Wednesday, December 21, 2011

आठवण................तिच्या माझ्या काही क्षणांची

                                                                              
मोठं कॉलेज खूपपपपपप......................मोठा कॅम्पस . 
त्या कॅम्पसच्या कट्ट्या वर बसलेली ती.छान,निरागस,सोज्वळ,नाजूक .हसली नं ..........कि गालावर हळूच एक खळी उमलायची .तिच्या अलगद झुकणाऱ्या पापण्या पाहून जीव आगदी कासावीस व्हायचा .ती मला खूप आवडायची खूप म्हणजे खूप .मी तिच्या ग्रुप मधला एक मित्र .आमच्या दोघांच आगदी छान जमायचं .एकमेकाना फोन कारण ,फिरणं सार काही होत होतं .खर तर तिला मी आणि मला ती आवडायला लागलो होतो .आमच्या दोघांच्या बोलण्यात आपलेपणा,काळजी,आवडी निवडी जपणं,हट्ट पुरवणं आपोआपच येत गेलं .फोनवरच्या त्या बोलण्यात कधी शांत बसून एकमेकांचे श्वास अनुभवणं सामील झाल कळलचं नाही .पण मी त्या शांत पणाची खूप मज्या घ्यायचो.तिचा श्वास आणि तो हवा हवासा शांत पणा खूप आपलासा वाटू लागला होता .तिची खूप आठवण यायची सारख तिच्याशीच बोलावसं वाटायचं आणि मग ठरवल तिला आता विचारायचं तशी गरज नवती म्हणा पण तरी ही .मी एक चिठ्ठी तिच लक्ष नसताना तिच्या ब्यागेत ठेवली .आणि काही फुलं 

प्रिय मैत्रीण ..........

"पिवळ गुलाब आपल्या मैत्रीसाठी जी अचानक .पण खूप जोरदार झाली आणि जिने सततं तुला आणि मला जवळ ठेवल."

"हे लाल गुलाब माझ्या कडून झालेल्या प्रेमा खातरजे अचानक तुझ्या वर जडल आणि ज्याने तुझी ओढ लावली."

"हे पांढरगुलाब माझ्या कडून काही चूक झाली असेल त्या साठी ."

"तुझ काही उत्तर असो पण मी वाट पाहतोय तुझी आपल्या रोजच्या ठिकाणी तूं नक्की ये एका मैत्रीच्या नात्याने तरी ये ."

                                                                                                तुझा मित्र .........

मी जाऊन त्या रोजच्या जागेवर त्या मोगऱ्याचा सडा पडलेल्या बेंच वर जाऊन बसलो हाताची घडी घालून डोळे बंद केले आणि मनात तिचाच विचार चालू होता .ती केंव्हा आली कळलचं नाही माझ्या जवळ आली आणि माझ्या खंद्यावर डोकं ठेवल मी डोळे न उघडताच हसलो आणि मी एक सुखकर श्वास घेऊन तीच्य खंद्यावर हात ठेवला .त्या वेळी माझ्या मनाला एक वेगळा आनंद झाला होता . मी काय करू आणि काय नाही मला काही सुचत नवतं .आम्ही थोडा वेळ तसेच बसून होतो मी तिचा हात माझ्या हातात घेऊन बराच वेळ बसलो एकमेकांना काहीच न बोलता .घरी जवसच वाटत नवतं घड्याळ पाहिलं तर खूप वेळ झाला होता . 
                मी तिला म्हणालो "जाