तयारी तुझी.बाहेर जायचं आहे चलं " 
आय ! म्या जाती ग! मला पैस दि ना.आम्ही फोटू काढाया जाणार हाईत"जनी कमरेला खोचलेले पैसे चाचपत म्हणाली "मगाशी राव्यान रागान फेकलेल पैस कुठ ठीवलास"
"हा त्या गलासा खालीच ठीवलत बग " जनीने फळी वरचं ग्लास उचलून पाहिलं तर ५५ रुपये होते त्यातले ५०रुपये काढत तिच्या हातावर टेकवले
 "लवकर घरी ई बाई.इथ तिथ उंडगु नगं " म्हणत ५ रुपये तिने कमरे जवळ खोचले.
मुग्धा मान डोलवत हसत साडी चाचपत तिथून निघून गेली.
आता घरी कोणी नवत सारं काही शांत चाळीतीली मुलं जिकडे तिकडे आपट्याची पान वाटायला फरार झाली होती.आता मात्र जनी शांत झाली.घरात कोणीही नवतं बाजूच्या घरातल्या गाण्याचा मंद आवाज फक्त ती आणि देवा पुढे लावलेल्या त्या उदबत्तीचा दर्वळ अगदी कोना कोनात पसरला होता जनी त्या भिंतीला टेकून शांत बसली होती.तिच्या नवऱ्याच्या फोटो कडे एकटक पाहत राहिली . आज तिला बहुतेक त्याची जास्तच आठवण येत होती.
*******************************
"जने म्या जातुय गं!जरा उशिरानच ईन.काम हाय फोन बिन नग करूस "
"आव पण आता रातीचं १० वाजल्याती.आता कंच काम हाय "
"अग नग पाटी कटकट लाउस चल म्या निगालो "म्हणत तिचा नवरा घराच्या बाहेर पडला.मुलांच आणि स्वतःच जेवण आटपून साफसफाई करून दमल्या मुळे हंतरुणावर पडताच तिला छान झोप लागली.सकाळी सकाळी धाड धाड कोणी तरी दरवाजा वाजवू लागलं तशी ती तडफडत जागी झाली मुलं हि जागी झाली आणि चिडून जनी म्हणाली "आला असन दारू पिऊन "उठून तिने दार उघडलं चाळीत बाहेच्या टोकावर दुकाना जवळ राहणारी दोन मुलं घाबरून धापा टाकत उभी होती.
जनी घाबरली काय झालं त्यावर ती मुलं फक्त "दुकाना जवळ मामा !मामा ! मामला" म्हणत अडकली जनीला वाटलं भांडण झालं तिच्या नवऱ्याच कोणाबरोबर ती मोकाट धावत सुटली थेट दुकाना जवळ तिच्या पाठी तिची मुलं पण.कसलीही हि चिंता न करत काही लागेल याच भानच नाही राहिलं तिला. दुकाना जवळ खूप गर्दी होती.ती बाजूला सारत पाहते तर तिचा नवरा चाकूचे सपा साप वर होऊन रक्त बंबाळ होऊन पडलेला.त्याच्या जवळ जावून त्याच डोक मांडीवर घेत ती "ओ !ओ! काय झालं तुम्हांला काय झालं " डॉक्टरला बोलवणा कुणी बोलावना डॉक्टरला "म्हणत ती घाबरत ओक्साबोक्शी रडू लागली.गर्दीत उभा असलेल्या एका इसमाने त्याचा हात हातात घेतला.त्याची नाडी तपासू लागला.त्याच्या हृदयावर हात ठेवत कान ठेवत त्याचे ठोके ऐकू लागला.नंतर तिच्या कडे पाहत नकाराआर्थक मान डोलवत तो उठला.ती आणखी घाबरली "ओ !ओ !उठाना उठाना " रडणाऱ्या आपल्या मुलांकडे पाहत "रव्या !ए रव्या! बग कि उठाव कि तुया बा ला.मुग्धे ! ए मुग्धे !मार कि हाक तुया बा ला" म्हणत ति भानावर आली तर मगाशी भिंतीला टेकून बसलेली ती तशीच होती.तिच्या डोळ्यातून अपोआप पाणी ओघळू लागले.
