मी दिसता क्षणी मला बिलगणारी ती
धुंद पावसात चिंब भिजणारी ती
सर होऊन भिजवणारी ती
फुलांच्या गंधात दरवळणारी ती
पाखरांच्या रंगात मिसळणारी ती
इंद्रधनुषातील रंग उधळणारी ती
दव होऊन चमकणारी ती
रात्रीच रुपेरी चांदण ती
पाण्यातील चंद्राच प्रतिबिंब ती
वसंत ऋतूचा मोहक मोहर ती
पालवीचा सुंदर बहर ती
पावसातील हवेचा गारवा ती
अंगावर येणारा शहर ती
माझ्यातला मी पणा जपणारी ती
तासान तास माझ्यात रुळणारी ती
बेधुंद होऊन गाणारी
मनसोक्त नाचणारी
खळखळून हसणारी
रिमझिम बरसणारी
आणि मी
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा
खळखळून हसणारी
रिमझिम बरसणारी
आणि मी
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा
चैताली कदम
No comments:
Post a Comment