Thursday, September 25, 2014

पुन्हा नव्याने

ती स्थिरावलेली शांतता आणि नुकताच विजुन गेलेला दिवा त्याचा मंद दरवळणारा सुगंध क़ही तरी वेगळाच वाटतं आहे आज ….! 
पण ती शांतता बाहेर जरी स्थिरावलेली असली तरी कुठेतरी खोल ती अस्थिर होती . 
                          आणि आज माझ्या जीवाला चैनंच पडे  ना………  ! आज का असे वाटते आहे . म्हणजे……म्हणजे आज माझ्या मनाचा ठावच लागत नाहीये मला …… ! नक्की काही तरी आहे . पण काय ……. ? आज अगदी नव्याने उमलल्या सारख वाटत आहे .आणि मला आठवली ती संध्याकाळ . ती पहिली भेट .घरी कोणी नवतं सगळे नाटकाला गेले होते. ऑफिसच्या वर्क लोड मुळे मला जायला मिळाल नवत आणि शनिवार सुट्टी असताना हि ऑफिसचा दिवस भरून घरी आले होते . फ्रेश होऊन अशाच धुरकट वातावरणात बसले असता अचानक फोन वाजला अननोन नंबर म्हणून शंकेने फोन उचला .
'' हॅलो……………."
"आभ ………… !"
(आज बऱ्याच दिवसांनी कोणाला तरी माझी आठवण झाली होती ,थोडी दचकून ओळखीचा आवाज एकल्या सारखी . )
 "हो…. बोलते …. ! "आपण कोण …………?"
"मी…………मी…… शेखात बोलतोय आभा ………….!"
(माझे डोळे पाणावले माझा आवाज थरथरत होता . त्या थरथरत्या आवाजातच स्वतःला आवरत मी म्हणाले . )
"हो …………….बोल  नं कसा आहेस तू ……….?"
"मी ठीक आहे ……! तू कशी आहेस ………?"
"मी ही  ठीक ……!   आज इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी काय झाली रे तुला , आणि होतास कुठे इतके दिवस …………. ? नाही नाही वर्ष म्हणावे लागेल ……………. ! ."
"ते मी सांगेनच पण मला भेटायच आहे तुला आभा ………! भेटशील ……? प्लीज नाही नको म्हणूस ………"
"मी हसऱ्या स्वरात हो म्हणाले …पण कुठे …………?"
"मी तुझ्या घरा जवळच्या चौकातच आहे .……… !"
                             आता माझा थकवा नाहीसा झाला होता . पण मी जितक्या सहज हो म्हणाले होते . तितकीच गडबडले होते . इतक्या वर्षांनी तो भेटणार आहे . काय करू आणि काय नको असे झाले होते . पण कसबस आवरलं . 
''अगं……. वेडे तो वाट पाहतोय तुझी किती वेळ लावतेस…………… '' 
मी स्वतःशीच पुटपुटले .घराच दार लाऊन . 
'' कोणी आलं तर बाहेर गेली म्हणून सांगा काकू , आणि चावी द्या'' म्हणत किल्ली शेजारच्या काकून कडे भिरकावली . आणि निघाले तितक्यात त्याचा फोन . मी पटापट जिना उतरत फोन उचला . आणि घाई घाईत चालत राहिले . 
 '' हॅलो……………"
 "निघालीस का ? आभा ………"
" हो ……. कुठे आहेस तू ……………. ?"
" हा काय तुझ्या समोर ………!"
आणि माझ लक्ष त्याच्या कडे गेलं . मी हसले . तो रस्त्या पलीकडे गाडी जवळ टेकून उभा होता . तो रस्ता पार करता करता माझी धडधड वाढत होती .कदाचित त्याची ही तीच परिस्थिती असावी  अचानक लक्षात आल हातातला फोन मी अजून ठेवला नवता आणि त्याने सुधा .मग  स्वतःच्या गोंधळलेल्या मनाला समजावत फोन ठेवला  आणि आम्ही दोघे ही हसू लागलो .शब्द न सापडल्या मुळे पुन्हा तोच प्रश्न नव्याने विचारला त्याने . 
" कशी आहेस………… ?"
"मी ठीक ……!आणि तू ……………?"
"मी ठीक ……….!थोड बोलायच होता तुझ्याशी . इथे कुठे कॉफी शॉप असेल तर जाऊया मस्त कॉफी पीत बोलता पण यईल सविस्तर ."
"हो चालेल ………!"
त्याने माझ्या साठी गाडीच दार उघडून दिलं .आणि मी बसताच गाडीच दार लावल आणि स्वतःच्या जागी जाऊन बसला . त्याने गाडी सुरु केली आमच्या सोबत आता ती जीवघेणी शांतात सुधा प्रवास करू लागली होती . शाळेत वेण्या खेचून त्रास देणारा शेखर आज इतका वेल मँनर भासला मला .गाडीत पूर्ण शांतता पसरलेली आणि आम्ही अधून मधून एकमेकान कडे पाहत फक्त हसत होतो . आता हि शांतात मोडण गरजेच होत . त्याने पुढाकार घेऊन गाडीतल  एफ . म.  लावलं .
"कूच ना कहो………………………कूच भी ना कहो "………………
गाणं लागताच आम्ही दोघ हि हसू लागलो.इतक्या वेळे दर्वत असलेली ती शांतता त्या गाण्याने संपवली होती .

