Monday, February 27, 2012
Tuesday, January 17, 2012
सई............
सर्वत्र हिरवळ पसरलेली.....हिरवळ.....ओली.....मन तृप्त करणारी ....हलका हलका पाउस .....सारं काही हलकस पुसठ दिसत होत .समोर असलेला तो धबधबा अगदी तृप्त होऊन नदीच्या मिठीत झेप घेत होता .पांढरा शुभ्र......मनात कसलाही क्लेश नसलेला ....
वातवरन अगदी छान आनंदी होऊन .घुंगरांचा साज करून नाचत होत वाजत होत......गार वाऱ्याने अंग अगदी शहारून येत होतं .ओठांची ती होणारी थरथर......डोळ्यांची उघडझाप......तिचे ते ओले काळे भोर केस चेहर्याला अगदी घट्ट मिठी मारत होते .ओंजळीत पडणारा तो पाऊस कधी साठून ओंजळीतून ओघळून जात होता ,ते हि कळत नवतं . पण त्याच्या होणाऱ्या स्पर्शाची माज्याच काही निराळी होती .चेहर्यावर पडणारे ते पावसाचे थेंब .......खूप .....खूप छान दिसत होती ती .तिची ती भिजलेली उजळ कांती अस्सल मोल्यवान हिऱ्या सारखी लख्खं चमकत होती .तो जांभळा रंग तिच्यावर खूप उठून दिसत होता .तितक्यात मागून एक हाक आली. "सई?ए सई........"
ती पटकन मागे फिरली . तिचे ते ओले केस तिच्या चेहेऱ्यावर पसरले आणि त्याने तिला मिठीत घेतल . ती काहीहि बोली नाही .तशीच स्तब्द उभी राहीली .जणू काही हरवलीच त्याच्या मिठीत . आज काहीस वेगळं वाटलं तिल . तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि आल्या आल्या तिच्या शोधात इथपर्यंत येऊन पोहोचला होता . कारण त्याला माहित होता ,सई त्याला तिथेच भेटेल .तिने अलगत मिठी सोडवली . पण तिचे डोळे वर पाहण्याची अनुमतीच देत नवते .कसंबसं ती केस नीट करत हसत म्हणाली ."आता आलास ?मी कधीची वाट पाहते तुझी......."
तो : - "रागावली अशील न ? हो पण कंटाळली अशील असं मी चुकूनही नाही म्हणणार .कारण हा पाऊस हा निसर्ग......तुझा पहिला मित्र...........हो नं ?सई .....बाई ?
ती :- "जा नं रे ?तुला किती वेळा सांगितलं आहे .सई बाई नाही......... म्हणायच म्हणून ?"
तो :- "ओके.......मग ......बाई म्हणू न ?"
ती :- "ए ! नाही हं !हे हि नाही म्हणायचं !"
तो :- "बर.....रुसुबाई !नका गाल फुगून बसू आता . आणि भिजतेस कशाला ग ? सर्दी झाली कि रडत बस मग हं ?"
ती :- "भिजणार आणखी भिजणार ....."
तो :- "भिज.......आणि मग पड आजारी आणि बस रडत. "
दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग तो तिला घरी घेऊन आला . मस्त बाईक वरून.......
सुसाट गोड आणि थंड गार वाऱ्या बरोबर गप्पा मारत ,भिजत पावसाचा आनंद घेत . खर तर हे दोघही लहानपणापासूनचे मित्र मैत्रीण एकमेकांच्या कुटुंबची हि छान ओळख होती .आज ते सगळे चहाला एकत्र जमले होते . हे दोघ घरी येताच सगळे त्यांच्या कडे एक चिडवणारया स्मित हास्याने पाहू लागले .त्या दोघांना हि काही कळालं नाही . ते दोघ हि फ्रेश होऊन आल्यानंतर त्यांच्यासह चहा प्यायला बसले . तेवढ्यात बाब म्हणाले "तुम्हा दोघांशी आम्हाला एक विषयावर बोलायचं आहे .आम्ही अस ठरवल आहे कि तुम्ही दोघही छान मित्र मैत्रीण तर आहातच . मग आयुष्यभाराचे सोबती बनायला काय हरकत आहे ? एवढा छान ओळखताच न एकमेकांना ?मग आता लग्न ही उरकून टाकू अश्याने मुलगी ही जवळ राहील आणि तुमची मैत्रीही कायम राहील ." दोघही एक मेकांन कडे पहायला लागले काहीच काळात नवतं पण सार काही विचित्र वाटू लागलं होतं . हो म्हणायचं कि नाही म्हणायचं हे हि कळात नवतं .सर्व खुश होते .सई च्या मनाची चांगलीच घाल मेल झाली होती आणि ती राजन ला कळात हि होती .तो हाच विचार करत होता कि मी तिच्या जवळ जावं ,तिला जवळ घेऊन समजवावं ,पण अस करू शकत नवतं हे हि तितकाच खरं होत .सई तिथून उठून तिच्या खोलीत निघून गेली आणि जाऊन खिडकी पाशी उभी राहिली .बाहेर आता सार काही शांत झाल होतं .पण हवेत तो गारवा तसाच होता . संध्याकाळचे ६ :३० वाजले होते .झाडांवर तो ओलावा ,हवेत तो धुंद मातीचा सुगंध,ओला गारवा आणि थोडा अंधार ही .वातावरण खूप छान होतं अगदी रमणीय .आणि तितक्यात तो मागून आला .त्याने तिच्या खंद्यावर हात ठेवला . ती दचकली .तिने चटटकन मागे पाहिलं आणि त्याच्या कडे न पहता थोडा वेळ मागीतला .
त्याने हि तसाच केलं , तोही निघून गेला तिथून .कारण तिला खरच गरज होती एकांताची .रात्र भर विचार केला या विषयावर आणि......आणि दोघांनी हि दुसऱ्या दिवशी होकार दिला लग्नासाठी . त्याला तसाही हे नात मान्य होतं . कारण ती आपली मैत्रीनच आहे . ती आपल्याला आणि आपण तिला छान समजून घेऊ शकतो ,मग हे लग्न झालं तर काही हरकत नाही . पण तिच्या मनात हा विषय खूप घोळ घालत होता . तिला काही सुचेनास झालं होतं . आई बाबांच्या म्हणण्याला तिने हि होकार दिला खरा .तरी हि तो आपला मित्र आहे ,मग आपण त्याला आपला नवरा म्हणून कस काय स्वीकारायचं ?हेच समजत नवतं . ती थोडी चिंतेतच होती.
ती परत माळरानावर निघून गेली . जेणे करून थोडा एकांत मिळेल . तिथे तिची मैत्रीण गंधा भेटली .ती हि गावातील तिची एक छान मैत्रीण .तीने तिला अचानक विचारल कि ,"काय झालं ग !अशी चिंतेत का दिसतेस ?"

ती :- "गंधा माझ लग्न ठरलं ग......"
गंधा :- "अया......खूप छान ग ! कधी ....?कुठे....?कोणा सोबत.....?"
ती :- "राजन !"
ती :- "राजन !"
गंधा :- "कधी आहे लग्न ? ए !पण तू या करणा मुले काळजीत आहेस का ?आग तो तुझा छान मित्र आहे न ?मग किती छान !जास्त टेंशनच नाही न ?खूप छान जमेल तुमच .तो चुकला ,तर तू सांभाळ आणि तू चुकलीस ,तर तो सांभाळेल आणि तस पण तुमच्या कुटुंबच चांगलाच जमत न ?मग काय?"
ती :- "पण .........पण तो माझा चांगला मित्र आहे आणि हे सगळ........."
गंधा :- "अग ! वेडा बाई !तेच तर म्हणते न मी ?कि तो तुझा छान मित्र आहे . मग त्याच्या व्यतिरिक्त तुला जास्त कोण समजू शकेल आणि अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष काढणारच आहेस न ?मग ओळखीच्या व्यक्ती बरोबर काढायला काय हरकत आहे ?जरी काही प्रोब्लेमस असतीलच ना ?तर त्याच्या बरोबर बोल आणि सोडव .तस हि तू तुझा बेस्ट फ्रेंड म्हणतेस न त्याला ?त्याच्या शिवाय आता तुला जास्त समजून घेणार कोणी नाही ग !सई ? सई माझ ऐक त्याच्या बरोबर बोल या विषयावर ."
ती :- "तस तू बरोबर म्हणतेस ग !मी बोलेन या विषयावर त्याच्याशी ."
गंधा :- "अंहं ?आता पासून त्यांच्याशी म्हणायचं हं सई "
सई छान हसली आणि तिने ठरवल कि ती राजन शी बोलेल या विषयावर . ती निघाली तिथून तिच्या प्रश्नच उत्तर मिळाल्याप्रमाणे आणि दोघी ही गप्पा मारत घरी निघून गेल्या.
संध्याकाळी घरी पोहोचल्यावर अचानक तो दिसला .आज त्याला पाहून तिच्या हृदयाची धडधड का होत होती कुणास ठाऊक .पण ती.......ती धड धड छान होती .ती जाणीव काही वेगळीच होती .ती त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली "मला काही बोलायचं आहे तुझ्याशी ."आणि सरळ तिथून निघून तिच्या खोलीत गेली .त्या खिडकीत जाऊन उभी राहिली त्याची वाट पहात .तो आला .तिला त्याची चाहूल लागताच तिने सुरवात केली .

ती :- "राजन !हे जे काय होतंय ,ते मला नाही काळात आहे रे !आपण छान मित्र-मैत्रीण आहोत.मग.......... अचानक ?हे असं लग्न ?"
तो :- "सई मी तुझा मित्र आहे आणि तूच म्हणतेस न ?....कि माझ्या शिवाय तुला कोणी नाही समजू शकत ?मग आपण हे लग्न करूया .आणि तस हि आपल्याला एकमेकान साठी भावना आहेत . पण त्या आपल्याला नाही समजल्यात आजून .आपण त्या भावनांना वेळ दिला पाहिजे . आपल्यात ती ताकत आहे समजून घेण्याची आणि आपलं नातं छान बनवण्याची .आणि सई.....दुसऱ्याबरोबर लग्न करण्यापरीस तुझ्या राजनशीच कर न ?.....मला माहित आहे . कि......मला नवरा म्हणून स्वीकारायला वेळ लागेल ,पण सुरवात मैत्रीने करूया न ?"
त्याने तिचा हात धरून तिला जवळ घेतल . आज ती हसत होती .राजन ने समजावलेल कळंले बहुतेक .सार काही सोप्प झाल्या सारख वाटत होत .
दुसऱ्या दिवशी त्यांची कुंडली जुळवण्यात आली आणि लग्नाची तारीख ही ठरली .लग्न आता काही दिवसांवर होत घरात अगदी गोंधळ झाला होता पाहुण्यांचा .
"हे आणल का ? ते आणल का ? वस्तू बरोबर आहेत न ?"
"आज हळद आणि हा गोंधळ अशा प्रकारे?"
आई :- "रुकवत तयार झाली का ? साड्या आहेत न बरोबर ?मान पाण चुकला नाही पाहिजे बाई कोणाचा......"
बाबा :- "हो न ! नाही तर जावई आणि सई च्या घरातले रुसायचे आमच्यावर ?"
आजी :- "अग आधी नारळ पत्रिका देवा समोर ठेऊन हळद कुंकू वहा बर !"
बहिण :- "अया ! मेहेंदी हि आणायची राहिली ग ?आधी मी जाते आणायला....."
आत्या :-"अग !आजून हळद नाही तयार झाली का ?"
मावशी :- "सगळ समान भरलं न तुझं ?काही राहिलं नाही न ?"
ती :- "अरे बापरे !आई.....बाबा.......मी लग्न करून कुठे परदेशी नाही चाले हो ! इथेच आहे .?
आणि तिने आपल्या बाबांचा हात धरून अंगणात आणलं .
"आपल्या अंगणातून समोर पहिला न ? की ४ -५ माड्या सोडून जो गावातील सर्वात मोठा चिरेबंदी वाडा आहे न ?तो आमचाच हं बाबा !"
बाबा ती आणि सर्व घरातील मंडळी कौतुकाने हसू लागले .पण तितक्यात बाबांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ."बाळ इवलीशी होतीस गं !बोट धरून या अंगणात छोट्या छोट्या पावलांनी इथून तिथे पाळायचीस आणि मागे आई ........जेवनाच ताट घेऊन आणि आज.... किती हि झाला तरी तुझं लग्न होणार आणि आमची सई कायमची दुरावणार........."
