सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ . त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळात नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही . एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते ,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ . थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं……
प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा अनुभव सुधा असु शाकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं . निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा अनुभव सुधा असु शाकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं . निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत हि भावनाही तितकीच तीव्र असते . तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल .
तर ……………. तर ती मिसळली त्या रांगेत जणू कधी ती दुरावलीच नवती अचनक त्यांचा एक भाग झाली होती .
माणसाच हि असच काही होत असेल का .………?
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण नावाच फेरोमोन पेरत असेलच न………?
ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….?
ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .
त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले
कुठे दुरावलास तू ……………?
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… !
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……!
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….?
मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
मला आठवण पडली होती त्याची शाळेतल्या त्या एकमेकाना लपून छपून पाहणाऱ्या प्रेमाची .शिकवणीच्या तासाला माझ्या काडे लापून छपून पाहण्याऱ्या त्या डोळ्यांची . शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान . आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस . सगळे आता चिडवु लागले होते काही गोष्टी घरी हि कळल्या होत्या . अल्लड वय म्हणून घरातल्यांचा खूप आक्रोष हि सहन करावा लागला . अर्धवट शाळा कशी बंद करणार म्हणून दादा आता सोडायला आणायला येऊ लागला होता .मला काही त्रास होऊ नये आणि आमचं अस वागण सगळ्यांच्या नजरेत येत आहे हे पाहून माझ्याकडे त्याने बघण बोलण टाकल होत . फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढाच काळात होत . काही दिवस झाले मी आजारी होते म्हणून सुट्ट्या घेतल्या . वाटल एखादा तरी निरोप येईल मैत्रिणी कडे त्याचा पण तस काही झालं नवतं . उलट कळलं कि तो खूप आजारी आहे . नंतर बरं वाटल्यावर रोजनिशी सुरु झाली अजून अशक्त पणा होताच पण दहावीच वर्ष त्यात परीक्षा जवळ आल्या मुळे शाळेत जाण गरजेच होत . तो दोन दिवस आलाच नाही . जीव कासावीस झाला खूप काळजी वाटू लागली . आणि तिसऱ्या दिवशी कंटाळत शाळेत गेले तर तो आला होता . पण खूप अशक्त . माझे डोळे पाणावले होते त्याला पाहून आणि त्याचे हि . मग नंतर नंतर आमच बोलणच व्हायचं नाही . असेच काही दिवस गेले आणि शाळेचा निरोप समारंभ जवळ आला . आम्ही खुश होतो . थोड बोलायला मिळेल पण आता परीक्षेसाठी सुट्ट्या मिळणार होत्या म्हणून थोड नाराज ही . आम्ही सगळे सजून निरोप समारंभां साठी आलो . थोड बोलणं झाल मन शांत झाल . गाण्यांच्या भेंड्या खेळलो , खाऊ खाला , वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना .आज दादा आणायला येणार नवता कारण मैत्रिणीनी घरी येउन मला न्यायचं आणि सोडायचं मान्य केलं होत . मी त्यांना सांगून थोडा वेळ त्याला भेटायला गेले त्या रोजच्या ठिकाणी खूप रडले मी त्याला बिलगून आणि तो हि . आज आम्ही काही बोलोच नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .थोडावेळ थांबून मी निघाले मैत्रिणी सोबत .नंतर काही दिवसानी परीक्षा हि सुरु झाल्या . दहावीचा अभ्यास म्हणून सगळे अभ्यासात मग्न झाले होते .काही दिवसांनी परीक्षा संपली . कसे बसे २ महिने गेले . आणि वेळ आली रिजटची . आम्ही सगळे जमलो एकत्र . वर्गात सगळे पास झाले होते . तो हि आणि मी हि . आम्ही खूप आनंदात होतो . शाळे नंतर आम्ही त्या तळया जवळ भेटलो . आमच्याकडे आजही बोलायला काही नवता फक्त रडून हाल झाले होते . त्याने मला सावरल
डोळे पुसून मला शांत केलं .
मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी … मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… पण मी येईन नक्की मला तुझ्या सोबत राहायचं आहे . …………. !
मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल .
******************************
पण ……… पण ………… तो आलाच नाही .मी बरीच वर्ष वाट पहिली त्याची ……तो कुठेतरी दूर निघून गेला होता माझा विचार न करता . मला न सांगता . पण मग माझी हि काही कर्तव्य होती आणि मग माझ माझ्या आई वडिलांना लग्ना साठी नाही म्हणनं कठीण झाल होत .त्यांनी माझ लग्न लाऊन दिलं . स्वसोईने सुशिक्षित , श्रीमंत ,उच्च घराण सगळ्या सुखसोई सवाईने पडताळून दिल्या होत्या . मी खूप खुश आहे तो खूप छान आहे . एक व्यक्ती म्हणून , मित्र म्हणून , प्रियकर म्हणून आणि नवरा म्हणून हि . मला तो खूप खुश ठेवतो .पण आज तुझी आठवण आली . कारण कुठे तरी मी पोखरली गेलीये तुझ्या मुळे . तुझ्या वरच प्रेम मला या कातरवेळी सतत आठवत राहत आणि मला रीत करत जात . रोज दिवेलागणीच्या वेळी मला ओढ लागते ती त्या तळ्याकाठच्या भेटीची
वाटतं……………वाटतं आज हि तू माझी तिथेच वाट पाहत अशील पण हा माझा निवळ गैर समाज आहे . पण आता मला भूतकाळात आणि वर्तमानकाळात गल्लत नाही करायची . माझा नवरा मला खूप जपतो त्याची पत्नी म्हणून मला खूप मान मिळतो . आणि त्याच्या बद्दल माझी हि काही कर्तव्य आहेत . माला सगळ मागे ठेऊन त्याच्या सोबत पुढे
जावच लागणार . आणि मला ते आवढेल . माझी करतवेळ जरी तुझ्या साठी चुकचुकली तरी कधी ना कधी ती गोड आठवण होऊन माझ्या नवऱ्या साठी हि चुकचुकेल .
आता ………. आता या गोष्टीला पूर्ण विराम लावला पाहिजे . आणि मी ठामपणे तो डबा बंद केला .
चैताली कदम
कातरवेळ खूप छान !!
ReplyDeleteधन्यवाद ! प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
Deleteम्याडम हृद्यस्पर्शी लिखाण वाटले
Deleteखूपच छान मांडलित कथा अप्रतिम
Delete" कातरवेळ " खूपच छान ...हृदयस्पर्शी आहे ..
ReplyDeleteधन्यवाद ! प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
ReplyDeleteम्याडम तिन्ही सांजेची नेमकी वेळ कोणती?यावेळी घराचे दार उघडे ठेवायचे असते का
Deletesunder
ReplyDeleteHeart touching!!!
ReplyDeleteनमस्कार
ReplyDelete१५ भारतीय भाषांमधील मोबाईल ई-बुक्सचे एकमेव वितरक व प्रकाशक असलेले डेलीहंट यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. आपल्या ब्लॉगवरील साहित्य ई-बुक्स स्वरुपात प्रसिद्ध करण्यास आपण उत्सूक असाल तर आपल्याला मदत करायला आम्हाला आनंद होईल. आपले स्वतःचे लेखन असल्यास तेही आपण इथे प्रसिद्ध व वितरीत करू शकता. डेलीहंटवर तुम्ही हे साहित्य विकत किंवा मोफत ठेवू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. रितसर करारपत्र होऊन सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. याशिवाय आम्ही बुक्स बुलेटीन नावाचा एक ब्लॉग चालवतो. त्यात तुम्ही लिखाण करू शकता. आमच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्यास आपण जरूर संपर्क साधा – pratik.puri@dailyhunt.in
खूप छान!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteApratim Chaitali....
ReplyDeleteधन्यवाद
Deletekupach chan
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteमनातील भाव व्यक्त होतात व भूतकाळात हरवते मन कथा वाचल्यावर
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच छान कातरवेळ
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chhan
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच छान कधी कधी भूतकाळ हा वर्तमानकाळच टॉनिक बनून जातो
ReplyDeleteधन्यवाद
Deleteकातरवेळ खुपच छान ह्रुदयाला स्पर्शुन जात
ReplyDeleteकातरवेळ खुपच छान ह्रुदयाला स्पर्शुन जात
ReplyDeleteNICE ONE !
ReplyDeleteI have sent u a mail. Plz take a look once.
ReplyDeleteAbhijeet.