Wednesday, April 4, 2012

चर्चा प्रश्नांची...............


आपल्याला जे हवं तेच  का मिळत नाही......................?
साठवायच असतं ते साठवता येत नाही.......................?
हवसं वाटतं ते परकं भासत.............................................?
नको असतं ते आपलसं करावं लागतं..........................?
प्रायश्चित्त म्हणून भोगावं का लागतं..............................?


हे अस का होत आहे .........आणि  होत आहे तर याची उत्तर का नाही ...........
अस म्हणतात ................उत्तर  मिळतात  आणि ती  मिळाल्यावर कळतात हि ........पण हे खर आहे का .................?आता हे सगळ बोलणारी मी कोण ..............?जाऊदे ते इतकस गरजेच नाही............पण हे सारे प्रश्न कधी तुम्हाला पडले का ............?
नाही..........नाही नाही म्हणता येणार . हे असे प्रश्न आहेत जे सर्वांना पडतात मग स्पष्ट का होत नाहीत.आणि जेंव्हा स्पष्ट होण्याच्या मार्गात असतात तेंव्हा दुसरे का  सापडतात..............कधी थांबतील हे प्रश्नाचे खेळ............हे प्रश्न म्हणजे.............शी sssssssssss...............
किती  घोळ  यांचा ............अस म्हणतात कि माणसं चुकतात आणि शिकतात.......प्रश्न सोडवता सोडवता  उत्तरं मिळतात ..................... 
पण .......दुसरे प्रश्न  का सापडतात हाच मोठा प्रश्न आहे ........डोळे भरले माझे ...........
पण.......रडू की नको हा हि  प्रश्नच  .....?आणि दुःख व्यक्त नाही केल तर त्रास होणार..............मग अश्या वेळी करायचं तरी काय .........?तो किंव्हा ती  हवी   पण हे शक्य नाही .............अस का ..........का होत आहे हे सगळ ........असे विचार डोक्यात येऊन अगदी  गोंधळ होतो ......आपण  सुन्न होऊन................आसपास  सगळ काही शांत होत ......आणि अचानक काही तरी  आठवत मग चेहेऱ्यावर एक स्मित हास्य येत ........काही तरी मिळाल्या सारख........आणि आनंदाचा झेंडा अगदी अटके पार होतो .कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच प्रश्नांची  असतात आणि ती पुरेपूर साथ हि
निभावतात  .पण प्रत्येक वेळी जे मिळालं ते खरच त्याच प्रश्नाच उत्तर असेल हे कशा वरून ........किंव्हा अस ही म्हणू शकतो .........कधी कधी मिळालेली उत्तर खरच त्याच  प्रश्नांची असतात...............? हे कशावरून .......हो न ..........सतत विचार करून......थकून..........वैतागून.........डोक्यात आलेल्या  वादळा मुळे या प्रश्नान पासून  पळ  काढण्यासाठी  सुचलेला उपाय नाही कशावरून ............खर तर आपण प्रश्न निर्माण करतो आणि उत्तर हि आपल्या कडेच  असतात .......पण...........त्यांच्या कडे दुर्लक्ष करून.......नको अस नको ............तसं असत तर हे केल असत .......अस म्हणून  खऱ्या उत्तरला उत्तर रुपात  न  उतरवता  पळवून लावतो आपण......भारताला स्वातंत्र मिळाले.......पण आपण  स्वतःला  या प्रश्नांनी आणि त्यांची उत्तरे शोधण्यात अडकवून पारतंत्र्यात लोटल आहे .........अस का .............प्रश्न हे आपणच निर्माण करतो आणि मग आपणच उत्तराच्या पाठी हात धुवून लागतो .....मग एक काम करायचं विचार करून आत्मशक्ती आणि स्वतःला त्रास न देता ......प्रयत्न करत राहायचं कोणता हि प्रश्न निर्माण न करण्याचा  ............आयुष्य  हा  खूप मोठा प्रश्न आहे  आणि त्याच उत्तर म्हणजे  जीवन.............आणि  जर का  नियती ने आपल्या समोर प्रश्न म्हणून  इतक  छान  आयुष  ठेवलंच आहे 
मग..........हे छान आणि सुंदर रित्या  हसून खेळून  सुख : दुख :चढ  उतार भोगून सार्थक करावे ......... 
आयुष्य या प्रश्नाला  छान जगून आठवणी जोगे उत्तर द्यावे.............
आयुष हे खूप मोठ आहे ते जगताना खूप प्रश्न येतील पण हार न मानता त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यात ते फुकट न घालवता ते जगायला शिका आणि जगा ..................
प्रश्न हे असतातच  हो ..............
आणि जर का प्रश्न आहेत तर उत्तर हि असतील मग का घाबरायचं  ...............
मुक्त पणे जगायचं न ........................... 

आता पाहिलं तर मी हि हा विचार करायला हवा ............
मला हे कस सुचत................................?
किंव्हा का लिहावास वाटत ..............?
त्याही पेक्षा मी का लिहिते ..............?
हा हि प्रश्नच न ....................................?
हेच किती मोठे प्रश्न असू शकतात माझ्या साठी ..................
पण विचार नाही करायचं जास्त ................
सुचत तर सुचत...............
लिहित राहायचं .............




चैताली कदम

Monday, April 2, 2012

भावना ............

४ थी चा तो वर्ग आम्ही सगळे लहान पणा पासूनचे जिवलग मित्र मैत्रीण आज आमच प्रशस्ती पत्रक मिळणार आहे . मी घाई घाई ने तयारी करत घरातून निघाले . मनात अगदी विचारांची गर्दी झाली होती . पास  तर  होणार पण  ७०%  कि ८० % हेच विचार सतवत होते . आणि आता आपण पुढच्या वर्गात जाणार प्राथमिक शाळेतून आता आम्ही सगळेच उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेणार आभ्यास वाडूदे पण मज्या येणार
सगळे माहित नाही माझा ग्रुप पास होईल आणि सगळ्यांना एकाच वर्ग मिळावा अस मनापासून वाटत होत . आणि प्रत्येक वर्षी सारखा सगळे पास हि झाले पण त्यातले  माझे  दोन  मित्र शाळा बदलून जात होते  . आम्ही सगळे वैतागलो काय यार हे
शी ssssssss  .................... अस का कोणी शाळा बदलून जात .
पण काय करणार  त्यांच्या  बाबांची बदली झाली . मग तर त्याला जाव  लागणारच आणि आमचा ग्रुप २ व्यक्तींनी कमी झाला . पण बाकीचे सगळे कॉलेज पर्यंत सोबत होते  आम्ही सगळेच ............ सगळे जन खूप छान सेटल झालो आणि अर्ध्यांची लग्न हि झाली . काही वर्षांनी त्यातला आमचा एक मित्र आम्हाला परत हि भेटला पण  दुसऱ्या  मित्राचा काही  पत्ताच  नवता तेंव्हाच्या ४ थी तल्या  मुलां कडे  कुठे असणार फोन वैगरे . असो पण बाकीचे सगळे आहेत सोबत याचा आनंद आहेच मनात . काही जणांनी स्वतःचा बिजनेस सुरु केला तर काही जण नामवंत कंपनी मध्ये उच्च पदावर काम करत आहेत . आम्ही सगळे जण एकमेकांच्या सहवासात आहोत आणि थोड्या थोड्या दिवसांच्या कालावधी नंतर एकमेकांना भेटतोही . असा विचार मी करताच होते कि...............
फोन ची रिंग वाजली यमु चा  फोन होता मी आवडीने उचलला  आणि तिने अचानक मला विचारल......................
यमू :- अग तो आपल्या ४ थी च्या ग्रुप मध्ये होता न................
तो सदा त्याच्या बाबांच्या बदली मुले शाळा सोडून गेला ........
तो भेटला होता ........ 
मी :- अया.........हो ...............
किती  दिवसा नंतर तो भेटला न ............
यमू :- अग दिवसा काय  वर्षांनी  बोल.........
आता आपल्या  मित्र मैत्रिणीचा शोध संपला एकदाचा ..........
मी :- एकंदरीत सगळा ग्रुप पुन्हा एकत्र आला ................
पण तो तसाच असेल न  म्हणजे त्याचा स्वभाव वैगरे ............... 
यमू :- तो अगदी बद्दला आहे पण ओळखता मात्र येतो आम्ही दोघ स्टेशनला भेटलो .
थोडा वेळ एकमेकान कडे पाहतच   राहिलो कुठे तरी पाहिलं आहे अस.........
आणि जवळ येऊन यमू तूच न............. मी सदा ४  थी पर्यंत  आपण एकत्र शाळेत होतो  आणि _ _ _ _ _ _ _ .........
मी हसले हो रे............. माझ्या लक्षात आहे आणि तुला पाहिलं आणि मला सगळ आठवल हि . अस मी म्हणाले
मी :- आपण लक्षात आहोत का ग त्याच्या
यमू :- तो सगळ्यांची नाव वर्णन किंव्हा त्यांच्या  बद्दलच्या खुणा सांगून सगळ्यांची माहिती विचारू लागला त्याला हि आपण सगळे जण लक्षात आहोत हे  ऐकून खूप बर वाटल 
अग  तुलाही विचारात होता तो .
खूप वेळा तुझाच विषय काढला त्याने आणि फोन नंबर हि मागत होता पण मला काही सुचेना काहीतरी वेगळच वाटल त्याचं बोलण आणि  त्याच्या चेहेऱ्याच्या हावभावा  वरून .
मी :-  आधी नको देऊस अग आपण भेटू न तेंव्हा मी बघेन ओक .
यमू :-  अग हो  न  म्हणूनच  तस पण मला वाटल तूला विचारते   त्याला नंबर देऊ कि नको पण खर तर मला त्याच विचारण वेगळाच वाटलं ग................
म्हणून मी त्याला सहज विचारल ........
ए तू लग्न केलस की नाही............
तो नाही म्हणाला  पण त्या प्रश्ना नंतर त्याने परत तुझा  विषय काढला म्हणून मी विषय बदलत त्याला म्हणले अरे तीच लग्न झाल आणि तिला एक छानस गोंडस बाळ हि आहे  आणि  हो अरे आम्ही सगळे भेटतोय या रविवारी तू हि भेट न सगळ्यांना  सप्राइज  देऊया ओके आणि तो विषय टाळला गेला .
 मी :- हा हाहा हा हाहा ............
यमू :-  वा छान मी इथे काळजीत आहे आणि हि हसते . अग हसतेस काय बोल न
मी :-  बर झाल  बाई  नाही दिलास अग तो आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटलाय काय माहित त्याचा स्वभाव कसा आहे .वागण बोलन कस आहे . आपण भलेही मित्राच्या नात्याने बोलू पण तो कोणत नात घेऊन बोलेल हे कस कळणार आणि या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल काय माहित .
यमू :- हो न ............
मी :- चल जाऊदे या रविवारी आपण भेयू तेंव्हाच बोल ओक काळजी नको करूस मी ठेवते बाय
यमू :- बाय सोन्याला माझा कडून एक गोड गोड पा दे ओक.......... बाय.............
बघता बघता रविवार आला हि......................
माझ्या सासू बाईन मुळे मी माझ्या सोन्याला म्हणजे माझ्या मुलाला सोडून कामाला किंव्हा बाहेर जाऊ शकते . तो त्यांच्या कडे राहतो त्याला हि आजीचा  छान लळा लागला  आहे . त्यामुळे  माझ काम आणि माझ फीरण हि टळत नाही . तसं त्या खूप संजुदार आहेत आणि ह्यांना हि माहित आहे कि आम्ही सगळे फ्रेंड्स महिन्या दोन महिन्याने भेटतो . माझ्या घरातल्यांची काही हरकत नाही याला . आम्ही सगळे आज आमच्या मैत्रिणी कडे भेटणार होतो . पण मला खूप उशीर झाला होता . तितक्यात यमु चा फोन आला
यमू :-  अग कुठे आहेस कधी येणार .............
मी :-  थोडा उशीर होईल मी येते पण ........................
यमू :- ओक ...............ए  ए ए   थांब तो सदा बोलायचं म्हणतोय .
मी :- अग त्याला संग मी येतेच आहे . मग बोलूच.........
यमू :- थांब बोल जरा ...........
मी :- हॅलो .................हॅलो.............
तो :- हॅलो............. रत्ना ................रत्ना कशी आहेस तू ...............
मी :- मी ठीक आहे तू .......... तू कसा आहेस
तो :- मी हि ठीक ..........................
(तिचा आवाज ऐकला आणि मन अगदी कासावीस झाल ४ थी मध्ये असताना ती कशी दिसायची आम्ही किती छान मित्र मैत्रीण होतो  आणि मी बाकीच्या मित्र मैत्रीणी पेक्षा मी तिच्याशीच माझ्या सगळ्या गोष्टी शेर करायचो तीच माहित नाही पण मी तिला खूप जवळची मैत्रीण मानायचो आणि मी शाळा सोडून गेलो तरी तिला विसरलो नाही . तिचे ते पाणारलेले  डोळे गोरी गोरी पान हसली की गालावर खळी पडायची काळे भोर लांब सडक केस किती निरागस होती ती ते दिवस डोळ्या समोरून फटाफट गेले आणि सगळ शांत झाल मी हि )
मी :- बोल न.............का शांत झालास बोल...........
तो :- काही नाही ग .............तू....................तू ये लवकर मी वाट पाहतोय तुझी ...............
मी :- अरे हो पण काय झाल तुला..................... तुझा आवाज का .................
तितक्यात यमुने फोन घेतला .......
यमू :-  ए.........तू ये लवकर काय करतेस . थांब ..............थांब जरा..................मी बाजूला येते . अग काय तो इथे कोपऱ्यात येऊन तुझ्याशी बोलत होता सगळे विचारत होते कोणाशी बोलतोय हा . एक तर तो उमेश मागत होता आणि अनू पण मागतेय  फोन तू लवकर ये बगू .सगळे गोंधळ घालतायत इथे  बोलायला पण देत नाही सरळ ...............फोन खेचतायत  सारखा .... 
मी :-  अग तो खूप शांत झाला बोलता बोलता ........
यमू :-  काय............... काय............. बोलीस तू
मी :-  जाऊदे नंतर सांगते......बर बाय मी निघते चल
यमू :-   बाय
                                  तो खरच शांत झाला बोलता बोलता अस का केल त्याने . तो काय विचर करत असेल काय चालय त्याच्या मनात . मला खूप भीती वाटतेय .
सगळ काम  आटपून मी तयारी करून निघाले आणि तिच्या घरी पोहोचले . सगळे मला विचारू लागले का ग का एवढा उशीर केलास कशी आहेस . आणि तो..............तो अजून लांबच उभा फक्त हसत . मी आत गेले . बसले आजून हि तो पाहतच होता माझ्या कडे .
आता तो जवळ आला कशी आहेस अस म्हणून शांत झाला आणि थोड्या वेळाने .........
एवढ्या दिवसा नंतर माझी सर्वात आवडती मैत्रीण मला भेटली  . शाळा सोडून गेल्यावर  तुला खूप मिस केला ग .
ण आता आता खूप बर वाटतय तुला समोर पाहून . किती उशीर केलास .
मला खूप कस तरी वाटल .तसं हि त्या यमुने माझ्या मनात नकोते भरल्याने मी खूप घाबरले होते आता त्याला कळायलाच  हव माझ लग्न झालाय मला एक मुलगा माझा संसार आहे . माझ माझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे मला त्यांचा विश्वास नाही  गमवायचा आणि तुझ्या मुळे तर नाहीच नाही मला माझ्या  आयुष्यात  काही संकट नको  हे अस का वागतोय हा .या हेतूने मी फटा फट म्हणले 
अरे नाही........... बाबू खेळत होता न.............. आणि पाहुणे पण आले होते .
हे पण नको जाऊ म्हणत होते आधी एकच तर सुट्टी असते त्यात पण तूं बाहेर जातेस .
हे माझ्यावर खूप प्रेम करतात मला समजून घेतात ...................
मलाच वेळ नसतो त्यांच्या साठी ..............
पण त्यांनीच नंतर मला इथे सोडल .
 मी म्हणाले आत चला............. सगळ्यांना भेटा....... मग जा............
नको नको परत कधी तरी.............. इंजोय .............
म्हणून  गेले निघून ....................... 
अस म्हणत मी श्वास सोडला .............गप्प झाले थोडा वेळ
तो हसला आणि म्हणाला एक विचारू........................
हो विचार न सदा
माझ्या वागण्यातून काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस.............
तू माझी मैत्रीण आहेस सर्वात आवडती आणि ती ही बाल पणाची म्हणून तुला पाहण्याची तुझ्याशी बोलण्याची हूर हूर लागली होती . म्हणून मी तुझ्याशी बोलायला तुला भेटायला तड फड करत  होतो . आपले लहान पाणीचे मित्र मैत्रीण भेटणार हा विचार करून मी भारावून गेलो . माझ्या वागण्या मुळे तुला इतका त्रास होईल वाटल नाही चुकल असेल तर माफ कर मी विचित्र पणा केला ओवररीयाक्ट  झालो सॉरी जास्त विचार नको करूस अग......... मी इथे तुम्हा सगळ्यांना  माझ्या लग्नच आमंत्रण द्यायला आलोय .
तुझ्या  या  सगळ काही  एवढ्या   धडाधड  समजून सांगण्या  वरून  तु माझ्या एकंदरीत वागण्याने  माझ्या बदल स्वतः चा गैर समाज  करून गेतलास  अस वाटल  म्हणून हा विषय बोलो 
कारण तुझ्या मनात माझ्या बदल चुकीची  भावना  नको निर्माण व्हायला माझी मैत्रीण मला गमवायची नाही . मला माहित आहे तुझ्या मनात माझ्या बदल काही नाही आणि काही आहे ती फक्त मैत्री आणि माझ्या हि मनात काही नाही तुझ्या बदल .
शांत हो आणि आधी तो घाणेरडा विचार काढून  टाक  मनातून मंद कशी आहेस तू ........
किती वेगळी दिसतेस ग आणि सुंदर हि तितकीच निरागस ............ पण अजून हि तू तशीच आहेस बारीक जाडी हो जाडी ........... 
हो.......तसं ssssss  .... तुझ  लग्न नसत झाल तर मी विचारल असत तुला  लग्ना साठी  पण ठीक आहे  . मी उशीर केला आणि मी तेंव्हाच विषय सोडला जेंव्हा यमु मला म्हणाली तुझ लग्न झालाय छानसं  बाळ हि आहे . आणि तसं पण तुझ तुझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे  .कस धड धड  म्हणत  गेलीस  अजूनही ४ थी  त  असल्या सारख 
भारत माझा देश आहे............  म्हणाल्या  सारख .
आणि तो हसू लागला ...............त्याच्या त्या हसण्याने मला हि हसू आले .
मी किती चुकीचा विचार केला . माझा बावळट पणा वर मला हसू  येत आहे . 
नाती आधीच जुळलेली असतात  . आणि जोतो आपल नशीब सोबत घेऊन आल असतो .आता बघ न देवाने तुला माझी मैत्रीण बनवल .  हे हि नात्यातच मोडत न ..................
आणि माझा गैर समाज दूर झाला आम्ही सगळे जुन्या आठवनीन मध्ये रमलो
घरी आले रात्रीच्या जेवण नंतर झोताना मी यांना हे सांगू कि नको अस वाटल पण मी त्यांना ते सांगितल आणि तेही हसू लागले मला कुशीत घेउन  समजू लागले ................
कधी कधी  काही माणस आपल्या भावना लपवू नाही शकत आणि ते  समोरच्या व्यक्तीला  नाही खपत या  मुळेच समोरची व्यक्ती त्या व्यक्ती बद्दल चुकीचे अंदाज  बांधू लागते  पण हे चुकीचे अंदाज बदलू हि शकतात फक्त हे अंदाज एकमेकांशी स्पष्ट करायचे . दोन माणसां मध्ये स्पष्ट बोलण्याच नात किंव्हा पद्धत असते .त्या नात्यात विश्वास आणि सत्यता असते .प्रोब्लेम्स बोलून सुटतात गप्प राहून नाही . आणि बघ ते त्याने केल म्हणून हा गैर समाज दूर झाला नाही तर तू असच चुकीच समजत राहिली  असतीस आणि एक प्रामाणिक मित्र गमावला असतास .यमुच्या काही हि  भरळण्या  मुळे तू घाबरून गेलीस ती काळजी पोटी बोलली पण तू त्याला न पडताळता त्याच्या बदल चुकीचा अंदाज बांधलास . त्याने ते स्पष्ट केल हे ठीक केल . आणि मी हि स्पष्ट करण्यात विश्वास ठेवतो त्यामुळे तुझ्या हि बदल काही गैर समज माझ्या मनात नाही होऊ शकत नाही .  हे छोटे छोटे प्रोब्लेम्स तू तुझ्या पद्धतीने हाताळ आणि नाही जमल तर मला सांग ओक
तू न ......................माणसाना ओळखायला शिका बाईसाहेब
ह्यांच्या कुशीत  गप्पा मारता मारता कधी झोपले कळालच  नाही  . आणि परत एकदा शाळेच्या त्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेले .



चैताली  कदम 

भुरळ...............


हे कस स्पष्ट आहे जे मी व्यक्त नाही करू शकत .
पण...............तीव्रतेने  जाणू शकते .खूप त्रास होत आहे या जाणीवेचा .अस का होत असतं जे हवे तेच का नाही देत देव .हो पण हे हि तितकाच खर आहे कि आपल्या कडे काय आहे  हे न पाहता आपण नेहमी लोभस आणि आकर्षणा कडे वळतो आणि जेंव्हा हे होत असत तेंव्हाच आपण आपल्या कडे असलेल्या गोष्टींचा  अपमान करत असतो दुसऱ्याकडे असणाऱ्या चमकेला भुलून आपल्या कढल्या लख्खं प्रकाशाने कांती पोळते का आपली .
असच काहीस आहे केया बद्दल हि .
केया ....................
केया म्हणजे फुल.......................
जे आपल्या सुगंधाने सार वातावरण बदलून टाकते........
स्वच्छंद आणि आनंदी बनवत निसर्गाच्या एका नवीन आणि सुंदर पेहेलूची ओळख करून जाणीव करून आनुभवण्यास मदत करत ..................
केयाच हि काहीसं असच आहे................
सुंदर स्वच्छंद मनसोक्त  स्वतःच्या हक्काची आणि स्वतःची अशी..........
वेगळी दुनिया जगणारी................
केया.................
तिला हि कोणावर प्रेम होईल अस अजिबात वाटल नाही .
पण म्हणतात न प्रेम हे कस हि होत आणि काळत हि नाही ..........

"""""प्रेम म्हणजे""""" .................... 
"आईने मायेने भरवलेला घास" .............
"बाबांनी डोळे मोठे करून दिलेला खोटा खोटा दम" ...............
"ताईने खोडी मुळे पकडले ला कान "...........
"दादाने मस्करीत दिलेली टपली "............

अस तिला वाटायचं.............
पण हे काहीसं वेगळ होत...............