सई ने बाबा ना घट्ट मिठी मारली आणि रडू लागली .पण बाबा तिची समजूत काढून घरात घेऊन गेले आणि तितक्यात अंगणातून हाक आली ."कासार आला गं !या सगळ्यांनी !" आणि तो क्षण विसरून परत सगळे तयारीला लागले .
लग्न उरकलं आणि सई चा गृहप्रवेश हि झाला .लग्ना नंतरच्या सगळ्या विधी म्हणजे , नावं घेण्यापासून ते तबकातून अंगठी शोधून काढण्या पर्यंतचे सगळे खेळ उरकून सर्वजन झोपण्याच्या तयारीला लागले .बरीच रात्र ही झाली होती . पण जागा नवीन असल्या कारणाने सईला काय झोप येईना . नंदा जावा सगळ्या मस्करी करत कधी झोपी गेल्या हे हि कळाल नाही . आणि हलक्या पावलांनी कोवळी किरण घेऊन पहाट आली . सगळे उटले काम उरकली .
राजन च्या खोलीतून अचानक आवाज आला ."आई.........ए आई !.....माझा चहानाष्टा वरच पाठव ग !मी खाली नाही येत ."
आणि आईने हाक मारली सईला ."सई !अग राजन ला चहानाष्टा घेऊन जा बर !"
ती आईन जवळ आली .तिने ते चहाच आणि नाष्ट्याच ताट उचल आणि शिड्यानी हळू हळू वर जाऊ लागली राजन नवता खोलीत अंघोळीला गेला होता .तिने ते ताट जवळच्या टेबलावर ठेवल तितक्यात तिला फुलांचा सुगंध आला तिने वर पाहिलं खिडकीतून दिसणार ते सोनचाफ्याच भलं मोठ बहरलेल फुलेल झाड सूर्याच्या कोवळ्या किरणांनी चमकत होत . सर्वत्र त्याचा सुगंध दरवळत होता वातावरण अगदी आनंदी झाल होत .ती खिडकीत जाऊन उभी राहिली . तिच्या चेहेऱ्याव त्या दरवळनारया हवेच्या वातावरणाचा आनंद होता .
तितक्यात राजन बाहेर आला त्याने मागून येऊन तिला मिठीत घेतल आणि हनुवटी तिच्या खांद्यावर ठेऊन तिच्या कानात हळूच फुंकर घातली आणि म्हणाला "तू आज खूप छान दिसतेयस गं ...!"
ती :- (ती त्याला खांद्याने धक्का देत म्हणाली )"राजन तू हे काय करतोयस .कामाला नाही जायच का ?"
तो :- "काय म्हणतेस तू ?एवढी छान बायको सोडून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणी कामाला जाईल का सई ?"
ती दचकली पण राजन ने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं .तिचा श्वास वाढला आणि धड धड हि लाज हि तितकीच वाटत होती . पण आपला मित्र असा हि असेल ,त्याच्या स्वभावाचा हा पेहेलू काही वेगळासा ,विचित्र ,पण हवा हवासा वाटला .
ती :- "राजन !सोड न मला........... आज पूजा आहे सत्यनारायणाची तयारी हि करायची आहे "आणि त्याची मिठी सोडून ती खाली आली . ती लाजली होती थोडी .
जस ती लग्ना आधी चिंतेत होती या नात्याला घेऊन तसं काही हि तिला वाटलं नाही त्याचा स्पर्श छान होता......लाजवणारा . तो मित्र हि होता .....पण नवरा असल्याची भावना आपोआप मनात कधी आली ,हे काळालच नाही .
संध्यकाळचे ७ वाजले होते .पूजाही उरकली होती आणि कामंही .पूजेला आलेल्या सर्वांनी सई च पोट भरून कौतुक केल होतं .तिला भरभरूण आशीर्वाद दिले होते .सार काही नीट आणि छान पणे पार पडलं होत .सई आता त्यांच्या खोलीत बसली होती सगळ्यांबरोबर गप्पा मारत पण राजन नवता घरी .बाहेर गेला होता .गप्पान मध्ये इतकं रंगले होते कि जेवणाची वेळ कधी जवळ आली कळालच नाही .राजन हि परतला होता तो खोलीत आला फ्रेश व्हायला .तितक्यात आईंनी हाक मारली जेवणा साठी . सगळे जमले जेवणही झाल गप्पा झाल्या झोपायची वेळ हि जवळ आली सगळे एक एक करून आपापल्या खोलीत निघून गेले .आता आई सईकडे बघू लागली तिच्या चेहेऱ्यावर एक हसू होता
आई :- "सई !जा बाळा तु ही झोप जाऊन राजन वाट पाहत असेल ."
सईला विचित्र हि वाटत होत आणि लाज हि वाटत होती .ती खोलीच्या दिशेने जाऊ लागली मनाची हृदयाची धडधड होत होती ती आत आली राजन खिडकी जवळ उभा होता तिने त्याला हाक मारली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारली .
राजन पूजे नंतर अचानक कुठे गेला ते तिला काळालच नाही ती शोधात होती त्याला तिला तो दिसलाच नवता . त्याने ही तील प्रतीसाद दिली आज सई ला झालेला स्पर्श आणि माळरानावर त्याने मारलेला त्या मिठी नंतर वाटलेली ती जाणीव आज तिला कळत होती तो स्पर्श एकसारखाच होता . आज तो पावसा सारखाच भासला असावा गार अंगावरती शहर आणणारा . हवा हवा सा वाटणारा .
"पण हे अस का वाटत आहे आज . तो तर माझा मित्रच आहे न मग हे असं वाटण्याच कारण काय ?"
आज कारण भेटल तिला . तीच त्याच्यावर आणि त्याच तिच्यावर आसलेल प्रेम जे त्यांना कळाल नाही पण आई बाबांना कळाल होत .
पहाट झाली सूर्याची ती नाजूक कोवळी सोनेरी किरण तिच्या आणि त्याच्या चेहेऱ्यावर पडली सई ला जाग आली ती राजन च्या कुशीतच होती . आज सई ला खूप गाढ झोप लागली होती . प्रसंन ही वाटत होत .तिने राजन कडे पाहिलं तो गाढ झोपेत होता . तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची एक छान शी पा घेतली आणि राजन हळूच हसला त्याने डोळे उघडले . तो जागाच होता फक्त काय होतंय याची वाट पहाट होता .सई उठली त्याने तिचा हात धरला ती फक्त मान हलून नाही म्हणाली . आणि तिच्या चुरगळलेल्या साडीचा पसारा आवरत .........नीट करत . अंघोळी साठी निघून गेली . आज कळल कि हे नक्की काय होत ? राजन बद्दलच प्रेम जे तिला प्रत्येक वेळी त्याच्या जवळ ठेवायचं . आणि त्याची जाणीव हि झाली आज .
लग्न झालं ,पण नात आजून घट्ट झाल .
चैताली कदम
Friday, January 13, 2012
Friday, January 6, 2012
मीरा आणि शिरीष..............
आपल्या प्रियकरा बरोबर पळून जाणारी प्रत्येक मुलगी बेशिस्त.......निर्लज........संस्कार आणि विनयशीलता नसलेली असते का...........?किंव्हा मुलाच्या माये पोटी समजुदार पणे वेगळ्या जातीची मुलगी करून तिला आदर आणि तिचे हक्क मान सनमान न देण हि चांगली गोष्ट आहे का ? नाही................
मला अस अजीबात वाटत नाही . आणि खंत वाटते.....................या गोष्टीची कि .
ती कितीही सोज्वळ आणि संस्कारी असली तरी ती पळून आलीये किंव्हा वेगळ्या जातीची आहे म्हणून तिला टाळत राहायच . म्हणूनच हा विषय मांडते कारण पळून जाणारी प्रत्येक व्यक्ती तशी नसतेच मुळात .
म्हणतात................. तिला आई वडिलांची जरा पण काळजी नाही . त्यांच्या इजातीची जरा पण परवा नाही पण सासू असा विचार का नाही करत कि तिला तुझ्या मुलाची काळजी होतीच नं . ती मनाने इतकी सोज्वळ आहे कि ती तिच्या आई वडिलांना समजावू शकते आणि छान संसार करून लोकांच्या वाईट उठलेल्या नजरा एक छान स्त्री आणि गुणी मुलगी म्हणून करू शकते . हो पण पळून गेलेला काळ आयुष्यातून पुसून नाही जाणार हे खर आहे पण तो वाईट नजरेने पाहण्याचा दृष्टीकोन तर बदलेल न ..................
अशीच एक................. मीरा
सदगुणी सुधृढ सुशील सोज्वळ संस्कारी विनयशील आहे .
महाविद्यालयातील शिक्षण संपून एका नामवंत कंपनीत उच्च पदावर काम करत होती . त्या वेळी तो तिला भेटला .शिरीष.........शिरीष नाव त्याच तो हि खूप हुशार सुधृढ सुशील आणि अगदी छान आणि शांत स्वभावाचा . त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर आगदी जीवापाड प्रेम होत . त्याने तिला सरळ लग्नासाठीच विंचरल सगळे होत खरं तर अस म्हणूया कि ऑफिस मधल्या सहकर्मचारीनि सहकार्य केल . विचारयला लावलच त्याला त्या दोघांना हि त्यांच्या भावना समजत होत्या पण व्यक्त नवत्या होत पण त्या सहकर्मचारीना सगळं समजत होत त्यांनी एक डाव मांडला त्यांनी सगळ्या ऑफिस मध्ये पसरवल कि तीच लग्न ठरल आहे आणि तो बेचेन झाला .
त्याने अचानक तिच्या जवळ येऊन काही न समजता न बघता तिला सार काही सांगून टाकलं आणि ती पाहतच बसली त्याच्या कडे .एका उंच मिनारावरून कडेलोट केल्या सारखा त्याचा चेहेरा झाला होता मुळात हे विचारणं म्हणजे तसाच काहीसं होत . तीने हसून मान खाली घातली आणि सगळे सहकर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले हसुलागले . सगळे तिला म्हणत होते मीरा हा तरी म्हण पण मीरा कशी हा म्हणेल लाजायला वेळ कुठे पुरला होता पण त्यातल्या त्यात तिने मान हलून कबुली दिलीच त्याला . सगळे त्यांची टिंगल करू लागले आणि मग वेळ होती आई बाबानां समजावण्याची त्याच्या आणि तिच्यापण . त्याची आई मान्य करायला तयार नवतीच पण त्यातल्या त्यात आपली मुलगी मीरा हिचा सुख शिरीष मध्ये पाहून तिचे आई बाबा मात्र तयार झाले . त्याने पण आई ला समजून तयार केलच . रुसून नाक मुरडून कमी पणा दाखून टोमणे मारून कसंबस लग्न उरकलं हि आणि गृहप्रवेशाच्या वेळ तेंव्हाही हा टोमणा ऐकायला मिळालाच
आमच्यात हे असाच होतं हिच पद्धत आहे आणि............असाच करावं लागेल .
मीरा काहीही बोलली नाही कारण तिला कोणाशीही उजत घालायची नवती आणि जेवढा शांत पणे घेता येईल तेवढा घ्यायचं होतं कारण इथे जर तीने काही प्रतीउत्तर दिला असतं तर दोष सर्वात आधी तिच्या आई बाबांना लागला असता आणि मग तिच्या जातीला . संस्कार हे जात ठरवत नसते माणूस ठरवतो कि ते आपल्याला आपलेसे करायचेत कि नाही आणि आपल्या अंगी बाळगायचे आहेत कि नाही आई बाबांना दोष देउन काही फायदा .कारण ते शिकवायचं काम करतात आपल्याला ते स्व:अंगी जोपासायचे कि नाही हे ठरवायचं असतं . मग एखादा गुण आपल्याला नाही जोपासता आला तर यात त्यांचा काय दोष .माणूस हा नेहमी स्वतंत्र विचारांचा असतो आणि किती हि कोणाची सहमती आसो किंव्हा नसो तो आपल्या मनासारखच वागतो . ऐकावे जनाचे करावे मनाचे या स्वरूपाने . आणि राहिली मीराची गोष्ट तर ती एक संजुदार आणि सुशिक्षित मुलगी आहे हे किती हि खर असलं तरी ती एका मोठ्या पदा वर काम करणारी स्वतंत्र विचारांची आणि आपले मुद्दे मांडणारी हक्कासाठी भांडणारी मुलगी आहे . पण तिला हे हि छान पणे ठाऊक आहे कि इथे हक्क गाजवण्या हि पेक्षा माणसं आणि नाती गोती जपण्याची जास्त गरज आहे . त्यांच्या मनात जागा मिळवण्याची जास्त गरज आहे .
मीराने सगळ्यांना समजून घेतल पण तिला समजून घेण्या साठी सगळ्यांना वेळ लागणार होता . हे तिला माहित होता तिने ते मनापासून स्वीकारल ही होत . पण माझ्या मते १ ने १० जणांना स्वीकारायला किव्हा समजून घ्यायला वेळ हा लागणारच मग त्या हि पेक्षा १० जणांनी १ ला स्वीकारायला हव . ठीक आहे स्वीकारण्याच लांबच पण समजून तरी घ्याव अशी अपेक्षा तरी करू शकतोना आणि १० नाही पण जास्तीत जास्त ६ जणांनी तरी तिला स्वीकारल असत तरी तिचा काम ६० % कमी झाला असत . तेवढा आधार मिळाला असता पण नाही इथे तिला शून्य पासून उभारायचं होतं तिची जागा मिळून घेण्या साठी ती झटत होती तरी हि तिच्या हाती यश येत नवतं ती निराशहि नाही झाली पण म्हणयला गेलं तर कुटुंबाच्या खाण्या पासून ते शिंकण्या पर्यंतच्या सगळ्या सवाई तिने म्हणजे सुनेने समजून घ्यायच्या . पण............... कुटुंब का नाही समजून घेत एका वेळी तिने जेवण तिच्या पद्धतीन बनवल तर रोज एकाच पद्दतीच खातोच न मग आज काही तरी नवीन चव बघू असा संजुदारीचा विचार का नाही करत ते लोक तिच्या बसण्या पासून ते सकाळी उठण्या पर्यंतच्या सवाई का बदलू इच्छितात आणि ती बदलायला तयार असते हि ....................तरी तिला समजून न घेता हे असाच का............. तसाच का................. करत टोकत राहायची सवय झाली असते . समजत नाही का....................का अस वागलं जात आणि तेही मग कुटुंबाला नातू किंव्हा नात मिळे पर्यंत ? आणि इतकं होऊन हि तसंच चालत राहत फक्त पद्दत बदलते बोलण्याची . मग असच असतं तर नवरया मुलाची आई का तयार झाली लग्नाला ?................. आणि सुनेने एवडे प्रयत्न करून ही तिला का समजत नाही ?............... आणि अस असुनहि सून का आजून हि तिच्या सासूच्या बाजूने बोलते ?............ सगळ्यांना सांभाळते सकाळी उठून ज्याला ज्याला जे हव नको ते समजुन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तरी हि ती कमी पड़ते अस का?.......का.......का वाटतं त्यांना ?????????? त्यांच मन कधी बदलणार याची वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्यायच का उरत नाही . हे सगळं असच का असतं ............आहे का उत्तर या प्रश्नाच आणि या वरच का संपत सगळ . हा विषय मी मांडला कारण कधी कळणार मिराचच नही पण तिच्या सारख्या अनेक मुलींच मन सासुला . तिला हि थोडा वेळ लगेल शिकायला तिला हि गरज लगेल तुमच्या मायेची.............. संजुद्दार पणाची ............ हे कधि तरी समजुन घ्या न .तिला रागाउनच सार काहि समजेल अशी समजुत का असते या लोकांची .ती जितक्या समजुतीने घेते तितक्याच समजुतीने तिला का समजून घेतल जात नाही . आणि तिचा तिरसकार केला जातो तरीही ती निभावण्याचा प्रयत्न करत राहते . पण असे वाटते हे कळाव सगळ्यांना आणि फार नाही पण थोड तरी सुधारावं आशी इच्छा बाळगते .
चैताली कदम
Tuesday, December 27, 2011
काही प्रश्न............
वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच कस समजतं ?
भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?
ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?
फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच ती का नसावी ?
पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर का झुकते ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?
चैताली कदम
Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)

.jpg)