वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच कस समजतं ?
भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?
ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?
फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच ती का नसावी ?
पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर का झुकते ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?
चैताली कदम
No comments:
Post a Comment