याच्या व्यतिरिक्त हि प्रेम असतं जे ............भुरळ घालणार........या सगळ्यातून बोट धरून दूर कुठे तरी हिरवळीत आणून सोडणार.........अश्या हिरवळीत जिथे सार काही छान आहे मोकळ आहे...........जे प्रत्येकाला जगावंसं वाटत ...........पण तिला काय माहित कधी कधी हि हवी हवी शी वाटणारी हिरवळ ..........शुद्ध खोटी हि असू शकते .......खरा तर प्रेम म्हणजे जितक मिळवन तितक गमावण..............
पण जर.............
प्रेम स्वतःच अपूर्ण आहे .
म्हणजेच..................
  प्रे या अक्षराला पूर्ण होण्या साठी  ची गरज लागते आणि सोबत म्हणून अर्थ पूर्ण व्हायला ची गरज लागते तेंव्हा कुठे जाऊन प्रेम हा शब्ध पूर्ण  होतो ............
तरी हि तो तीन अक्षरांवर न संपता अडीज अक्षरांवरच संपतो .  
मग त्यात असलेल्या भावना पूर्ण व्हाव्यात अस का वाटत सगळ्यांना.................
                      एक व्यक्ती असच काहीसं आला तिच्या आयुष्यात  आणि बोट धरून कुठे तरी हिरवळीत आणून सोडल त्याने हि तिला  आणि  ती भाळली त्या हिरवळीला जिने तिला भुलवल .
खूप कमी दिवसात त्याने तिला आपलास करून घेतल ............एकटच काही विचार करून हसायला शिकवलं....प्रसन राहायला शिकवल.........खर तर ...........खर तर.........खोट जगायला शिकवलं...........
तिचं त्याच्या वर अफाट प्रेम त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करायला लागली होती ती .प्रत्येक वेळी त्याचाच विचार .आणि एके दिवशी तिचा कॉलेजचा मित्र तिला भेटला ती खूप खुश झाली इतक्या दिवसान  नंतर तो तिला भेटला . त्याने तिला जवळच्या  हॉटेल  मध्ये  चहा साठी आग्रह केला  आणि नाही नाही म्हणता  शेवटी होच म्हणव लागल आणि  ते दोघ हॉटेल मध्ये बसले चहा बरोबर गप्पा  अगदी रंगल्या तितक्यात त्याने तिला विचारल .
अग लग्न कधी करतेस...................
ती लाजली आणि म्हणाली हो करेन न ............लवकरच
म्हणजे .......कोणी तरी आहे कि काय.............
हो................
त्याच नाव काय ...........काय करतो तो ............
पण एवढ्या दिवसान नंतर भेटल्या मुळे गप्पांची घाई झाली होती तिच्या बद्दल विचारता विचारता  त्याने सांगितल  माझी बहिण तीच लग्न ठरल आहे  या २५ तारखेला आहे .त्याला घेऊन ये अरे नाही तो गावी गेलाय त्याच्या  भवाच लग्न आहे न म्हणून ..............ओके  ठीक आहे पण तू यायचस हा ........प्लीज .आपले सगळे फ्रेंड्स पण येणार आहेत.तू हि ये .........त्या मुळे बाकीच्यांशी हि भेट होईल .
अरे हो रे येणार न मित्राच्या बहिणीच लग्न आहे .......नक्की येणार.
                  लग्नचा  दिवस आला तीने तयारी करून तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि ती तिच्या दारात .दोघी हि निघाल्या थट्टा मस्करी करत कधी हॉल आला कळलच  नाही आत शिरताच तिचे  शाळेतले  कॉलेज  मधले फ्रेंड  तिला भेटले . आणि गप्पा मारता  मारता  ती  इकडे  तिकडे  पाहू लागली  लागली   आस पास नजर फिरवता   फिरवता  अचानक तिची नजर  एके  ठिकाणी  थांबली   .तिला काही सुचेना विश्वासच होईना  तीची धड धड वाढली घाम सुटला आणि खाली कोसळणार तितक्यात तिच्या मित्राने तिला पकडल .आणि बाजूच्या खुर्चीत बसवलं पाणी शिंपडल तिच्या तोंडावर ती धडकून जागी झाली .  सगळे तिला विचारू लागले काय झाल .पण तिला काही सुचेना
कारण च्चक तोच तिच्या समोर उभा . त्याच लक्ष नवत तसं पण म्हणा विधी चालू असताना नवऱ्या मुलाच लक्ष कस दुसरी कडे असणार हो ज्या मुला बरोबर  तिच्या मित्राच्या बहिणीच  लग्न  होत  होत  तो तोच होता पण ती कशी सांगणार हे सगळ .
ती म्हणाली काही नाही................ मी ठीक आहे .............
जरा अशक्त पण वाटतो आहे पण ठीक होईल थोडावेळ बसते ..................
तिची घुसमट झाली पण तिने ठरवलं कि त्याच्या समोर जायचं . नवरा नवरी आता  विधी संपून सगळ्या  मंडळीचे आशीर्वाद आणि त्यांनी आणलेल्या भेट वस्तू स्वीकारायला सुरवात केली . तो इतका खुश कसा असू शकतो आपण कोणाला तरी फसवत आहोत हे त्याच्या चेहेऱ्यावर कुठेच नवत . ती आणि तिचे सगळे फ्रेंड आता नवरा नवरीचा निरोप घ्यायला त्यांच्या जवळ गेले आणि त्याची नजर तिच्या वर पडली तो घाबरला . हि काही बोलणार नाही न ...........
आता काय होईल हा विचार करून तो घाम घूम झाला पण केया काही बोलीच नाही ती नवरी ला भेटून अभिनंदन  करून निघाली  आणि जाता जाता फक्त त्याच्या कडे पाहिलं तिच्या डोळ्यात फक्त हेच होत....................
तू अस का केलास ....................
आणि ती कोणाला हि आपल दुख न सांगता न समजू देता हसून गप्पा मारून सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली ................
पुन्हा काही दिवसांनी ती हे सगळ आठवत त्याच्या भेटण्याच्या जागी बसली होती खूप खचली होती मनातून आणि तो तिला भेटला ..............
त्याला पाहून ती तिथून निघणारच तितक्यात त्याने हक मारली
मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे प्लीज ...............मला जाऊदे ..............
केया थांब ........
काय करू थांबून .......सांग न .............तू हे का केलास........ का................मी किती विश्वास केला तुझ्या वर किती प्रेम केल आणि तू माझा विश्वास घात केलास .....आता तरी सुधार आणि नीट वाग  .................आणि परत माझ्याशी बोलण्याचाच नाही  तर  भेटण्याचा हि प्रयत्न करू  नकोस ..............आणि कश्या साठी आलास इथे माझा तमाशा पाहायला............. 
वाटलं असेल  दुभळी आहे . रडत बसली असेल आपण त्याचा हि फायदा गेऊया .........
पण नाही मी दुसरया मुलीं सारखी रडत बसणारी नाही . आणि तुझ्या साठी तर नाहीच नाही आणि का........... कश्या साठी रडू................तुझ्या  साठी रडून मी तुझ  महत्व वाढवत बसणार नाही .
पण हो आयुषभर हि खंत  असेल ती फक्त याचीच कि मी एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल ........आणि हि खंत सतत  माझ्या मनात सलत राहील ............... मी मना पासून तुझी माफी मागतो ......
नाही मी तुला कधीच माफ नाही करू शकत ...........आणि हे सगळ  बोलले  म्हणून खोटी माफी नको मागुस ..................
शी ...........एवढं सगळ होवूनही .............तुझी हिमंतच  कशी झाली माझ्याशी बोलण्याची .........माझ्या समोर येण्याची ..............
मी .... मी .....नाही माफ करू शकत तुला ...........पण ......... तू तिचं आयुष उद्वस्त नको करूस .........जस मला फसवलस तसं तिला फसवू नकोस.आणि केया तिथून निघून गेली ...........किती मूर्ख होता तो कि त्याला कधी  कळलंच नाही  केयाच  महत्व .............
केया हि आता ठीक आहे . आज तिचा मित्र येणार आहे  लंडन वरून . ती खूप खुश आहे .ती त्याला पिकअप करायला एरपोट गेली .खर तर तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा तो राहतो पुण्याला पण इथे मुंबईत १० वी नंतरच्या शिक्षणा साठी होता . तिला पहाताच तो तिच्या जवळ आला आणि त्याला पाहून ती खूप खुश झाली तब्बल ५ वर्षांच्या कालावधी नंतर तो आला आहे त्याने येताच तिला घट्ट मिठी मारली
आय  मिस यु .......आय  मिस यु.......आय  मिस यु सो मच केया............
मी  टु........कसा आहेस तु ......चल ...........चल लवकर घरी जाऊया ..........आई बाबा वाट पाहतायत .....केया मला तुला काही तरी विचारायचं आहे ..............आता नको प्लीज घरी जाऊन ......आई बाबा लग्नासाठी बाहेर चालले  आहेत  आधी त्यांना भेट त्यांच्याशी  बोल ........मग आपण बोलू .................
तो तोंडातल्या  तोंडात काही तरी पुट पुट ला .................
ते दोघ घरी आले ..............
आई बाबा लग्नाला निघालेच होते ...........तो आई बाबांना भेटला ...........आणि ते लग्नाला निघून गेले...........चल मी ही आता फ्रेश होतो ............... 
ओक ............
ती चहा नाष्टा तयार करून  त्याची वाट पाहू लागली तो आला .................
खूप छान वाटत आहे परत मुंबईत येवून ............
ए पण घरी न जाता आधी तु इथे आलास ..............
काही तरी काम आहे..............म्हणून आलो..........का नको यायला ................
नाही .....तसं ..........नाही काही ................
चल आपण बाहेर बागेत बसुया ..............

ते दोघं जावून बागेतल्या झोपाळ्यावर बसून  गप्पा मारू लागले  ..............
त्याने तिला विचारल ..............
मला काही तरी विचारायचं आहे तुला केया ............खरा तर मी तुझ्या साठी आलोय ..........
आता सगळं काही शांत  झाल होतं.........
मला .............मला ..............तु खूप आवडतेस .........
माझ्याशी लग्न करशील  का  ...............?
तु .............हे काय बोलतोयस .....गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप काही घडल........असं ती म्हणतच होती कि .............
शु ssssssssssss.........तो  तिच्या ओठांवर बोठ ठेवत म्हणाला ..................
ला तुझं  पास्ट नाही  ऐकायच..............प्लीज .........फक्त हो कि नाही ते सांग.......
ती शांत झाली ..............आणि तिच्या डोक्यात विचार चालू झाले .........आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जवळच होती .......आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही..........ती हसून.......नाही .......लाजूनच हो म्हणली ..........तो तिला जवळ घेत म्हणाला मी फक्त वाट पाहत होतो या वेळेची ........आता मी घरी जाऊन हे सागतो आणि ............मग ..........मग लग्न ..........
हे काम होत का ...........
दोघे हि हसत समोरच्या मावळणाऱ्या सूर्या  कडे पाहत   त्यांच्या भावी आयुष्याच्या गप्पान मध्ये गुंग झाले .................

कधी कधी आपल्याकडे सर्व गोष्टी असतात फक्त त्या आपण दुर्लक्ष करतो ...........
किंव्हा  चुकल्या नंतरच काही गोष्टी कळतात आणि त्याचं महत्व हि ...............
त्याही पेक्षा अस म्हणता येईल कि देव देतो पण जरा  उशीर करतो ...............





चैताली कदम

Saturday, March 17, 2012

क्षण.............


रात्रीची धुंदी अजून तशीच आहे. छात वर डोके ठेवून. डोळे मिठून कुशीत ती तशीच पडून आहे.किती लाजते ती. ती विचार करत असेल, मी झोपलीच आहे अस समजून त्याने उठून दिवसाला सुरुवात करावी. मी ही तितकाच ठाम अजूनही तिच्या केसात खेळतोय. काल रात्री अंघोळी नंतरच्या तिच्या भिजलेल्या केसांनचा सुगंध अजूनही तसाच आहे.  आणि बेड वरची चादर संपूर्ण विस्कटलेली. किती नखरे केले रात्र भर तिने. तिच्याकडे पाहता पाहता माझी नजर बेडरूमच्या त्या खिडकीकडे गेली. त्यातून डोकावणारं ते पारिजातकाच झाड...त्या उगवणाऱ्या सूर्यकिरणात छान दिसत होतं आणि...आणि त्या फुलांचा सुगंध जणू लपाछपी खेळत माझ्यापर्यंत पोहचत होता.

तिनेही ठरवलं असावं, आज यानेच उठावं. आता वाटलं जाऊ दे! आपणच हार मानूया. अलगद तिला शेजारच्या उशीवर सरकवून ठेवलं..तिच्या चेहेऱ्यावर एक निरागस हास्याची लाली होती. तिच्याकडे पाहून क्षणभर भ्रमित होवून तिलाच पाहत रहावसं वाटू लागलं. मग स्वतःलाच हसलो आणि बाल्कनीमध्ये आलो. सदऱ्याचे हात वर करून हात लांबवून आळस काढत हात उंचावले. तितक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडून पाहिलं, तर वेटर कॉफी घेऊन आला होता. हे बरं आहे! न मागवता कॉफी बरी येते इथे असा विचार करत, दरवाज्यावरच कॉफी घेत मी त्याला टोलवलं तर तो चक्क हसला माझ्याकडे पाहून. थोडा वेळ मला काही कळेचना सदऱ्याकडे पाहतो, तर बटण वरखाली झाली होती. भुवया ऊंचावून काय म्हणून विचारलं, तर मान डोलवत तो निघून गेला. खरं तर तो माझ्याकडे बघून "गुड मॉर्निंग!" म्हणून हसला. पण मीच गडबडलो. चोराच्या मनात चांदणं या म्हणीचा अर्थ मला आज उमगला. स्वानुभवाने. 

हातात दोन कप घेऊन मागे वळतो, तर ती जागी झाली होती. चादर अंगावर सांभाळत बेडवर बसली होती. अंगावरची चादर तिने अजून गुंडाळून घेतली. गुडघ्यांवर कोपर टेकून तळहातावर स्वतःची हनुवटी ठेऊन माझ्याकडे पाहून छान हसली. पण कदाचित ते हसू खोडकर होतं. "शेवटी तूच उठ्लास ना आधी." असं काहीसं म्हणणार. मी ही हसत मान डोलावली .तिच्या हातात तो कप देत मी म्हणालो, "बस झाल बाबा! पाहतेस काय माझ्या कडे अशी. सध्या कॉफी पी. थंड होईल." कॉफीचा कप ओठांना लावून ती अजूनही माझ्याकडे बघते. ती कदाचित त्याच धुंदीत आहे. अजूनही तिला वाटत आहे की मी तिला जवळ घ्यावं. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. ती मागे टेकून बसली होती. त्याचा आधार घेत सरकत माझ्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचली होती. खांद्यापर्यंत तिचं डोकं येताच तिने माझ्याकडे बघत एक दीर्घ श्वास घेतला. "मला जवळ घे ना!" असं लाडिक म्हणाली. मी हसत तो कप बाजूच्या टेबलावर ठेवला आणि तिला कुशीत घेतलं त्या मिठीत मला ती खूप समाधानी भासली आज. जर तिला असंच वाटत होतं, तर मग काल एवढे नखरे करायची काय गरज होती? 

"आज आपण फिरायला जाऊया बाहेरच जेवूया आणि थोडी खरेदी ही होईल. मी पटकन तयार होते." असं म्हणत तिने मिठी सोडवली. मी ही डोळ्यानीच "हो" म्हणालो. तिने चार पावलं पुढे जात थांबून मागे वळून, "कोणती साडी घालू?" असं म्हणताच मी चटकन उत्तर दिलं. "जांभळी घाल." आणि ती निघून गेली अंघोळीसाठी. गंमत अशी की लग्नाची खरेदी चालू होती, तिला ती साडी खूप आवडली ही होती, पण आमच्याबरोबर लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या मंडळींच्या पसंती नापसंतीत ती साडी तशीच राहून गेली. तिला ती साडी आवडल्याची जाणीव मला झाली आणि मी त्या साडीचे पैसे चुकते करून ती दुकानदाराला बाजूला काढायला लावली. खरेदी संपल्यावर कोणाचेही लक्ष नसताना ती साडीची पिशवी तिच्या हातात सरकवली होती . 

तिची तयारी होईपर्यंत मी जाऊन बाल्कनी मध्ये उभा राहिलो. बाहेरचा अवर्णनीय निसर्ग पाहून माझे डोळे थक्क झाले. सूर्य किरणांनी सारा निसर्ग लख्खं चमकत होता. मी इतका दंग झालो पाहण्यात की, ती अंघोळ करून केस पुसत कधी माझ्या जवळ येऊन उभी राहिली कळालचं नाही. तिने माझ्या हाताला हात लाऊन म्हंटलं, "जातोस ना अंघोळीला..." मी तिच्याकडे पाहिलं, ती ही त्या कोवळ्या किरणात सुंदर दिसत होती. तिचा चेहरा त्या प्रकाशात पांढरा शुभ्र, नितळ, शांत असा दिसत होता आणि डोळे ही चमकत होते. मी तिच्याकडे पहातच राहिलो. किती वेगळी दिसत होती ती? नाजूक. गोरी पान. मोत्यासारखी. अगदी नजर काढावी अशी. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेऊन क्षणभर तिच्याकडे पाहून तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. लाजून ती थोडी दूर गेली, मी तिच्या कमरेभोवती विळखा घालून तिला जवळ ओढताच, हृदयाची धड धड वाढू लागली. तितक्यात दारावरची बेल वाजली. माझ्याकडून स्वतःला सोडवून तिने दार उघडलं. खाली रिसेप्शनवर फोन होता घरून. रूममधला फोन बंद असल्याकारणाने खाली जावं लागणार होतं. "तू जा बोल त्यांच्याशी. मी अंघोळीला जातो."

मी अंघोळ करून बाहेर आलो. आता मला खूप फ्रेश वाटतं आहे. पण ती नाही रूममध्ये. तिला बघायला म्हणून मी परत बाल्कनीमध्ये गेलो. तितक्यात ती दिसली. त्या पारिजातकाच्या झाडाखाली...


त्या झाडा खाली फुलांचा सडा पडलेला होता आणि ते माझ्या बाल्कनीतून खरंच खूप छान दिसत होतं. ते झाड भेदून सूर्य आणि झाडातला पल्ला गाठून सूर्यकिरणांसह धुक्यांचा हलकासा धूर होऊन त्या सड्या वर पडत होता आणि ती फुलं स्वच्छंदपणे सर्वत्र पसरून आपल्या सुगंधाने वातावरण सजवत होती. ती त्या सड्याजवळच्या बेंचवर बसली होती काहीतरी विचार करत. मी ही तिच्याजवळ गेलो. पण तिचं लक्ष नव्हतं. या गोष्टीचा फायदा उचलून मी ती फुलं वेचली आणि तिच्यावर उधळली. बसलो तिच्या जवळ. ती दचकली आणि मग हसली माझ्याकडे पाहून. माझ्या खांद्यावरती डोकं ठेऊन शांत बसली. मी ही डोळे बंद करून राहिलो. शांत झालं सगळं. आसपास कसलाही आवाज नाही. ते कोवळ उन, फुलांचा सुगंध, हिरवागार निसर्ग, थंड हवा, धुकं हे वातावरण मी कधीच विसरणार नाही आणि हा क्षण ही...

******************************

...अचानक जोरात हवा आली आणि झाडाची सुकलेली पानं माझ्या अंगावर पडली. मी दचकून उठलो, तर एक साठी गाठलेला वृद्ध गृहस्थ माझ्याकडे शून्यात बघत होता. मी घाबरून मागे झालो, तर आसपास असलेले काही जण माझ्याकडेच स्थिरावलेले मी पाहिले .कोणी हसत होतं. कोणी रडत होतं. कोणी स्वतःशीच बडबडत होतं. कोणी इकडे तिकडे पळत होत कोणाला तरी शोधत होतं. 

आसपास कोणी ही नव्हतं ती ही नव्हती. अंगावर शहारा जाणवला. मी एका झाडाखालच्या गोल कठड्यावर बसलो होतो. खूप किलबिलाट होता. पण हा पक्षांचा नाही. असायलममधील वेड्यांचा कर्कश किलबिलाट होता. कोणाच्या दु:खाचा, कोणाच्या सुखाचा, कोणाच्या शोधाचा, कोणाला तरी गमावल्याचा. मी तिला वेड्यासारखा शोधू लागलो. पण ती सापडलीच नाही. कंठ दाटून डोळ्यात पाणी आलं. मी कासावीस होऊन जोरात रडू लागलो. ती नाही माझ्या जवळ. मी तिला वेड्यासारखा शोधतोय. पण ती कुठेच सापडत नाही.कारण ती नाहीच आहे या जगात. मला सोडून खूप दूर गेली आहे. सारं काही आठवलं एका मागोमाग एक. त्या दिवसासारखी आज ती नव्हती माझ्या जवळ. आता माझ्या समोर काहीतरी वेगळंच होतं, ह्याची मला खात्री झाली. इथे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही. जो तो आपल्या मनस्थितीत स्वतःलाच सावरण्याच्या प्रयत्नात आहे. ती खूप दूर गेली आहे. त्या रात्रीच्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात. म्हणून वाट पाहतोय मी रात्रीची. जसा चातक पाहतो पावसाची...आतुरतेने....

एकदा का रात्र झाली की...ती येईल हलक्या हलक्या पावलांनी आणि आभाळात लख्खं चमकेल. मला विचारेल, "तू वाट पाहत होतास ना माझी...उशीर तर नाही केला नं?" आणि मी म्हणेन, "नाही गं! आणि झाला असला उशीर तरी चालेल मला...तुझी वाट पहाण्यात पण एक वेगळा आनंद आहे."

**************************

त्या...त्या हनिमूनच्या दिवसांनंतर आम्ही मुंबईतच शिफ्ट झालो आणि आमची रोजनिशी सुरू झाली. माझं आणि तिचं ऑफिसही. अलार्म बंद करून बेड वर कूस बदलत मी विचार करत होतो गेले काही दिवस. आई बाबा गावी गेले आहेत. आपण पण कुठेतरी बाहेर जावूया आणि परत अलार्म वाजला. हा तिच्या फोनचा अलार्म होता. तिला माहित आहे, घड्याळाचा अलार्म वाजला की मी तो बंद करून नुसतीच कूस बदलत लोळत राहतो. मी तिचा फोन अलार्म बंद करण्यासाठी घेतच होतो, तितक्यात ती उठली. "अगं! तू झोप. आज मी सुट्टी घेतली आहे ऑफिसमधून." तरी ती उठून बसली. सवयीने. केस विखुरलेले, लहान मुलांसारखी डोळे चोळत होती. कदाचित कामामुळे झोप अपूर्ण राहते तिची. पण आज जरा थकलेली दिसत होती. डोळे अगदी खोलावलेले. काळवंडलेली आणि थोडी अशक्त. 

"पण मी आज पाहतोय का हिला? की माझं लक्ष नाही तिच्याकडे?" मी स्वतःशीच पुटपुटलो. पण ती मस्त रोजसारखी दिवसाची सुरवात करण्यास निघाली. बेडवरून खाली उतरली. 

"आज तुला काय हवं नाश्त्याला?" तिने हसून विचारलं. मी ही हसत हसत "पोहे!" म्हणालो. पण तिच्या चेहेऱ्यावरचं हसू आजारी वाटलं आज मला. "बरं ठीक आहे. तू अंघोळ करून ये. मी जरा कामं आटपते." आणि ती निघून गेली. मी अंघोळ घेऊन बाहेर आलो. बघतो तर तिने माझा सदरा काढून बेडवर ठेवला होता. मी तयारी करून तिला हाक मारली, पण तिने काही उत्तर दिलं नाही. मी दुर्लक्ष करून बाहेर हॉलमध्ये येवून टीव्ही लावला. गाण्यांचा चॅनेल लावून तिला परत हाक मारली. "झाले का पोहे?" 

पण आतून आवाज नाही. 

"दिव्या! ए दिव्या! मी तुझ्याशी बोलतोय. अगं! झाले का पोहे?" पण तीचा आवाजच नाही. नेहमी हाक मारली की कुड कुड करत का होईना, पण "ओ" देणारी माझी दिव्या आज "ओ" का नाही देत? म्हणून किचनकडे गेलो, तर सगळं अस्ताव्यस्त आणि ती खाली कोसळून पडलेली. मी घाबरून तिच्याजवळ गेलो. तिला कुशीत घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, तरी तिला शुद्ध येईना. मी तिला उचलून बेडवर ठेवलं. डॉक्टरला फोन केला. .आता मी खरंच घाबरलो. तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे आशेने पाहत होतो की, ती कधी उठते.

 ती खरंच वेगळीच दिसत होती. खूप अशक्त, थकलेली, आजारी. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी चेकअप करून काही औषध लिहून दिली आणि संकोच करत काही टेस्ट पण सांगितल्या. पण अजूनही तिला जाग आली नव्हती. मी तिच्या जवळ तसाच बसून राहिलो...बेडवर डोक ठेवून. पाच एक मिनिटांनी माझ्या हातातला हात निसटला असं जाणवून मी उठलो, तर ती बसली होती...अशक्त अवस्थेत. मी तिला हळव्या नजरेने पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या बद्दलची भावना माझ्या डोळ्यातून असहाय्य   रीत्या बाहेर पडली. तिने माझ्या पाठीवर हात फिरवून मिठी सोडवली. माझ्या गालावर हात ठेवून थकव्याने जड झालेल्या पापण्या लुकलुकवून कापऱ्या स्वरात म्हणाली. 

