Tuesday, January 17, 2012

सई............

                   सर्वत्र हिरवळ पसरलेली.....हिरवळ.....ओली.....मन तृप्त करणारी ....हलका हलका पाउस .....सारं काही हलकस पुसठ दिसत होत .समोर असलेला तो धबधबा अगदी तृप्त होऊन नदीच्या मिठीत झेप घेत होता .पांढरा शुभ्र......मनात कसलाही क्लेश नसलेला ....

                  वातवरन  अगदी छान आनंदी होऊन .घुंगरांचा साज करून नाचत होत वाजत  होत......गार वाऱ्याने  अंग अगदी शहारून येत होतं .ओठांची ती होणारी थरथर......डोळ्यांची उघडझाप......तिचे ते ओले काळे  भोर केस चेहर्‍याला अगदी घट्ट मिठी  मारत होते .ओंजळीत पडणारा तो पाऊस कधी साठून ओंजळीतून ओघळून जात होता ,ते हि  कळत  नवतं . पण त्याच्या होणाऱ्या स्पर्शाची माज्याच काही निराळी होती .चेहर्‍यावर पडणारे ते पावसाचे थेंब .......खूप .....खूप छान दिसत होती ती .तिची ती भिजलेली उजळ कांती अस्सल मोल्यवान हिऱ्या सारखी लख्खं चमकत होती .तो  जांभळा रंग तिच्यावर खूप  उठून दिसत होता .तितक्यात मागून एक हाक आली. "सई?ए सई........"

                   ती पटकन मागे फिरली . तिचे ते ओले केस तिच्या चेहेऱ्यावर पसरले आणि  त्याने  तिला  मिठीत घेतल . ती  काहीहि  बोली नाही .तशीच स्तब्द उभी  राहीली .जणू  काही  हरवलीच  त्याच्या मिठीत  . आज काहीस वेगळं वाटलं तिल . तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि आल्या आल्या तिच्या शोधात इथपर्यंत येऊन पोहोचला होता . कारण त्याला माहित होता ,सई त्याला  तिथेच  भेटेल .तिने अलगत मिठी सोडवली . पण तिचे डोळे वर पाहण्याची अनुमतीच देत नवते .कसंबसं ती  केस नीट करत हसत म्हणाली ."आता आलास ?मी कधीची वाट पाहते तुझी......."

तो : - "रागावली  अशील न ? हो पण कंटाळली अशील  असं मी चुकूनही नाही  म्हणणार .कारण हा पाऊस हा निसर्ग......तुझा पहिला  मित्र...........हो नं ?सई .....बाई ?
ती :- "जा नं रे ?तुला किती वेळा सांगितलं आहे .सई बाई  नाही......... म्हणायच म्हणून ?"
तो :- "ओके.......मग ......बाई  म्हणू न ?"
ती :- "ए ! नाही हं !हे हि नाही म्हणायचं !"
तो :- "बर.....रुसुबाई !नका गाल फुगून बसू आता  . आणि भिजतेस कशाला ग ? सर्दी झाली कि रडत बस मग हं ?"
ती :- "भिजणार आणखी भिजणार ....."
तो :- "भिज.......आणि मग पड आजारी आणि बस रडत. "

                           दोघांनी  थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग तो तिला घरी घेऊन आला  . मस्त बाईक वरून.......

सुसाट गोड आणि थंड गार वाऱ्या बरोबर गप्पा मारत ,भिजत पावसाचा आनंद घेत . खर तर हे दोघही लहानपणापासूनचे मित्र मैत्रीण एकमेकांच्या कुटुंबची हि छान ओळख होती .आज  ते  सगळे चहाला एकत्र जमले होते  . हे दोघ घरी येताच सगळे  त्यांच्या कडे एक चिडवणारया स्मित हास्याने पाहू लागले .त्या दोघांना हि काही कळालं नाही . ते दोघ हि फ्रेश होऊन आल्यानंतर  त्यांच्यासह चहा प्यायला बसले . तेवढ्यात बाब म्हणाले "तुम्हा दोघांशी आम्हाला एक विषयावर बोलायचं आहे .आम्ही अस ठरवल आहे कि तुम्ही दोघही छान मित्र मैत्रीण तर आहातच . मग आयुष्यभाराचे सोबती बनायला काय हरकत आहे ? एवढा छान ओळखताच न एकमेकांना ?मग आता लग्न ही उरकून टाकू अश्याने मुलगी ही जवळ राहील आणि तुमची मैत्रीही कायम राहील ." दोघही एक मेकांन कडे पहायला लागले काहीच काळात नवतं पण सार काही विचित्र वाटू लागलं होतं . हो म्हणायचं कि नाही म्हणायचं हे हि कळात नवतं .सर्व खुश होते .सई च्या मनाची चांगलीच घाल मेल झाली होती आणि ती राजन ला कळात हि होती .तो हाच विचार करत होता कि मी तिच्या जवळ जावं ,तिला जवळ घेऊन समजवावं ,पण अस करू शकत नवतं हे हि तितकाच खरं होत .सई तिथून उठून तिच्या खोलीत निघून गेली आणि जाऊन खिडकी पाशी उभी राहिली .बाहेर आता सार काही शांत झाल होतं .पण हवेत तो गारवा तसाच होता . संध्याकाळचे ६ :३० वाजले होते .झाडांवर तो ओलावा ,हवेत तो धुंद मातीचा सुगंध,ओला गारवा  आणि थोडा अंधार ही .वातावरण खूप छान होतं अगदी रमणीय .आणि तितक्यात तो मागून आला .त्याने तिच्या खंद्यावर हात ठेवला . ती दचकली .तिने चटटकन मागे पाहिलं आणि त्याच्या कडे न पहता थोडा वेळ मागीतला  .

                  त्याने हि तसाच केलं , तोही निघून गेला तिथून .कारण तिला खरच गरज होती एकांताची .रात्र भर विचार केला या विषयावर  आणि......आणि  दोघांनी हि दुसऱ्या दिवशी होकार दिला लग्नासाठी . त्याला तसाही हे नात मान्य होतं . कारण ती आपली मैत्रीनच आहे . ती आपल्याला आणि आपण तिला छान समजून घेऊ शकतो ,मग हे लग्न झालं तर काही हरकत नाही . पण तिच्या मनात हा विषय खूप घोळ घालत होता . तिला काही सुचेनास झालं होतं . आई बाबांच्या म्हणण्याला तिने हि होकार दिला खरा .तरी हि तो आपला मित्र आहे ,मग आपण त्याला आपला नवरा म्हणून कस काय स्वीकारायचं ?हेच समजत नवतं . ती थोडी चिंतेतच होती.

                ती परत  माळरानावर निघून गेली . जेणे करून थोडा एकांत मिळेल . तिथे तिची मैत्रीण  गंधा भेटली .ती हि गावातील तिची एक छान मैत्रीण .तीने तिला अचानक विचारल कि ,"काय झालं ग !अशी चिंतेत का दिसतेस ?"

ती :- "गंधा माझ  लग्न ठरलं ग......"
गंधा :- "अया......खूप छान ग ! कधी ....?कुठे....?कोणा सोबत.....?"
ती :- "राजन !"
गंधा :- "कधी आहे  लग्न ? ए !पण तू या करणा मुले काळजीत आहेस का ?आग तो तुझा छान मित्र आहे न ?मग किती छान !जास्त टेंशनच  नाही न ?खूप छान जमेल तुमच .तो चुकला ,तर तू सांभाळ आणि तू चुकलीस ,तर तो सांभाळेल आणि तस पण तुमच्या कुटुंबच चांगलाच  जमत न ?मग काय?"
ती :- "पण .........पण तो माझा चांगला मित्र आहे आणि हे सगळ........."
गंधा :- "अग ! वेडा बाई !तेच तर म्हणते न मी ?कि तो तुझा  छान मित्र आहे . मग त्याच्या व्यतिरिक्त तुला जास्त कोण समजू शकेल आणि अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष काढणारच आहेस न ?मग ओळखीच्या  व्यक्ती बरोबर काढायला काय  हरकत आहे ?जरी काही प्रोब्लेमस असतीलच ना ?तर त्याच्या बरोबर बोल आणि सोडव .तस हि तू तुझा बेस्ट फ्रेंड म्हणतेस  न त्याला ?त्याच्या शिवाय आता तुला जास्त समजून घेणार कोणी नाही ग !सई ? सई माझ ऐक त्याच्या बरोबर बोल या विषयावर ."
ती :- "तस  तू बरोबर म्हणतेस ग !मी बोलेन या विषयावर त्याच्याशी ."
गंधा :- "अंहं ?आता पासून त्यांच्याशी म्हणायचं हं सई "