गाडी एका शांत पार्क जवळ येउन थांबली . आम्ही दोघे हि उतरून शांत चालू लागलो . त्याने सुरवात केली .
"आभा आता काय करतेस तू … ? म्हणजे जॉब वैगरे कि आणखीण काही …………… ?"
"हो मी जॉबला आहे ."आणि आवड असल्या मुळे पेपर हँडिक्राफ्ट शिकते आहे ."
"वा वा प्रगती आहे ……."
"हो का तू सांग ………… ?"
"शिक्षणा नंतर मुंबईत राहून काम करायचं ठरवलं .   सो … ! मी पण मुंबईतच जॉब ला आहे . एका नामवंत कंपनी मध्ये इंजीनियर आहे ."
"अच्छा …"अच्छा …" म्हणून इतके वर्ष गायब होतात राजे …!आणि मी इथे वेड्यासारख तुला शोधत होते . "
"काय ……? शोधत होते म्हणजे ……? "(तो थबकला आणि चालता चालता तिथेच थांबला होता . )
"अरे काही नाही रे सहज म्हणाले . चल तू असा थांबलास का मधेच . "(आणि मी वळले पुढच  पाऊल टाकायला तोच त्याने माझा हात पकडला )
" तू सहज नाही म्हणलीस आभा ……. खर सांग ………?"
मी असहाय होऊन मनातलं सगळं धडाधड बोलत गेले . 
"हो शेखर मी खूप शोधल तुला शाळे नंतर . कुठे गायब झाला होतास रे …… ? "तुझ्या मित्रांना विचारलं तर कळलं तू शिक्षणा साठी बाहेर गेलायस . आणि मी निराश झाले . 
वाटलं ………… वाटलं……तुला एकदा तरी सांगायला हवं होतं . मग तू गेला असतास तर चालं असतं तुला हे कळण खूप गरजेच होतं कि …………. कि माझं ………!"
ओठांवर येताच मी शांत झाले.माझ्या पाणावलेल्या डोळ्यां सोबत मी मान खाली घातली .
"आणि …… काय आभा " हेच ना तुझं मझ्यावर खूप प्रेम आहे . पण खरा तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो . "
तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला .
आणि माझ रडूच आवरेना 
"मी खूप शोधलं रे तुला शेखर . खूप शोधलं. माझं राहून गेलं होतं तुला सांगायचं कि तू मला खूप आवडतोस .खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर .मी नाही राहू शकत तुझ्या विना ."
आणि मी त्याला बिलगले .
"हो आभा मलाही तुला हेच सांगायचं होतं …."
 "रडू नको आभा " म्हणत त्याने माझे डोळे पुसले .आणि माझ्या कापाळावर चुंबन घेतलं त्याच्या स्पर्शाने लाजून माझा थरथराट झाला होता .
तितक्यात  पावसाचे काही थेंब आमच्यावर कोसळले . आम्ही जवळच्या एका झाडा खाली उभे राहिलो. त्याची माझ्यावरची स्थिरावलेली नजर माझी धडधड आजून वाढवत होती. आणि पाऊस थांबायच नावच घेईना .झाडातून पडणार ते पावसाचे थेंब आम्हाला थोड थोड भिजवत होते.मी ती स्थिरावलेली नजर आणि शांतता टाळण्यासाठी काही तरी बोलायच ठरवलं .
माझ्या वर किती प्रेम करतोस रे ………… ?
खूप ………….!
म्हणजे किती ……?
ओंजळी पुढे कर …….
मी ओंजळ पूढे करताच त्याने खिशातून बंध मुठ बाहेर काढली आणि माझ्या ओंजळीत उघडली .
माझी ओंजळी आता चोकलेट ने भरली होती. आणि कसली तरी किल्ली माझ्या हातात पडली .
"कसली किल्ली आहे ही " मी क्षण भर भ्रमित होऊन त्याला विचारलं . 
"ते साप्राईस आहे." तो जरा भाव खात म्हणाला .
थांबलेल्या पावसाचा अंदाज घेऊन तो जवळ येताच मी चटकन म्हंटल .
"चल जाऊया पाऊसही थांबला आहे . "
तो हसला थोडा "हो चल . "
गप्पा मारत चालता चालता आम्ही गाडी जवळ पोहोचलो आणि आमच मन एकमेकात कधी गुंतल कळलंच नाही .
''थांब हा " म्हणत त्याने गाडीच दार उघडून एक सुबक नक्षीदार संगमरावरी बॉक्स काढला . 

"हे काय आहे "
"ती मगाशी दिलेली किल्ली याचीच आहे मँडम ."
मी त्याच्या कडे चमकून पाहिलं तर त्याने डोळ्यानेच खुणवलं . 
उघडून पाहते तर त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि अंगठी होती . मला ते साप्राईज खूप आवडल होत . माझ्या चेहेच्यावर आता फक्त आनंदच दिसत होता .
"माझ्याशी लग्न करशील . "
मी लाजून " हो " म्हणाले आणि त्याच्या कुशीत विसावले जितक्या सहज हे होत गेलं तितक्याच सहज आम्ही लग्न बंधनात अडकलो आणि तो रोमांस कुठे तरी हरवून गेला .आता या प्रियकराचा पक्का नवरा झाला आहे . आणि त्याला माझ्या साठी वेळच नाहीये . पण खरतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत . त्याला माझ्यासाठीच काय तर स्वतःसाठी हि वेळ नाहीये . त्याला माझी , आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत . पण त्याला का कळत नाही कि हे  सगळ काही पूर्ण करता करता तो मला खूप मागे सोडून आला आहे .  आणि याच कारणाने दोन दिवसापूर्वी आमच्यात कडाक्याच भांडण झालं . कारण लग्ना नंतर त्याचे आई बाबा अधून मधुन गावी जात असतात त्याकारणाने घरी फक्त आम्ही दोघेच असतो . रात्र भर कंकणी होतीच पण मी दूर लक्ष केलं .कसबस त्याला डबा बनून दिला.माझी विचारपूस करून . 
" बर वाटत नसेल तर नको जाऊस ऑफिसला " असा सल्ला हि दिला . 
"हो ठीक आहे  . "
आणि तो गेला निघून ऑफिसला .
पण अचानक माझी ताबेत खूप खराब झाली . आणि माझं ऑफिसला जाण रद्द झालं मी बराच वेळ घरी अशीच पडून होते . पण या माणसाने  एकही फोन करून विचारल नाही . उलट आता सहन नाही होत आहे ताप पण भरला म्हणून मीच गेले दोन तास त्याला फोने करत होते . मग म्हंटल जाऊदेत उरलेली भाजी पोळी  खाऊन औषध घेऊन गप्प पडून रहाव . आणि मी कधी झोपून गेले ते कळलंच नाही . उठून पाहिलं तर सात वाजले होते . मी तापाच्या गुंगीत बराच वेळ झोपून होते . आता थोडस बरं वाटतय .घाई घाईत फोन चेक केला पण याचा एकही कॉल नावाता . तितक्यात दारावरची बेल वाजली . उठून दार उघडायला थोडा वेळ लागला तर . 
" किती वेळ "म्हणत चीढला . आता माझा पारा चढला होता .आणि माझा तोल सुटला . 
"खर तर मी तुला हे विचारायला हव आहे ………करत काय होतास तू इतका वेळ …? मी  इतक्या वेळा फोन केला उचालास का तू …….?. अरे मला बर नाहीये साधा फोर्मिलीटी म्हणून तरी फोन करायचास…………. अरे घरी कोणी नसत काही बर वाईट झालं तर कस कळवायचं तुला . तूला वेळ आहे का माझ्या साठी ……………. ? सांग ना शेखर ……………. ?  कळतंय का तुला मी काय बोलते.………….? किती घुसमट होत असेल माझी . अरे इनमिन दोन माणसं आपण तरी आपल्यात काही संभाषण नाही . माझ हसणं दूरवलं आहे माझ्या पासून . माझी काय अपेक्षा आहे रे  तुझ्या कडून थोडसं गोड बोलण आणि थोडस प्रेम बस न . पण तुला वेळच नाही माझ्या साठी . तुझ्यात माझ्यात खूप अंतर निर्माण झालाय . माझा शेखर हरवलाय माझ्या कडून .  तो मला वेळ देत नाहये . "
मी सगळी घुसमट त्याच्या वर काढली . पण तो ………………. तो निघून गेला घरातून . मागे न बघता .
                         

                         तितक्यात वाऱ्याची झुळूक आली आणि खिडकी आपटली . माझं आठवणीत गुंतलेलं मन भानावर आलं . पण आज मी खूप खुश आहे . सकाळी त्याने त्याच्या वागण्यातून मला आशर्याचा धाक दिला आहे .भांडणा नंतरच्या दोन दिव्साच्या अबोल्या नंतर का जाने कुणास ठाऊक आज त्याने माझ्या ओठांवरचा तीळ पुन्हा नव्याने अनुभवला . आज इतक्या दिवसांनी जुनी झालेली गोष्ट त्याला परत नवी कशी वाटू लागली आहे . कदाचित ते प्रेम त्याच्या मनाला पुन्हयांदा स्पर्श करून गेलं असावं . त्याचा डोळ्यात काही तरी वेगळाच जाणवलं आज . किती सुंदर असतेना हि भावना अगदी सुखावणारी आपला प्रियकर पुन्हा नव्याने आपल्याला भेटणार ह्याची जाणीव काही वेगळीच असते . तो जेंव्हा मला हे बोलला तेंव्हा त्याच्या चेहेऱ्या  वरची ती चमक पाहण्या सारखी होती  . मी लाजले त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि अचानक अंगात असंख्य विजा कडाडल्या . श्वास जड झाला आणि माझ मन असच हवेत हलके हलके तरंगत राहील . त्या स्पर्शाला धग होती थंडीत कुडकुडनाऱ्या व्यक्तीला हवी असलेली उब . त्या स्पर्शाची जाणीव आता अंगावर शहरा आणून जाते . तितक्यात तो आला काहीस गुणगुणत .
"आभा…… आभा .……. चल आज कुठेतरी फिरायला जाऊया ."
मी चमकून मागे वळून पाहिलं तर स्वारी जाम खुशीत होती . मी पडत्या फळाची आज्ञा समजून तयारी ला लागले . आटपून बाहेर आले तर साहेब गाडीची किल्ली हातात फिरवत शिटी वाजवत उभे होते .अगदी त्या पहिल्या भेटीची जाणीव झाली आज . आम्ही खूप फिरलो . लॉंग ड्राईव म्हणजे नाकी काय हे मला आज कळल . मस्त कँडल लाईट डिनर करून . आईस क्रीम खात समुद्र किनारी गप्पा मारत फिरलो . 

" आभा ……….मला माफ कर  मला कळली आहे माझी चूक . खर तर आपल्यात दुरावा नाही पण मला आजकाल तुला वेळ द्यायला नाही मिळत , आणि मला ते जाणवलं आपल्यातला दुरावा कमी करण्याचा मी थोडा प्रयत्न केला . आणि पुन्हा तुझी अशी घुसमट होऊ देणार नाही याची काळजी घेईन "म्हणत मला मिठीत घेतलं .
आणि मी विसावले त्याच्या कुशीत …………………
 "आज या नवऱ्याचा प्रियकर झालेला मी नव्याने अनुभवला आहे  . "


चैताली कदम  

 

1 comment: