ट्रेन प्ल्याटफॉर्मवर लागली होती.ती धावत पळत गर्दीतून रस्ता काढत धक्के खात धडा धड शिड्या उतरत प्ल्याटफॉर्म वरआली आणि तितक्यातच ट्रेन सुटली .पण ऑफिसला उशीर झाल्या मुळे तिने रोज प्रमाणे धावत ट्रेन पकडली .
हुश ...SSSSS असा आवाज काढत दीर्घ श्वास घेतला .आत पाहिलं तर सगळ्या सीट्स फुल
"आज शनिवार असून हि बसायला जागा नाही "स्वतःशीच ती पुटपुटली .
पलीकडच्या दाराजवळ उभी राहिली .हँड्सफ्री कानाला लाऊन रेडीओ वरची गाणी ऐकत बँगेतील पुस्तक काडून वाचू लागली.गाणी ऐकत पुस्तक वाचनं हि तिची जुनी सवय .परत तिने पुस्तक बंद केलं.आज कसल्या तरी विचारात होती ती .थोडी गाड्बडलेली .त्या पुस्तकाला कवटाळून डोळे मिठून शांत उभी राहिली ते तिचं स्टेशन येई पर्यंत.जनु ते पुस्तकाच्या कुशीत विसावली असावी .स्टेशन आलं तशी ती उतरीली बँगेत पुस्तक ठेवत .मोबाईल रेडीओचा आवाज वाढवला .इकडे तिकडे पाहत सगळं काहीं नव्याने अनुभवत ती ऑफिस पर्यंत पोहोचली तिची हि रोजची सवय रोज नवीन काहीतरी शोधायचं.आज शनिवार असूनही खूप काम होतं .पण तिने ते सहज निभावलं .जवळ जवळ ऑफिस सुटायची वेळ झाली. सगळ्या मैत्रिणी मिळून आज हॉटेल मध्ये पार्टी करणार होत्या .ती पार्टी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची होती .पार्टी इंजॉय केली .आणि परत आपल्या रस्त्याने घरी निघाली गड्बाडलेली ती परत आपल्या मूळ परिस्थितीत आली काही तरी बनण्याचं स्वप्न मनात घेऊन जगत असलेली ती .आज काचेसारखे स्वप्नाचे तुकडे हातात घेऊन जगात होती .चालता चालता तिची पाऊलं एकांतासाठी आपोआपच जवळच्या बागे कडे वळल.बागेत अगदी शांतता होती .सगळी कडे हिरवळ हवेतील गारवा .जागोजागी लावलेल्या दिव्यांनी बाग अगदी उजळून निघाली होती .ती बागेतील बेंच वर जाऊन बसली .
परत शांत अशी स्वतः मधेच अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती नुकतीच रुमालाने डोळे पुसू लागली .स्वतःशीच पुटपुटली मला तो M.B.A. कोर्स करायचा होता .पण त्या पेक्षाहि वाईट वाटल ते बाबांच्या म्हणण्याचं बाबांनी कसला हि विचार न करता मला असं का म्हंटल माझं शिक्षण झाल्यावर मी भावंडाना सांभाळणार नवते का . M.B.A.ची विचार पूस करण्या खातर आम्ही इंस्टीटूट मध्ये गेलो .फी ऐकल्यावर बाबा त्यांना फक्त "हो आम्ही सांगतो तुम्हाला नंतर "अस म्हणत बाहेर पडले .
परत शांत अशी स्वतः मधेच अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती नुकतीच रुमालाने डोळे पुसू लागली .स्वतःशीच पुटपुटली मला तो M.B.A. कोर्स करायचा होता .पण त्या पेक्षाहि वाईट वाटल ते बाबांच्या म्हणण्याचं बाबांनी कसला हि विचार न करता मला असं का म्हंटल माझं शिक्षण झाल्यावर मी भावंडाना सांभाळणार नवते का . M.B.A.ची विचार पूस करण्या खातर आम्ही इंस्टीटूट मध्ये गेलो .फी ऐकल्यावर बाबा त्यांना फक्त "हो आम्ही सांगतो तुम्हाला नंतर "अस म्हणत बाहेर पडले .
मी बाबान कडे पाहिलं तर म्हणाले
"कसं जमेल आपल्याला" मी म्हणाले "
"बाबा तुमचे ते सर्विस मिळालं ते वापरूयात का ?म्हणताच बाबा
"नको तुला दिले तर मग माझ्या दोन मुलाचं काय मी ते पैसे फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवणार आहे
तुम्हा सगळ्यांच्या नावावर "
मला हे ऐकून खूप वाईट वाटलं ते पैसे माझ्या साठी खर्च करून मी माझ्या भावंडाना बघणार नवते का ते पुढच्या शिक्षणा साठी तयार होई पर्यंत मी चांगली कमावती झाले असते .आणि ठाम पणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली असते .हे का नाही कळलं बाबांना .असो त्या वेळी बाबांना जे पटल ते त्यांनी केलं .मला जे पटत ते त्यांनी कराव अशी माझी अपेक्षा हि नवती . फक्त दुख झाल ते त्यांच्या बोलण्याच.आज मी एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कामाला आहे .माझ्या कुटुंबाला आणि माझ्या भावंडाना व्यवस्तीत सांभाळते आहे आणि ते दोघाही आज शिकून एका चांगल्या कंपनीत नोकरी करत आहेत .माझे कष्ट सार्थकी लागले याच विचाराने सुखावले आहे मी आज .आणि मन दाटून आले सकाळी हि याच विचारात होते मी. पण आज दुख होण्या पेक्षा अभिमान वाटतो आहे स्वतःचाच कि आपण इतक्या छान वडिलांच बाळ आहोत. कारण जरी त्यांनी मला ते पैसे त्या वेळी दिले नसले तरी कदाचित त्यांना माहित होता कि मी माझ आयुष फक्त त्या कोर्सपुर्तच नाहीये . ते जर का नाही झाल तर मी नवीन पर्याय शोधेनच करियर साठी आणि मी तो शोधलं हि. माझ लग्न हि झाल . बाबांनी माझ लग्न लावताना कसलाही विचार न करता ते फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवलेले सगळे पैसे काढून माझ लग्न खूप धूम धाम मध्ये केल अगदी माझ्या मनासारखं कसलीही उणीव न ठेवता .तेंव्हा मला कळलं बाबा तेंव्हा नाही का म्हणाले होते त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता कि मी काही तरी मार्ग काढेन किंव्हा नवीन पर्याय शोधेन करियर साठी आणि सगळ निट करेन पण त्यांना ते पैसे माझ्या लग्नाला वापरायचे होते.त्यांच्या आयुष भाराची कमी त्यांनी माझ्या लग्ना साठी वापरली एकही पैसा न ठेवता. त्यातच सगळ आल किती मोठी आहेना हि भावना त्यात माझाच भवितव्य होत आणि त्यांना माहित होता कि मी माझ्या भवंडाना सोडून नाही राहू शकत. आणि अस घडल माझ करियर त्यातून मी कमावलं माझ्या वडिलांचा प्रेम त्यांच्या आयुष्य भाराची कमाई म्हणजे माझ धामधूम मध्ये झालेलं लग्न जे प्रत्येक बाबांचं स्वप्न असता .
चैताली कदम
khupach sundar anubhav ahe mam
ReplyDelete