"मी ठीक आहे रे! नको काळजी करूस. चल! तुला पोहे हवेत न? मी बनवते.. आणि आधी शांत हो बघू." तिच्या डोळ्यात माझी काढलेली फसवी समजूत स्पष्ट दिसत होती. तिचा त्रास असहय्य होता. हे तिला आणि मला चांगलंच कळून चुकलं होतं. मी तिला म्हटलं, "आज तू नको, आज मी बनवतो. काय ते आज माझ्या हातचं निमूटपणे खायचं."

ती हसली माझ्याकडे पाहून. तिचं ते आजारी हसू पाहून का होईना, पण मला हायसं वाटलं आणि मी किचनकडे गेलो. तसं मला थोडे पदार्थ बऱ्यापैकी जमायचे. कारण आई बाहेर गेली असताना किमान पोहे आणि चहा कसा बनवायचा हे माहित होतं मला. माझे पोहे बनवून झाले होते. चहासाठी कप घ्यायला वळलो, तर दारात ती बाजूच्या कठड्याला टेकून उभी माझ्याकडे पाहत होती. आणि थोडं चालून पुढे येणार, तोच ती कोसळली. मी तिला सावरलं, तर माझ्या कुशीत माझ्याकडे पाहून हसली. तिला दिलेल्या इंजेक्शन मुळे असेल कदाचित. 

"अगं! अगं! कोणी सांगितलं तुला उठायला बेड वरून?"

"रोज शर्ट पॅंट टाय घालून हँडसम दिसणारा माझा नवरा आज किचनमध्ये कसा दिसतो...'' तिचं वाक्य अर्ध्यातच राहिलं.

आम्ही दोघही हसू लागलो. मी तिला सावरत बेडपर्यंत सोडलं आणि नाश्ता ही आणला. 


"आज माझं कायमचं पोट भरणार वाटतं!..." 

हे ऐकून मी हसता हसता शांत झालो आणि तिला रागावलो.

"अरे वेड्या! काय माहित तू परत कधी बनवशील माझ्यासाठी असं काही. त्यासाठी तर मला असं आजारीच पडावं लागेल ना? कौतुकाने म्हंटल रे!" 

आणि गप्पा मारत पोहे आणि चहा कधी झाला कळलचं नाही. मी तिच्या बाजूला गप्पा मारत बसलो, तर ती गप्पा मारत झोपली. मी तिला उशीवर ठेवणार तितक्यात जागी झाली. "चल आता जाग आलीच तुला, तर तयार हो! डॉक्टरकडे जावून थोड्या टेस्ट करून घेवूया." 

कंटाळा करत टेस्ट करून आम्ही घरी आलो. संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला गेलो. तिला बाहेरच्या खुर्चीत बसवून मी आत डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी दबक्या आवाजात मला "बसा! बसा!" म्हणत फाईलचं पान उलटलं.

डॉक्टर :- "आता तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. त्या सध्या खूप अशक्त आहेत शरीराने आणि मनाने देखील."
दक्ष :- "हो ठीक आहे डॉक्टर. मी काळजी घेईन तिची." 
डॉक्टर :- "ठीक नाही मिस्टर दक्ष! त्या खूप पोखरल्या गेल्यात. त्यांना जे जे आवडतं ते सगळं करा मिस्टर दक्ष." (ते उठून माझ्या जवळ आले माझ्या खांद्यावर हात ठेवला )
दक्ष :- "..."
डॉक्टर :- "मिस्टर दक्ष त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे."
दक्ष:- "हे....हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर?" (माझा श्वास खूप वाढू लागला हृदयाची धड धड असहाय झाली. डोळे काठोकाठ भरले.)
डॉक्टर :- "हो मिस्टर त्यांना कॅन्सर आहे. कर्क रोग...आणि त्या आधीच खूप नाजूक असल्यामुळे आतून पोखरून गेल्यात. त्यांच्यावर काही उपाय शक्य नाही आणि त्यांचा शरीराला ते पेलवेल याची शक्यता नाही. त्या फक्त ठीक असण्याचा आव आणत आहेत. त्यांना तुमची खूप गरज आहे. जास्तीत जास्त वेळ काढा त्यांच्या सोबत."

तिला कर्करोग असल्याचं कळालं. ती कायमची दुरावणार...मी कसं काढणार आहे माझ आख्खं आयुष्य? कशी भरणार आहे ही अपूर्णतेची पोकळी? असे विचार डोक्यात येवून मी संपूर्ण संपलो होतो. माझ्या डोक्यात विचारांचं खूप मोठ वादळ आलं होतं, जे सगळं उध्वस्त करून जाणार होतं. माझ्या पायाखालची जमीनच निसटली. मला काही सुचेच ना. माझे डोळे आपोआप मिटले. आता मात्र डोळ्यातल्या पाण्याला वाट दाखवायची गरज नव्हती. मी कस सहन करणार होतो हे सगळं? माझ्या उधळलेल्या आयुषाचा पसारा आवरत मनाला सावरत मी शांत झालो. डॉक्टरांनी मला समजावलं. पण ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं. त्यात काहीच दिवस राहिले होते तिच्या जवळ. माझ्या सुखाच्या संसाराला आता चांगलंच ग्रहण लागलं होतं. कसा बसा सावरून बाहेर आलो. तिच्याकडे पाहिलं. मला आता राहवतंच नव्हतं. पण तिच्यासमोर हे नको. तिने भुवया उंचावून "काय?" म्हणून विचारलं आणि खोटं हसून मी काहीबाही ओठात येईल ते बोललो. 

"काही नाही गं! असंच जरा अशक्तपणा आहे न तुला? काळजी घ्यायला सांगितली आहे. बरं का मॅडम! मी आता काही दिवस घरीच राहणार आहे. बघूया तरी माझ्या बायकोला काय झालं ते." तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. "चल घरी जाऊया!" माझ्या जड मनाला सहानुभूतीची फुंकर घालत मी हे कसं म्हटलं? माझं मलाच ठावूक. 

"नको. आपण फिरुयात न जरा मोकळ्या हवेत. समुद्र किनारी जावूया." तिने अशक्त आणि कापऱ्या आवाजात म्हटलं आणि मी तिच्या इच्छापूर्तीसाठी हसून "हो" म्हटलं. 

"आज किती दिवसांनी कारच्या फ्रंट सीटवर बसणार आहे न मी? थोडा वळसे घालूनच जावूया लाँग ड्राईव्ह पण होईल." 


कार मध्ये स्लो सॉँग लावून आम्ही थेट समुद्र किनारी गेलो. तिथे छान गप्पा मारल्या. भेळ खाली. "हा क्षण इथेच थांबू देत. ती अशीच माझ्या जवळ राहू देत." मला मनोमन हेच वाटत होतं. संध्याकाळच्या अंधारात तो भला मोठा विशाल समुद्र खळखळून हसत होता माझ्या दु:खावर असं मला वाटलं काही क्षण. पण ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसलेली. 

"किती छान आहे न ते आभाळ? आख्खं विश्व उराशी घेऊन निर्धास्तपणे त्या विशाल समुद्रात स्वतःला झोकून देत आहे. आणि हा समुद्र...शांत, नितळ चांदणं पांघरून त्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे आकर्षित होवून पाहत आहे. हे रम्य दृष्य किती सुखकारक वाटत आहे न डोळ्यांना! पण त्याची दुसरी बाजू पण आहे. तो एखाद्या व्यक्ती सारखा भासतो मला कधी कधी. माणसाला हा गुणधर्म समुद्राकडूनच मिळाला असावा बहुतेक. बघ न समुद्र सगळ दुख वूराशी बाळगून खळखळून हसतोय...अगदी तुझ्यासारखा..." 


मी चकित होवून तिच्याकडे पाहिलं. माझा हात हातात घेवून ती म्हणाली.

"मला खूप पोखरलं आहे रे या आजारपणाने. खूप कमी दिवस आहेत न माझ्याकडे? .मला त्याची जाणीव आहे..." ती बिलगली मला अगदी उन्मळून. आणि मग अचानकच तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. मी तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागलो. त्या मुसळधार पावसासारखा. "मलाही खूप जगायचं आहे रे तुझ्या बरोबर. तू बनवलेले कांदे-पोहे आयुष्यभर खायचे होते. पण मी हरले या जीवन-मृत्यूच्या लढाईत. मला सोडू नकोस. प्लीज! प्लीज! मला सोडू नकोस. मी...मला...मला इथेच राहायचं आहे. कुठे नाही जायचं." 

घाबरत काहीतरी बडबडत राहिली. मी फक्त ऐकत होतो. मनाला झालेल्या वेदनांनी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना सहन करत होतो. थोडा वेळ ती तशीच शांत बसून रडू लागली. खूप रडली माझ्या मिठीत. नंतर काहीसा विचार करून तिने स्वत:ला सावरलं. 

"मी तुझ्यासमोर असं रडत नाही बसणार. कारण त्यामुळे तू पोखरला जाशील आणि मला ते नको..." ती कापऱ्या आवाजात स्वतःला सावरत म्हणाली. 

पण तिच्या मनाची घालमेल कळत होती. ती गेल्यानंतर माझा काय होईल? या विचारांनी ती अजूनच विखुरली...घाबरली. माझा चेहरा हातात घेवून थरथरत माझ्या डोळ्यात पाहून बोलू लागली. 

"मी आहे न? नको...नको रडूस तू. मी...मी आहे तुझ्या बरोबर आणि मी नसेन, तर त्या चांदण्यात शोध मला. मी नेहमी असेन तुझ्या सोबत आणि हा तुझ्या आयुष्याची नवीन सुरवात कर. मी नाही बघू शकत तुला असं..." 

ती विखुरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत घाबरून मला चाचपू लागली. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. मी तिला शांत करत तिच्या ओठांवर बोट ठेवून नकारार्थक मान डोलवली. माझ्या डोळ्यातलं ते दुख पाहून ती शांत झाली ती माझ्या कुशीत. थोडा वेळ बसून समाधानाने घरी जावूय म्हणाली. मग बाहेर थोडं जेवून आम्ही घरी गेलो. तिने माझ्या आणि तिच्या आई बाबांना फोन करून गप्पा मारल्या आणि औषध घेऊन माझ्या कुशीत झोपी गेली. तिला शांत पाहून मी ही झोपलो आणि उठलो ते थेट दारावरची बेल वाजली. माझे आई बाबा गावावरून परतले होते आणि त्यांच्या मागोमाग तिचे आईवडील पण तिच्या कापऱ्या आवाजाचा विचार करून तिला भेटायला आले होते. 

"कुठे आहे दिव्या? काल रात्री वेड्यासारखी बडबडत होती. आम्हाला रहावेचना म्हणून आलो." 

"नाही...तिची तब्येत ठीक नाही..." मी त्यांना तिच्या जवळ घेवून गेलो 

आईने तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मी तिच्यासमोर बसलो होतो. माझ्याकडे हसत ती स्थिरावली होती ती. कायमची. मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. ती उठलीच नाही. 

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!"

**************************

"सर? सर..."

एक वॉडबॉय माझ्या जवळ आला. "सर चला...जेवायला चला...जेवणाची वेळ झाली. औषध पण घ्यायची आहेत न?"

हो! मी गेले काही दिवस इथेच आहे...असायलममध्ये...

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!" असं म्हणत मी बेशुद्ध झालो, ते इथेच शुद्ध आल्यासारखं भासलं मला. कारण त्या धुंदीत किती दिवस इथे आहे आणि या दिवसात काय झालं मला काही आठवत नाही. आयुषातली पाच वर्ष गायब आहेत माझ्या जीवनातून इतकं माहित आहे मला. त्यात थोडी सुधारणा होत आहे म्हणून इथे असल्याची जाणीवही होत आहे. आणि या आठवणी...त्या नाही पाठ सोडत माझी. अगदी रितं रितं करून जातात. आयुष अपूर्ण होऊन जातं पण आता मी ठीक आहे. काही दिवसातच माझी सुटका होणार आहे इथून...मी माझ्या आयुष्याला नवीन सुरवात करणार आहे.

तसं या फुलांनीच मला शिकवलं आहे की झाड सुकतं...पण...प्रत्येक पानगळी नंतर ते पुन्हा बहरत ही. काही दिवसात ते झाड पुन्हा बहरेल आणि स्वतःच्या सुगंधाने सगळा निसर्ग सजवेल. एक नवीन पालवी फुटायला वेळ लागतो, म्हणून आस सोडून किंवा हरून जमणार नाही. आपणच खंबीर राहिलं पाहिजे. तरच या प्रत्येक ऋतूची मजा कळेल. आयुष्याच्या सुकलेल्या झाडाला नवीन पालवी फुटेल. जर मी खंबीर राहून माझ आयुष्य धीटपणे जगलो, तरच मी तिची आठवण कायम माझ्या मनात जपू शकेन. जशी प्रत्येक रात्र नवीन सकाळ होण्याची, आयुष्यात नवीन किरणं भरून एक नवीन दिशा दाखवण्याची वाट पाहते आणि जशी एक सकाळ शांत शीतल नितळ लखलखीत चांदण्यांनी भरलेल्या, काळ्याभोर आभाळात टिमटिमणाऱ्या, कसली ही चिंता न करता लुकलुकून नवीन प्रकाशाने आभाळाचे सौंदर्य वाढवून, एक नवीन अनुभव देणाऱ्या त्या रात्रीची वाट पाहते... 

पण या सगळ्या म्हणण्या पुरत्या गोष्टी. खरं तर माझं आयुष्य ती नसताना अपूर्णच आहे. कारण तिने एक वेगळी पोकळी निर्माण केली आहे माझ्या मनात. आज मला कळला अपूर्ण शब्दाचा अर्थ. तो कितीही सहज लिहिता बोलता आला...तरी तो खूप मोठी पोकळी निर्माण करून जातो. पूर्ण न होणारी एक अशी पोकळी, जी आपण कधीही भरून काढू शकत नाही ती म्हणजे अपूर्णता. कारण अपूर्ण या गोष्टीला काही पर्यायच नाही आणि नसतो. त्या कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या अपूर्णच राहतात.

मी तिची आठवण जपेन...पण त्या प्रत्येक रात्रीची वाट तितक्याच आतुरतेने पाहीन, जी मला तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव देईल. पण त्याच प्रत्येक रात्री नंतर एक सकाळ होईल. मला परत रिक्त करेल....आणि परत तिच्या आठवणींपासून वंचित होवून मी अपूर्ण होईन. मी आयुष्यभर अपूर्णच राहीन. तिच्याविना. कारण अपुर्णतेला काही पर्याय नाही आणि नसतो...अपूर्ण, अपूर्ण आणि फक्त अपूर्ण...

...पण मी त्या रात्रीच्या चांदण्यात तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव करून माझ्या मनाची समजूत घातली आहे.




चैताली कदम 

Thursday, March 15, 2012

स्पर्श........



स्पर्श असावा आसवां सारखा
ओघळताना जाणवणारा
कधी आनंद कधी दुखं
मनसोक्त वाहणारा .............


कधी असावा पावसा सारखा
हवे मध्ये मिसळणारा
गारव्याचा एक श्वास
मना मध्ये जपणारा...............


कधी असावा फुलासारखा
बेधुंद दरवळणारा
निसर्गात स्वतःची अशी
एक जागा बनवणारा ..............


कधी असावा नदी सारखा
खळखळून हसणारा
स्वरांच्या दुनियेत एक
नवीन सूर भरणारा ....................


कधी असावा पाण्या सारखा
नितळ शांत असणारा
पाहिलं  जरी मनात
स्पष्ट पणे दिसणारा ..............


कधी असावा शब्दानं सारखा
मना पर्यंत पोहोचणारा
उमलून हसू ओठांवरती
सार काही बोलणारा .................


कधी असावा नजरे सारखा
सजवून सांगणारा
निरागस पणे मिथुन डोळे
मन स्थिती मांडणारा .................


कधी असावा श्वासांन सारखा
नेहमी सोबत असणारा
पापण्यांन सम  निमिष भर मिठून
नवीन आस बांधणारा .................





चैताली कदम