Friday, July 20, 2012

पावसाची एक वेगळी सर.......


बाहेर मुसळधार पावूस पडत आहे ...............
सारं वातावरण अगदी थंडगार आणि गारटवणारआहे................
ऑफिस मध्ये खूप काम असल्यामुळे आजचा दिवस खूप थकवणारा होता ........
तरीही संध्याकाळी पावूस पडल्या नंतर अगदी तरतरीत ताजे तवाने वाटू लागले ..............
हो बाहेरच्या चिखल आणि टॅ्फीक मुळे चिडचिड होत होती पण पावसाची सुरवात असल्या मुळे चिडचिड आपोआप थांबतही होती .......
पावसाचा आनंद घेत आम्ही मैत्रिणीनी पाणीपुरीचा बेत देखील केला आणि मग गरमा गरम तिखटमीट आणि रसरशीत लिंबू लावलेला मक्याचा आस्वाद घेत स्टेशानच्या दिशेने निघालो...........
ट्रेन प्ल्याटफॉर्मला नुकतीच लागली होती आम्ही धावत पळत ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकी जवळची जागा पकडली.............
ट्रेनचा प्रवास अगदी मजेत सुरु झाला बाहेरच्या पावसाची आणि मक्याची मज्या घेत गप्पा रंगल्या तेवढ्यात ट्रेन पुढच्या स्टाँपला थांबली..............आणि भराभर सगळे आत शिरले त्या गर्दीत काही शाळेतील मुलं आणि त्यांची आई देखील होती त्यातली एक बाई पुढच्या सीट वरील बाईला सांगून आपल्या मुलाला बसायला जागा करून देत होती जागा झाल्यावर तो मुलगा टूनकण  उडी मारून तिथे बसला...............थोड्याच वेळात जागा  झाली तशी ती बाई देखील बसली पण कुणास ठावूक ती अचानक इकडे तिकडे पाहू लागली आणि एकटीच हसू लागली बडबडू लागली तिच्या मुलाला खेळवू लागली पण तिची पद्धत खूप वेगळीच होती सगळे तिच्याकडे पाहून हसू लागले तीच अस वागण......... तिच्या मुलालाही काळत होत...........
हे सगळे आपल्या आईला हसत आहेत हे पाहून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करु लागला ...आई नको न गं असं करू ...........गप्पं बस ना  गं ............ बघ सगळे हसतात तुला...
अस म्हणून तो त्याच्या आईला समजावू लागला तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला...........पण त्याचा काही उपयोग होत नसलेला पाहून त्याचे डोळे काठेकाठ भरले................शेवटी सहन न झाल्या मुळे कसलाही विचार न करता त्याचे अश्रु ओघळू लागले तेंव्हा त्याच्या डोळ्यात बाहेरच्या पावसा पेक्षाही जास्त तीव्रता आणि दुख होत आणि ते बाहेरच्या पावसाला देखील मात करत होता निव्वळ सात आठ वर्षाचा तो चिमुकला काय करू शकणार होता आणखीन .............
हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आले कि ती वेडी होती आणि सगळे शांत झाले................
काही रोजच्या बायकान कडून कळले कि ........तशी ती चांगली असते पण तीला मध्ये मध्ये वेड्याचे झटके येतात ..........त्या मुलाची ती तडफड पाहून खूप वाईट वाटले सगळे जन कसे हसत होते तिला एखाद्याच दुख: समजून न घेता आपल्या कडून दुसऱ्या व्यक्तीला खूप वाईट वागणूक दिली जाते . किंव्हा नकळत आपण कोणाला दुखवत तर नाही ना .अस नाही का वाटत या प्रसंगा वरून . तो मुलगा त्यावेळी काय विचार करत होता..............त्याच्या मनाला किती वेदना झाल्या ............. हे आपणही नाही सांगू शकत पण त्याच्या आईला सगळे हसतात हे त्याला पटलं नाही आणि ते थांबवण्याचा हि त्याने प्रयत्न केला . पण तो एवढासा मुलगा आतून किती तुटला असेल हे कस कळणार त्या हसणाऱ्या व्यक्तींना  . थोड्या वेळाने स्टेशन आल आणि आमच्या सोबत तो मुलगा हि आपल्या आईला घेऊन खाली उतरला आणि समोरच्या बाका वर जावून बसला आम्हीही त्याच्या सोबत थांबलो होतो थोडा वेळ................मग तीला थोड बरं वाटलं तस त्यांना टॅक्सी पर्यंत सोडून आमच्या मार्गी लागलो पण मला काही चैनच पडेना सारखा त्या मुलाचा चेहेरा डोळ्या समोर येत होता आपण आपल्या पालकांना आणि आपले पालक आपल्याला किती पुरत असतो नं ..........
आपण सतत एकमेकाच्या सह असतो आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेत ही ...................
पण कमाल त्या इवल्याश्या मुलाची कि त्याने आपल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.........
काही दिवसांनी संध्याकाळी आम्हाला  तो परत दिसला त्याची आई पण होती त्याच्या सोबत.... पण ती ठीक होती या वेळी..................
त्याने व तिने गप्पा हि मारल्या आमच्या सोबत आणि उपचार चालू आहेत असे ही समजले..................
अश्या प्रकारे पावसाची एक वेगळी सर......................अनुभवायला मिळाली 




चैताली कदम 

Wednesday, July 18, 2012

पंचाक्षर

दोन व्यक्तीतील एक वेगळी .पण आपलीशी वाटणारी गोष्ट .प्रेम ..........हि भावना त्या व्यक्तीला कधी कळते काही माहित नाही पण .एक मेकांजवळचा एक असा क्षण जो आपल्याला एकमेकानकडे पाहून आपल्यात काही तरी वेगळ असल्याची जाणीव देतो .एकमेकान मध्ये काही नसताना जेंव्हा दोन क्षण एकमेकान कडे पाहत .अस का झालं .हे का होत आहे .हि भावना येन नक्की काय आहे .काही तरी चुकल्या सारखं .लाजल्या सारखं......काही तरी जाणवल्या सारखं.....गुंतल्या सारखं ......त्यावेळची ती एक नजर आपल्यातल्या वेगळ्या नात्याची जाणीव करून देत असते .एवद्या दिवसानच्या सहवासत कधी अशी वेळ आली नाही आणि आज .आज अशी हि वेगळे पणाची भावना का ............मी आज ओळखल कदाचित त्याला.......आज जाणल जवळून .......मी अगदी गोंधळून गेले .एवढ्या सगळ्यांच्या गोंधळात फक्त आम्ही आम्हाला वेगळे वाटत होतो . तसेच कोणी आसपास असण्याची जाणीव हि होत नवती आमचे डोळे एकमेकाना शोधात होते डोळ्यातून जणू बोलतच होतो एकमेकांशी . हे काय होतं अद्याप कळालेलं नाही पण काही तरी नक्कीचं स्वच्छंदि आनंदी हरवल्या सारखी जाणीव होत होती हळू हळू त्या दिवसात त्याच्या सहवासाची सवय झाली ओढ लागली त्याच्याशी तासान तास बोलत बसण्याची आवड निर्माण झाली आमची भेट माझ्या  मामेबहीनीच्या लग्नात झाली म्हणजे तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या लांबच्या नात्यात आहोत पण घरातल्यांनी नाती खूप छान जपल्या मुळे चांगलीच ओळख होती सगळ्यांशी .एवढे वर्ष आम्ही भेटत आलो पण अशी ओढ कधी लागलीच नाही त्याची.............हे काहीस वेगळ होत . कदाचित हेच प्रेम असाव.............त्याच्याशी गप्पा मारणं त्याच्या सहवासात राहाण त्याला मनापासून मदत करण त्याची काळजी करण पण नाही मला त्याची शहानिशा करायची होती कदाचित हे आकर्षण हि असू शकत म्हणून मी बऱ्याच वेळा त्याला टाळलं भेटले नाही पण माझ्या मनातील त्याच्या बद्दलची भावना तशीच होती मग नंतर मी त्याला भेटण्याचं ठरवलं आणि आमच्यातील नात प्रियकर आणि प्रीयसित बद्दल माझ्या आईच नेहमीच म्हणन प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीच एकत्रीकरण म्हणजेच संसार कारण प्रेम हे एकटच जसं अपुरं आहे तसच लग्न हि...............दोन्ही शब्द अडीज अशारांचेच मग हे दोन्ही अडीज शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ती पूर्ण होतात मग कोणतही नात अपुरं राहण्याची काळजीच नाही ..........नाती अर्धवट ठेवून अमर होण्या खेरीज नाती पूर्ण करा आणि ती जागा ............जीवन पूर्ण होण्यासाठी जशी पंचमहाभूतांची गरज असते तसेच संसार पूर्ण होण्यासाठी प्रेम आणि लग्न याचे एकत्रीकरण म्हणजेच पंचाक्षर पाचअक्षरं याची गरज असते 




चैताली कदम 

Thursday, June 28, 2012

येरे येरे पावसा..............

येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

पावूस पडला झिम झिम झिम.........
आंगण झाले ओले चिंब.........
पावूस पडतो मुसळधार........
रान होईल हिरवे गार........

ये........गं ........ये ..............गं ...........सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............

पावसाळा सुरु झालाच.........मग आजच्या पावसात होड्या सोडल्या कि नाही मित्रानो ........आता मज्या येणार सर्वत्र थंडगार हिरवळ होणार.रिमझिम रिमझिम पावूस ,थंड थंड हवा ,गरमागरम भजी आणि चहा ,मातीचा सुवास ,कागदाच्या होड्या ,धबधब्याची सुरवात ,सकाळच धुकं ,गवतावरच दव,हवेतील ओलावा ,नदीनाले अगदी खळखळून वाहणार , आणि मोर.....मोर तर अक्षरशा नाचणार. आज खूप पावूस पडला अगदी आजी म्हणते नं ........धो धो .......तसाच आणि विजही गडगडली. आमचीच काय तर सगळ्या आज्या आभाळातील विजेला गंमत म्हणून गडगडनारी म्हातारी म्हणतात.लहान मुलं पावसात भिजून आजारी न पडण्यासाठी हा गंमतशीर उपाय असतो.म्हणजे लहान मुलं  घाबरून बाहेर जात नाही आणि घराच्या  आडोशालाच राहतात . आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे  आलेला हा उपाय.......बरेचसे लोक येरे येरे पावसा .....म्हणत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या  सोडण  पसंत करतात . तस लहानपणी आपल्या आई बाबांनी , शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला हस्तकला म्हणून रुमालाच्या घडी नंतर होड्या बनवायला शिकवले आणि घड्यांचा सराव म्हणून दहा वेळा तीच होडी करून घेतली  ह्या होड्या पावूस आला कि पावसाच्या पाण्यात सोडायच्या हं ........असे सांगितले .आणि आपण.........आपण अस करतो देखील हा वारसा वर्षोन वर्ष चालत आलेला आहे .के.जी मधील मुलांना रेन रेन गो अवे ..........असे जरी शिकवले तरी मुलंच नाही तर एकंदरीत सारेच जण  पावूस आला कि उड्या मारत टाळया वाजवाट ये रे.....ये रे...पावसा म्हणत होड्या बनवायला सुरवात करतात .होडी पाहिली कि पावसाची आणि पावूस पाहिलाकी होडीची आठवण येण स्वाभाविक आहे .आणि आपण हा उत्कुष्ट खेळ अगदी निरागसतेने खेळत असतो कधी आई वडिलान बरोबर तर कधी मित्र मैत्रिणीन बरोबर तर कधी हाताच बोट इवल्याश्या हातात अगदी घट्ट पकडून इवलीशी पावलं टाकत तुरु तुरु चालणाऱ्या गोड हसणाऱ्या आपल्या  बाळा बरोबर .आणि हि वेळ सगळ्यांवर येते .पावसाच्या पाण्यात होड्या सोडन हा पारंपारिक खेळ झाला पाहीजे अस नाही का वाटत तुम्हाला ? झाला पाहिजे काय..........मला तर तो आहे असाच वाटत . काही जणांना तर खिडकीत बसून पावूस पाहत हातावर पावसाचे थेंब जेलण्याची खूप हौस आणि काहीना पावूस आला कि भजी आणि चहा पिण्याची ,काहीना भिजण्याची . गावची मंडळी तर.........काही काम करत असतील आणि पावूस आला तर  पावसाच गाण देखील म्हणतात म्हणजे जशी ओवी असतेना तसाच हा प्रकार .हे मी ऐकलेलं आहे हं ..........

उब  र...............उब  र...............पावसा
तुझ्या बायका गेल्या ताका ............
तिकड लगोऱ्या ................
इकड उबोऱ्या.............

मग साक्षात चमत्कारच जणू.................चक्क पावूस जातो .पावूस हा सगळ्यांना किती आवडीचा आणि आपलासा वाटतो नं . म्हणूनच दर वर्षी  काहीही  झाल तरीही आपण नव्याने पावसासाठी उत्साही असतो . आणि दर वर्षी प्रमाणे
येरे येरे पावसा...................
तुला देतो...........पैसा.........
पैसा झाला खोटा................
पावूस आला मोठा ...........

ये........गं ........ये ..............गं ...........
सरी .................
माझे मडके भरी ...............
सर आली धावून ...............
मडके गेले वाहून ...............
म्हणत पावसाच स्वगत करतो ......................
ऋतू पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ....................
मग या वर्षी हातात होड्या घेऊन आपणही म्हणायचं नं ...................

ये रे ये रे पावसा ................





चैताली कदम

Tuesday, June 26, 2012

पुन्हा एकदा शाळे मध्ये.........

 उन्हाळ्याची सुट्टी संपवून..........................
फिरून गाव पालत घालून .आंबे ,काजू , फणसाने  तृप्त होऊन . आणि कडाक्याच उन सोसून , घामाच्या  झळा झेलून ,सारेजण शाळेच्या खरेदीस लागले ,नवीन नवीन वस्तू जसे  कपडे , चकचकीत शूज , नवीन बॅग , नवी कोरी पुस्तक ,  पावसाळी कपडे छत्र्या अगदी विविध आणि निरनिराळ्या रंगाच्या  तसेच पट्टी ,पेन्सील पासून वह्या पुस्तकांच्या कवर पर्यंत.सगळ्या गोष्टींची खरेदी एकदम मजेत आणि उत्साहाने सुरु  झालीये ..............बाजारात अगदी नवीन नवीन प्रकारच्या वस्तुकी  देखील आल्यात  तशीच  पावसाची हि उत्सुक्ता अवर्णनीय आहे .
शाळेत असताना..............सुट्टीची........विविध ठिकाणी फिरण्याची..................
मज्या करण्याची.गावाला जाण्याची.नातेवाइक मित्र मंडळीना भेटण्याची.आंबे ,काजू ,फणस खाण्याची.जंगलात फिरण्याची.झाडावर चढण्याची.आणि सुट्टी असताना.शाळेची.शाळेतील मित्र मैत्रिणींची.मधल्या सुट्टीची.डब्याची.डब्यातील खाउची.ऑफ तासाची.आवडत्या शिक्षकांची.ग्रुप मधल्या  गप्पांची .खिशातल्या चण्याची.गेट बाहेरील चिंचांची.कँटींनच्या सामोस्याची.शाळे बाहेच्या कट्ट्याची.अलारामच्या  बेलची  ओढ् लागते.आणि कधी एकदा शाळेत जातो असे वाटू लागते.
एवढ्या.......दिवसांच्या सुट्टी नंतर मज्या करून भटकंती करून एकदाची शाळा सुरु होणार.......सगळे मित्र मैत्रीण आपल्याला परत भेटणार खूप धमाल मस्ती मज्या पावूस............. आणि तो दिवस जवळ आला..मी खूप उत्साहाने उठून तयारी केली .झाल नेमका पाउस आला..! 
अरे बापरे..........आजचं  जाण बोंबलत  कि काय ? हा प्रश्न पडला पण लक्षात आल मग केलेल्या खरेदीच काय.चढवला रेनकोट आणि घर सोडल .मस्त पावूस पडत आहे .मध्ये मध्ये काही मित्रमैत्रिणी भेटत होत्या.....उत्साह हि वाढत होता शेवटी पावसाचा  आनंद लुटत शाळा गाटली शाळेच्या आवारात पोहोचताच मन अगदी प्रसन्न वाटू लागले असे वाटत होते कि शाळा हि खूप खुष आहे . आम्ही परत आल्या बद्दल आणि आमच स्वागत करत आहे . खर म्हणायच तर शाळा म्हणजे आपली आईच म्हणायला हवे कारण सगळा अभ्यास , संस्कार , नाती , खेळ , स्पर्धा , जेवण आपण तिच्याच देखरेखी खाली आणि तिच्या आवारातच करत असतो मुळात . आयुष्यातील अर्ध्याहून  जास्त वेळ आपण आणि शाळा एकत्र काढतो . म्हणून आपण शाळेला कधीच विसरू शकत नाही ..................... आम्ही सगळे शाळेच्या आवारातच उभे होतो .प्रार्थना सुरु झाली  आणि  मनाला वाटल चला.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............
.............पुन्हा एकदा शाळे मध्ये ..............


चैताली कदम

Thursday, June 7, 2012

पहिला पावूस.........


आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............

अंगावर येणाऱ्या थंड  शहाऱ्यांची ............... 

श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............

रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................


आठवण................गवतावरील  दवांची................

सकाळच्या ओलसर धुक्यांची..................

दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............

गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................


आठवण................वाट पहणाऱ्या  अतुर मोराची.................

तहानलेल्या चातक पक्षाची..............

भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................


आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............

आठवण.................पहिल्या पावसाची.............



चैताली कदम