                   सई  छान हसली आणि तिने ठरवल कि ती राजन शी बोलेल या विषयावर . ती निघाली तिथून तिच्या प्रश्नच उत्तर मिळाल्याप्रमाणे आणि दोघी ही गप्पा मारत घरी निघून गेल्या.

                    संध्याकाळी घरी पोहोचल्यावर अचानक तो दिसला .आज त्याला पाहून तिच्या हृदयाची धडधड का होत होती कुणास ठाऊक .पण ती.......ती  धड धड छान होती .ती जाणीव काही वेगळीच होती .ती  त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली "मला काही बोलायचं आहे तुझ्याशी ."आणि सरळ तिथून निघून तिच्या खोलीत गेली .त्या खिडकीत जाऊन उभी राहिली त्याची वाट पहात .तो आला .तिला त्याची चाहूल लागताच तिने सुरवात केली . 

ती :- "राजन !हे  जे काय होतंय ,ते मला नाही काळात आहे रे !आपण छान मित्र-मैत्रीण आहोत.मग.......... अचानक ?हे असं लग्न ?"
तो :- "सई मी तुझा मित्र आहे आणि तूच म्हणतेस न ?....कि माझ्या शिवाय तुला कोणी नाही समजू शकत ?मग आपण हे लग्न करूया .आणि तस हि आपल्याला एकमेकान साठी भावना आहेत . पण त्या आपल्याला नाही समजल्यात आजून .आपण त्या भावनांना  वेळ दिला पाहिजे . आपल्यात ती ताकत आहे समजून घेण्याची आणि आपलं नातं छान बनवण्याची .आणि सई.....दुसऱ्याबरोबर लग्न करण्यापरीस तुझ्या राजनशीच कर न ?.....मला माहित आहे . कि......मला नवरा म्हणून स्वीकारायला वेळ लागेल ,पण सुरवात मैत्रीने करूया न ?"

                  त्याने तिचा हात धरून तिला जवळ घेतल . आज ती हसत होती .राजन ने समजावलेल  कळंले बहुतेक .सार काही सोप्प झाल्या सारख वाटत होत .

                  दुसऱ्या दिवशी त्यांची कुंडली जुळवण्यात आली आणि  लग्नाची तारीख ही ठरली .लग्न  आता काही दिवसांवर होत घरात अगदी गोंधळ झाला होता पाहुण्यांचा .

"हे आणल का ? ते आणल का ?  वस्तू बरोबर आहेत न ?"
"आज हळद आणि हा गोंधळ अशा प्रकारे?"
आई :- "रुकवत तयार झाली का ? साड्या आहेत न बरोबर ?मान पाण चुकला नाही पाहिजे  बाई कोणाचा......"
बाबा :- "हो न ! नाही तर जावई  आणि  सई च्या  घरातले रुसायचे आमच्यावर ?"
आजी :- "अग आधी नारळ पत्रिका देवा समोर ठेऊन हळद कुंकू वहा बर !"
बहिण :- "अया ! मेहेंदी हि आणायची राहिली ग ?आधी मी जाते आणायला....."
आत्या :-"अग !आजून  हळद नाही तयार झाली का ?"
मावशी :- "सगळ  समान भरलं न तुझं ?काही राहिलं नाही न ?"
ती :- "अरे बापरे !आई.....बाबा.......मी लग्न करून कुठे परदेशी  नाही चाले  हो ! इथेच आहे .? 

        आणि तिने आपल्या बाबांचा हात धरून अंगणात आणलं .
      "आपल्या अंगणातून समोर पहिला न ? की  ४ -५  माड्या सोडून जो गावातील सर्वात मोठा चिरेबंदी वाडा आहे न ?तो आमचाच हं बाबा !"

                  बाबा ती आणि  सर्व घरातील मंडळी कौतुकाने हसू लागले .पण तितक्यात बाबांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ."बाळ इवलीशी होतीस गं !बोट धरून या अंगणात छोट्या छोट्या पावलांनी इथून तिथे  पाळायचीस आणि  मागे  आई ........जेवनाच ताट घेऊन  आणि आज.... किती हि झाला तरी तुझं लग्न होणार आणि आमची सई कायमची दुरावणार........."

                  सई ने बाबा  ना घट्ट मिठी मारली आणि रडू लागली .पण बाबा तिची  समजूत काढून घरात घेऊन गेले  आणि तितक्यात अंगणातून  हाक आली ."कासार आला गं !या सगळ्यांनी !" आणि तो क्षण विसरून परत सगळे तयारीला लागले .


                  लग्न उरकलं आणि  सई चा  गृहप्रवेश  हि  झाला .लग्ना नंतरच्या सगळ्या विधी म्हणजे , नावं घेण्यापासून ते तबकातून अंगठी शोधून काढण्या पर्यंतचे सगळे खेळ उरकून सर्वजन झोपण्याच्या तयारीला लागले .बरीच रात्र ही झाली होती . पण जागा नवीन असल्या कारणाने सईला काय झोप येईना . नंदा जावा सगळ्या मस्करी करत कधी झोपी गेल्या हे हि कळाल नाही . आणि हलक्या पावलांनी कोवळी किरण घेऊन पहाट आली . सगळे उटले काम उरकली .

                   राजन च्या खोलीतून अचानक आवाज आला ."आई.........ए आई !.....माझा चहानाष्टा वरच पाठव ग !मी खाली नाही येत ."

                  आणि आईने हाक मारली सईला ."सई !अग राजन ला चहानाष्टा घेऊन जा बर !"

              ती आईन जवळ आली .तिने  ते  चहाच  आणि नाष्ट्याच ताट उचल आणि शिड्यानी हळू हळू वर जाऊ लागली राजन नवता खोलीत अंघोळीला गेला होता .तिने ते ताट जवळच्या टेबलावर ठेवल  तितक्यात तिला  फुलांचा सुगंध आला  तिने  वर  पाहिलं  खिडकीतून   दिसणार  ते  सोनचाफ्याच भलं मोठ बहरलेल फुलेल  झाड सूर्याच्या कोवळ्या किरणांनी चमकत होत  . सर्वत्र त्याचा सुगंध दरवळत होता वातावरण अगदी आनंदी झाल होत .ती खिडकीत जाऊन उभी राहिली . तिच्या चेहेऱ्याव त्या दरवळनारया  हवेच्या  वातावरणाचा आनंद होता .

              तितक्यात राजन बाहेर आला त्याने मागून येऊन तिला  मिठीत  घेतल आणि हनुवटी तिच्या खांद्यावर ठेऊन  तिच्या कानात हळूच फुंकर घातली आणि म्हणाला "तू आज खूप छान दिसतेयस  गं ...!"

ती :- (ती त्याला खांद्याने  धक्का देत म्हणाली )"राजन तू हे काय करतोयस .कामाला नाही जायच का ?"
तो :- "काय म्हणतेस तू ?एवढी छान बायको सोडून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणी कामाला जाईल का सई ?"
                ती दचकली पण राजन ने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं .तिचा श्वास वाढला आणि धड धड हि लाज हि तितकीच वाटत होती . पण आपला मित्र असा हि असेल ,त्याच्या स्वभावाचा हा पेहेलू काही वेगळासा ,विचित्र ,पण हवा हवासा वाटला .

ती :- "राजन !सोड न मला........... आज पूजा आहे सत्यनारायणाची  तयारी हि करायची आहे "आणि त्याची मिठी सोडून ती खाली आली . ती लाजली होती थोडी .

                  जस  ती  लग्ना  आधी चिंतेत होती या नात्याला घेऊन तसं काही हि तिला वाटलं नाही त्याचा स्पर्श छान होता......लाजवणारा . तो मित्र हि होता .....पण नवरा असल्याची भावना आपोआप मनात कधी आली ,हे काळालच नाही .

                   संध्यकाळचे ७ वाजले होते .पूजाही उरकली होती आणि कामंही .पूजेला आलेल्या सर्वांनी सई च पोट भरून कौतुक केल होतं .तिला भरभरूण आशीर्वाद दिले होते .सार काही नीट आणि छान पणे पार पडलं होत .सई आता त्यांच्या खोलीत बसली होती सगळ्यांबरोबर गप्पा मारत पण राजन नवता घरी .बाहेर गेला होता .गप्पान मध्ये इतकं रंगले होते कि जेवणाची वेळ कधी जवळ आली कळालच नाही .राजन हि परतला होता तो खोलीत आला फ्रेश व्हायला .तितक्यात आईंनी हाक मारली जेवणा साठी . सगळे जमले जेवणही  झाल गप्पा झाल्या झोपायची वेळ हि जवळ आली सगळे एक एक करून आपापल्या खोलीत निघून गेले .आता आई सईकडे बघू लागली तिच्या चेहेऱ्यावर एक हसू होता

आई :- "सई !जा बाळा तु ही झोप जाऊन राजन वाट पाहत असेल ."

                सईला विचित्र हि वाटत होत आणि लाज हि वाटत होती .ती खोलीच्या दिशेने जाऊ लागली मनाची  हृदयाची धडधड होत होती ती आत आली राजन खिडकी जवळ उभा होता तिने त्याला हाक मारली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारली . 

                   राजन पूजे नंतर अचानक  कुठे  गेला ते तिला काळालच नाही ती शोधात होती त्याला तिला तो दिसलाच नवता . त्याने  ही तील प्रतीसाद  दिली  आज सई ला झालेला स्पर्श आणि माळरानावर त्याने मारलेला त्या मिठी नंतर वाटलेली ती जाणीव आज तिला कळत होती तो स्पर्श एकसारखाच होता  . आज तो पावसा सारखाच भासला असावा गार  अंगावरती  शहर  आणणारा . हवा  हवा सा  वाटणारा .

                     "पण हे  अस का वाटत आहे आज  . तो तर माझा मित्रच  आहे न मग हे असं वाटण्याच कारण  काय ?" 

                    आज कारण भेटल  तिला . तीच  त्याच्यावर आणि त्याच तिच्यावर आसलेल प्रेम जे त्यांना कळाल नाही पण आई बाबांना कळाल होत .

                                                 
                                                   पहाट  झाली  सूर्याची ती नाजूक कोवळी सोनेरी किरण  तिच्या आणि त्याच्या  चेहेऱ्यावर  पडली  सई ला जाग आली ती राजन च्या कुशीतच  होती . आज सई ला खूप  गाढ झोप लागली होती . प्रसंन  ही वाटत होत .तिने राजन कडे पाहिलं तो गाढ झोपेत होता . तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची  एक छान शी  पा घेतली आणि राजन हळूच हसला त्याने डोळे उघडले . तो जागाच होता फक्त काय होतंय याची वाट पहाट होता .सई उठली त्याने तिचा हात धरला ती फक्त मान हलून नाही म्हणाली . आणि तिच्या चुरगळलेल्या साडीचा पसारा आवरत .........नीट  करत . अंघोळी साठी निघून गेली . आज कळल कि हे नक्की काय होत ? राजन बद्दलच  प्रेम जे तिला प्रत्येक वेळी त्याच्या जवळ ठेवायचं . आणि त्याची जाणीव हि झाली आज .

लग्न झालं ,पण नात आजून घट्ट झाल .





चैताली कदम

No comments:

Post a Comment