आपल्या प्रियकरा बरोबर पळून जाणारी प्रत्येक मुलगी बेशिस्त.......निर्लज........संस्कार आणि विनयशीलता नसलेली असते का...........?किंव्हा मुलाच्या माये पोटी समजुदार पणे वेगळ्या जातीची मुलगी करून तिला आदर आणि तिचे हक्क मान सनमान न देण हि चांगली गोष्ट आहे का ? नाही................
मला अस अजीबात वाटत नाही . आणि खंत वाटते.....................या गोष्टीची कि .
ती कितीही सोज्वळ आणि संस्कारी असली तरी ती पळून आलीये किंव्हा वेगळ्या जातीची आहे म्हणून तिला टाळत राहायच . म्हणूनच हा विषय मांडते कारण पळून जाणारी प्रत्येक व्यक्ती तशी नसतेच मुळात .
म्हणतात................. तिला आई वडिलांची जरा पण काळजी नाही . त्यांच्या इजातीची जरा पण परवा नाही पण सासू असा विचार का नाही करत कि तिला तुझ्या मुलाची काळजी होतीच नं . ती मनाने इतकी सोज्वळ आहे कि ती तिच्या आई वडिलांना समजावू शकते आणि छान संसार करून लोकांच्या वाईट उठलेल्या नजरा एक छान स्त्री आणि गुणी मुलगी म्हणून करू शकते . हो पण पळून गेलेला काळ आयुष्यातून पुसून नाही जाणार हे खर आहे पण तो वाईट नजरेने पाहण्याचा दृष्टीकोन तर बदलेल न ..................
अशीच एक................. मीरा
सदगुणी सुधृढ सुशील सोज्वळ संस्कारी विनयशील आहे .
महाविद्यालयातील शिक्षण संपून एका नामवंत कंपनीत उच्च पदावर काम करत होती . त्या वेळी तो तिला भेटला .शिरीष.........शिरीष नाव त्याच तो हि खूप हुशार सुधृढ सुशील आणि अगदी छान आणि शांत स्वभावाचा . त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर आगदी जीवापाड प्रेम होत . त्याने तिला सरळ लग्नासाठीच विंचरल सगळे होत खरं तर अस म्हणूया कि ऑफिस मधल्या सहकर्मचारीनि सहकार्य केल . विचारयला लावलच त्याला त्या दोघांना हि त्यांच्या भावना समजत होत्या पण व्यक्त नवत्या होत पण त्या सहकर्मचारीना सगळं समजत होत त्यांनी एक डाव मांडला त्यांनी सगळ्या ऑफिस मध्ये पसरवल कि तीच लग्न ठरल आहे आणि तो बेचेन झाला .
त्याने अचानक तिच्या जवळ येऊन काही न समजता न बघता तिला सार काही सांगून टाकलं आणि ती पाहतच बसली त्याच्या कडे .एका उंच मिनारावरून कडेलोट केल्या सारखा त्याचा चेहेरा झाला होता मुळात हे विचारणं म्हणजे तसाच काहीसं होत . तीने हसून मान खाली घातली आणि सगळे सहकर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले हसुलागले . सगळे तिला म्हणत होते मीरा हा तरी म्हण पण मीरा कशी हा म्हणेल लाजायला वेळ कुठे पुरला होता पण त्यातल्या त्यात तिने मान हलून कबुली दिलीच त्याला . सगळे त्यांची टिंगल करू लागले आणि मग वेळ होती आई बाबानां समजावण्याची त्याच्या आणि तिच्यापण . त्याची आई मान्य करायला तयार नवतीच पण त्यातल्या त्यात आपली मुलगी मीरा हिचा सुख शिरीष मध्ये पाहून तिचे आई बाबा मात्र तयार झाले . त्याने पण आई ला समजून तयार केलच . रुसून नाक मुरडून कमी पणा दाखून टोमणे मारून कसंबस लग्न उरकलं हि आणि गृहप्रवेशाच्या वेळ तेंव्हाही हा टोमणा ऐकायला मिळालाच
आमच्यात हे असाच होतं हिच पद्धत आहे आणि............असाच करावं लागेल .
मीरा काहीही बोलली नाही कारण तिला कोणाशीही उजत घालायची नवती आणि जेवढा शांत पणे घेता येईल तेवढा घ्यायचं होतं कारण इथे जर तीने काही प्रतीउत्तर दिला असतं तर दोष सर्वात आधी तिच्या आई बाबांना लागला असता आणि मग तिच्या जातीला . संस्कार हे जात ठरवत नसते माणूस ठरवतो कि ते आपल्याला आपलेसे करायचेत कि नाही आणि आपल्या अंगी बाळगायचे आहेत कि नाही आई बाबांना दोष देउन काही फायदा .कारण ते शिकवायचं काम करतात आपल्याला ते स्व:अंगी जोपासायचे कि नाही हे ठरवायचं असतं . मग एखादा गुण आपल्याला नाही जोपासता आला तर यात त्यांचा काय दोष .माणूस हा नेहमी स्वतंत्र विचारांचा असतो आणि किती हि कोणाची सहमती आसो किंव्हा नसो तो आपल्या मनासारखच वागतो . ऐकावे जनाचे करावे मनाचे या स्वरूपाने . आणि राहिली मीराची गोष्ट तर ती एक संजुदार आणि सुशिक्षित मुलगी आहे हे किती हि खर असलं तरी ती एका मोठ्या पदा वर काम करणारी स्वतंत्र विचारांची आणि आपले मुद्दे मांडणारी हक्कासाठी भांडणारी मुलगी आहे . पण तिला हे हि छान पणे ठाऊक आहे कि इथे हक्क गाजवण्या हि पेक्षा माणसं आणि नाती गोती जपण्याची जास्त गरज आहे . त्यांच्या मनात जागा मिळवण्याची जास्त गरज आहे .
मीराने सगळ्यांना समजून घेतल पण तिला समजून घेण्या साठी सगळ्यांना वेळ लागणार होता . हे तिला माहित होता तिने ते मनापासून स्वीकारल ही होत . पण माझ्या मते १ ने १० जणांना स्वीकारायला किव्हा समजून घ्यायला वेळ हा लागणारच मग त्या हि पेक्षा १० जणांनी १ ला स्वीकारायला हव . ठीक आहे स्वीकारण्याच लांबच पण समजून तरी घ्याव अशी अपेक्षा तरी करू शकतोना आणि १० नाही पण जास्तीत जास्त ६ जणांनी तरी तिला स्वीकारल असत तरी तिचा काम ६० % कमी झाला असत . तेवढा आधार मिळाला असता पण नाही इथे तिला शून्य पासून उभारायचं होतं तिची जागा मिळून घेण्या साठी ती झटत होती तरी हि तिच्या हाती यश येत नवतं ती निराशहि नाही झाली पण म्हणयला गेलं तर कुटुंबाच्या खाण्या पासून ते शिंकण्या पर्यंतच्या सगळ्या सवाई तिने म्हणजे सुनेने समजून घ्यायच्या . पण............... कुटुंब का नाही समजून घेत एका वेळी तिने जेवण तिच्या पद्धतीन बनवल तर रोज एकाच पद्दतीच खातोच न मग आज काही तरी नवीन चव बघू असा संजुदारीचा विचार का नाही करत ते लोक तिच्या बसण्या पासून ते सकाळी उठण्या पर्यंतच्या सवाई का बदलू इच्छितात आणि ती बदलायला तयार असते हि ....................तरी तिला समजून न घेता हे असाच का............. तसाच का................. करत टोकत राहायची सवय झाली असते . समजत नाही का....................का अस वागलं जात आणि तेही मग कुटुंबाला नातू किंव्हा नात मिळे पर्यंत ? आणि इतकं होऊन हि तसंच चालत राहत फक्त पद्दत बदलते बोलण्याची . मग असच असतं तर नवरया मुलाची आई का तयार झाली लग्नाला ?................. आणि सुनेने एवडे प्रयत्न करून ही तिला का समजत नाही ?............... आणि अस असुनहि सून का आजून हि तिच्या सासूच्या बाजूने बोलते ?............ सगळ्यांना सांभाळते सकाळी उठून ज्याला ज्याला जे हव नको ते समजुन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तरी हि ती कमी पड़ते अस का?.......का.......का वाटतं त्यांना ?????????? त्यांच मन कधी बदलणार याची वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्यायच का उरत नाही . हे सगळं असच का असतं ............आहे का उत्तर या प्रश्नाच आणि या वरच का संपत सगळ . हा विषय मी मांडला कारण कधी कळणार मिराचच नही पण तिच्या सारख्या अनेक मुलींच मन सासुला . तिला हि थोडा वेळ लगेल शिकायला तिला हि गरज लगेल तुमच्या मायेची.............. संजुद्दार पणाची ............ हे कधि तरी समजुन घ्या न .तिला रागाउनच सार काहि समजेल अशी समजुत का असते या लोकांची .ती जितक्या समजुतीने घेते तितक्याच समजुतीने तिला का समजून घेतल जात नाही . आणि तिचा तिरसकार केला जातो तरीही ती निभावण्याचा प्रयत्न करत राहते . पण असे वाटते हे कळाव सगळ्यांना आणि फार नाही पण थोड तरी सुधारावं आशी इच्छा बाळगते .
चैताली कदम
No comments:
Post a Comment