स्पर्श असावा आसवां सारखा
ओघळताना जाणवणारा
कधी आनंद कधी दुखं
मनसोक्त वाहणारा .............
कधी असावा पावसा सारखा
हवे मध्ये मिसळणारा
गारव्याचा एक श्वास
मना मध्ये जपणारा...............
कधी असावा फुलासारखा
बेधुंद दरवळणारा
निसर्गात स्वतःची अशी
एक जागा बनवणारा ..............
कधी असावा नदी सारखा
खळखळून हसणारा
स्वरांच्या दुनियेत एक
नवीन सूर भरणारा ....................
कधी असावा पाण्या सारखा
नितळ शांत असणारा
पाहिलं जरी मनात
स्पष्ट पणे दिसणारा ..............
कधी असावा शब्दानं सारखा
मना पर्यंत पोहोचणारा
उमलून हसू ओठांवरती
सार काही बोलणारा .................
कधी असावा नजरे सारखा
सजवून सांगणारा
निरागस पणे मिथुन डोळे
मन स्थिती मांडणारा .................
कधी असावा श्वासांन सारखा
नेहमी सोबत असणारा
पापण्यांन सम निमिष भर मिठून
नवीन आस बांधणारा .................
चैताली कदम
ब्लॉग आणि ब्लॉगवरील लिखाण सुद्धा खूप छान आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete