Sunday, September 14, 2014

वेडा पाउस


वेडा पाउस चिंब भिजून गेला
नकळतच काही आठवणी देऊन गेला 
आठवणी एकत्र खेळलेल्या 
आठवणी एकत्र रुळलेल्या

कधी त्या दप्तरातून शाळेत गेलेल्या
शाळेच्या खिडकीतून पावसात भिजलेला
बाईंच्या खडूत ठळक उमठ्लेल्या
मित्रांच्या डब्यात पोठ भरून वाटलेल्या

मैदानाच्या मातीत धुंद दरवळलेल्या
कँटीनच्या खाउत मनसोक्त रमलेल्या
मधल्या सुट्टीत कल्लोळ मांडलेल्या
ऑफ तासात भेंड्या खेळलेल्या

कधी हसून टपली मारलेल्या
डोळे पुसून समजूत काढलेल्या
खिश्यातल्या चिंचा लपुन खालेल्या
गृहपाठाच्या वह्या उतरून काढलेल्या

शाबासकी मधून हवेत उढलेल्या
बाईंच्या आशीर्वादात प्रगती गाठलेल्या
रिझल्टच्या दिवशी धडधडून उठलेल्या
मित्रांच्या आठवणीत भरभरून जगलेल्या



                    चैताली कदम 

No comments:

Post a Comment