Friday, October 12, 2012

अपूर्णतेची उमग

गेले काही दिवस माझं एका विषयावर लिखाण चालू आहे .पण या साठी खूप कष्ट करावे लागले.कोणा न कोणा व्यक्तीशी संवाद साधून त्याच्या मनातून अपूर्णतेच्या भावना काढणं हे खूप कठीण आहे .कारण कोणीही त्यांची भावना व्यवस्तीत अशी स्पष्ट केली नाही .किंबहुना करू शकत नाही .कारण सगळ्याच गोष्टी अपूर्ण असतात आणि आपण त्या पुर्ण असल्याचा फक्त आव आणत असतो .पूर्णतेची जाणीव करून आपल्या मनाची समजूत घालत असतो .खूप अडथळे आले हा विषय हाताळताना आणि हे हि कळलं कि व्यक्तीच्या मनात अपूर्णतेची एक तुच्छ बाजू सुधा असते .आई न होण किंव्हा शारीरिक सुखांन पासून वंचित असणं सुधा व्यक्तीला अपूर्ण करू शकतं हे आज कळलं .पण या सगळ्या संवादातून ,भाष्यातून इच्छापूर्ती हे अपूर्णतेच सर्वात मोठं कारण आहे अस मला आढळलं .एकदाचं माझ लिखाण पूर्ण झालं .पण मला एक कोड उमगलं आहे .जर आपल्या लिखाणाला मोज मापं म्हणजेच लिमीटेशन असतात मग सगळे लेखक जे लिहितात ते पूर्ण कसं म्हणता येईल .प्रत्येक लिखाण पूर्ण असून त्यातल्या त्यात अपूर्णच राहीलं नाही का ?जशी विचारांना खूप मोठी वाव असते तशीच लिखाणाला हि असते .सगळ्याच पूर्ण गोष्टी पूर्ण असतात हा आपला निवळ गैर समज असतों.कारण नाण्याच्या जश्या दोन बाजू तश्याच अपूर्णतेच्या सुधा .प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून गोष्ट पूर्ण कि अपूर्ण हे ठरते .
"मग नक्की अपूर्णता म्हणजे काय आहे ?"
"पूर्ण न होणारी एक अशी पोकळी जी आपण कधी हि भरून काढू शकत नाही ."
खर तर लेखक जितक्या वेळा आपलंच लिखाण वाचतो तेंव्हा तेंव्हा त्यात बदल करतो किंव्हा त्याला बदल करावासा वाटतो मग वाचणाऱ्यांच काय होत असेल .माझ लिखाण जरी मी पूर्ण झालं अस मी म्हणत असले तरी हे लिखाण जितके लोक वाचतील तितकं हे अपूर्ण होत जाईल अस मला वाटतं .आणि ते कोणा न कोणाच्या दृष्टीकोनातून अपूर्ण नसेल हे कशा वरून. लेखकाला वय नसतं हे जितकं खरं.तितकच त्याला अनुभव,जाणीव ,कल्पनाशक्ती आणि सुख दुःखा ची देवाणघेवाण असते .तरीही अपूर्णता टाळता येत नाही .हे तितकच खरं आहे .



चैताली कदम