तुया या दोस्ती खातत्यानं माय संध आयुष्याच बदलून टाकलं.मित्र मित्र करून ज्यायला जवळ किलस त्यानंच तुया पाठीत चाकू घुसावंला.म्या किती सांगत व्हते.नग जाऊ बाहीर हि अशी भाई गिरीची काम नग.जीव घाबरून मला कस कस वाटत व्हतं.पर तुया पुढ काय म्हणलं तर.....तर.....तू मला परत भांडशील आन मारशील म्हणून काय बी बोले नाय.पण इवढ काय झालं व्हतं ते तुया मित्रांनी मारकरी करून तुला मराया लावलं .फकस्त इवढ कळलं मारामारीत तुझ हे असं झालं पण न्हाई तुया वरच्या जळनुकीवरून अन तुझ्या हातात सतत नांदणाऱ्या लकशिमीन तुया जीव घेतला.त्यादिवशी तुया बद्दल सांगत आलेल्या मुलां मूळ तुला बगाया धावत आले तर तू चाकूचं सपासप वार व्हवून रक्त बंबाळ जीमिनीवर आस्था व्यस्थ पडलेला.अन माझ्या अंगातला जीवाचं निघून गेला.तुला असं बगून म्या घाबरले. किती वूठावलं तुला.तरीबी उठ्नास.तुला कशी काळजी वाटली न्हाई आमची .हि अशी ह्याची त्याची रूम विकून ,दलाली मिळवून,भाईगिरी करून ,ऊरा पोटाशी चाकू सुऱ्या मिरवून काय भलं व्हणार व्हतं तूअ.शेवटी केला ना घात तुया मित्रांनी तुआ. हातात पैसा व्हता तर तुये मित्र तुया बरोबर फिरायचे पण मनात डाग ठीऊन.तुला ते कदी बी कळलं न्हाई.तुला दारू पाजून मैत्री खात्यात उशिरा पतुर थांबून केला घात तुआ.अलगत तुआ काटा काढला आणि टाकून दिलं तुला त्या दुकाना पाशी.किती तडपडला आशीन.किती तरास झाला आसन तुला.सकाळी तू मेला समजल्यावर परत दुकाना जवळ येऊन काय म्हाहीत न्हाई असा आव आणत माझी माज्या बघत उभ अस्तीन त्या लोकांच्या गर्दीतच.तुला मेलेला बगितल असन अन खुश झाली  असतीन संधी .पण त्या गर्दीतला नक्की कोणता चेहेरा खोटा व्हता कसं कळणार व्हतं मला.तुया मरणा नंतर धुमाकुळच घातला या लोकांनी.पेपरात काय छापलं तुया खुना बद्दल .मोठमोठ्या सबा काय भरावल्या.इतकाच काय खोट्या आधारच नाटक बी केलं.अन दुसऱ्या दिवशी हजर झाले कर्जाचा मोर्चा घिऊन.अन ते बी गोड बोलून.पर तुई ती हिशेबाची वही माया कमी आली.मला ठाव व्हतं.तुआ जो बी काय यवहार हाय त्यो संधा ह्यात हाय मग काय खोल्ली वई अन धरलं एकेकाला काट्यावर.कुणाच बी कर्ज नवतं .अन व्हत ते बी तू फिडलं व्हतस त्यायंच्या सह्या बी घीतल्या व्हत्यात.म्हणून कोणाची भिशाद झाली न्हाई वर तोंड करून बोलायची.तू लिहून ठीवल्या परमाने दोन घर आन काही पैक ब्यांकित मिळालं.पर तू असतास तर यायला आणखी शोभा आली असती.पण तू गेलास अन सगळ्याचा इस्कोट झाला.
"का सोडून गेलास मला एकटीला.किती एकटं वाटू लागलं मला ठावं हाय तुला.लोक कश्या कश्या नजरेने बगतात मया कड.तू व्हतास तर मला नजर वर करून बी पाहिलं नाही.लई घान वाटते त्यांच्या नजरांची मला.आज दसरा तुया आवडीचा सन पण तू न्हाईस दर दसऱ्याला पुरण पोळ्या करून घालाया लावायचास.आपली पोर बी कशी वागतात माया बरोबर कोणीच नाही माय दुक ऐकाया कुणी बी नाय.फकस्त तुच व्हतास पण तू बी मला असं मधीच सोडून गेलास.मला मारायचास पण जवळ बी करायचास.मला काय हव नको संध बगायचास.आता मला काय झालं तर कुणाला सांगू म्या "कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच नाही मया सठी फकस्त दर्वळते ती तुझी आठवण ह्या सुगंधा वानी " आणि तोंडावर हात घेऊन रडू लागली .



                                                
चैताली कदम