Friday, December 23, 2011

गोष्ट एका वयाची

                                           
                   तीची नी माझी खूप जुनी ओळख . पण  भेट मात्र क्वचितच  व्हायची त्या दिवसात . ते म्हणजे कॉलेज  संपल्या नंतर चे  वधू वर  शोधण्याचे दिवस आणि एके दिवशी रस्त्यात अचानक मला ती भेटली  मैत्री वाढत  गेली . माझ्या आई वडिलांनी तिला मागणी घातली आणि आमच लग्न हि झाल  . आज आम्ही खूप खुश आहोत . एवढी वर्ष छान आणि सुखाने संसार करण्या बद्दल तिला   शब्बासकी  द्यायला हवी तशी संकटं आली  भांडणं  हि झाली पण आम्ही  दोघांनी  ती खूप छान रित्या हाताळली .
                  आमच्या हिला लिखाणाची खूप आवड त्या निमिताने  पुण  पाहायला जायचं म्हणत  होती  तसच मैत्रिणी च्या घरी तिला भेटायला हि  . पण १ आठवडा झाला मला तिची आठवणं  येत होती  . काही झाल तरी तिची सवय झाली आहे न २५ वर्ष जी झाली लग्नाला आणि आज आमच्या लग्नाचा वाढ दिवस आहे मी सकाळी सकाळी पाय मोकळे करावे म्हणून घरा जवळच्या बागेत फेरफटका मारायला म्हणून गेलो आज काल पहाटे खूप थंडी असते . अचानक ती मला दिसली  मी थोडा वेळ थांबलो . तशी ती लांबच होती पण मला अस्पष्ट दिसतं होती . कदाचित तिने मला ओळखलं असावं ती लांबूनच हसत  आली मी खर तर तिला ओळखलंच नाही म्हणजे ओळखलं पण मला विश्वास नवता ती कधी आली आणि बागेत काय करते .पण जस जशी ती जवळ येत गेली तस तशी मला स्पष्ट दिसू लागली . किती बदली होती ती या आठवडयात  . अस  होण  साहजिक होत . वयाच्या ५०  व्या  वर्षी ती कशी दिसायला हवी  होती आणखी . तरी हि ती या वयात खूप सुंदर दिसतं होती . आणि कदाचित आज लग्नाचा वाढदिवस म्हणून आणखी छान दिसत होती .ती जवळ आली मी खूप खुश झालो मी तिला विचारल कि तू कधी आलीस आणि इथे काय करतेस त्यावर ती म्हणाली अहो मला माहित होतं कि तुम्ही इथे असाल तिने चक्क एक गिफ्ट आणलं होत माझ्या हातात देत म्हणाली कि जरा लवकर लवकर उघडा हं.............मी ते उघडलं आणि त्यात एक शाल होती . तिने ती उघडून माझ्या  अंघावर  पांघरली मला म्हणाली आज काळ थंडी पडलीये नवरोबा आता आपण म्हातारे झालो जरा काळजी घ्या .मी हसलो आणि म्हणालो जरा आलो हं........................आणि तिथून निघून गेलो .गजरा घेतला चाफ्याची फुल घेतली आणि तिच्या जवळ परतलो तिने विचारल मला कुठे गेलेलात मी तिच्या हातात  गजरा  आणि फुलांची पुडी दिली ती हसली नुसती आणि लाजलिही थोडी . हे काय वय आहे हे सगळ करायचं मी एक मोठा श्वास घेत तीच्या बाजूला बसलो आणि म्हणालो आपण आपली सगळी कर्तव्य पार पडली गं........ आता वेळ आहे एकमेकाना वेळ देण्याची मग गप्पा मारत आम्ही घरी गेलो तिने मस्त चहा आणि पोह्यांचा बेत आखला खूप दिवसांनी खाल्ले तिच्या हातचे पोहे आणि अगदी मनाला शांती झाली ती येण्याची . मी म्हणालो  ए मी जरा बाहेर जाऊन येतो तू जेवनाच बघ आणि बाहेर पडलो .
                        मला तसा वेळ झाला होता घरातून निघून ती वाट बघत असेल जेवणा साठी हे मित्र भेटले ना मग वेळ कसा जातो काळत नाही . मी घरी आलो ती टीव्ही  पाहत होती तिच्या हातात एक पाकीट दिला तिने ते उघडलं त्यात संघ्याकाळच्या नाटकाची तिकीट पाहून ती हसली म्हणाली दिवसेन दिवस तुम्ही अगदी तरुण होताय . काय हो काय भानगड हं ................छे छे  काही हि काय चल उठ आता कावळे ओरडतायत पोटात माझ्या आणि हं  संध्याकाळचं  जेवण आपण बाहेरच करणार आहोत  . आणि मग आम्ही जेवायला बसलो मी  भाजी चपातीचा एक घास खात म्हणालो अरे हि आज हि तशीच झालीये जशी तू पहिल्यांदा बनवलेलं जेवण जेवलो होतो . आजही सार काही तसाच आहे ना आणि ती तेवढ्यात म्हणाली फक्त वय निघून चालय हो नं.......................
                           थोडा वेळ विश्रांती घेऊन नाटकाला जाण्याच्या तयारीला लागलो तिने आजही मला विचारलं कोणती साडी घालू जसं ती  आधी  विचारायची आणि मी म्हणालो जांभळी ती तयार झाली फक्त एक बाकी होत गजरा मी तो तिच्या केसात माळला  .मी तयारीतच  होतो आम्ही निघालो आणि नाटक आगदी छान झालं . मग थोडा वेळ बागेत गप्पा मारत फिरलो पुण्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा . मग एका छान अशा हॉटेल मध्ये जेवलोही  कुल्फी खाली आणि मग घरी गेलो .
                            आज खूप मज्या आली नं ........ ती म्हणाली हो खरच आज पहिल्यांदा मी तुझ्या  आणि तू माझ्या जवळ असण्याची खरी जाणीव झाली आपण आयुष्याचे इतके दिवस एकत्र घालवले आणि आज वेळ मिळाला  ते आठवायला . तू आलीस आणि माझा सारं जगणंच बदल्ल्स पण आज तुम्ही असं का बोलताय..........
काही नाही  गं.............तू झोप आता थकली हि अशील नं .......... तसं पण वय झालं आपलं अस तूच म्हणतेस नं....................
आम्ही दोघही हसत हसत कधी झोपलो कळलाच नाही  .                                                                        हि होती आमच्या वयातली गोष्ट आणि हो या वयात आपल्या बायकोला जरा जास्त वेळ द्यावा आणि काळजीही घ्यावी तसं  पण मी आणि ती फिरायला चालोय गोव्याला आता तिला गोवा पहायचा आहे तेही माझ्या बरोबर ..............मग काय हा म्हातारा चाला की........................... आपल्या म्हातारीला घेऊन

या या मया या.........................
 या या मया या..........................
या या मया या...........................
या या मया या............................
                                         

चैताली  कदम                             

No comments:

Post a Comment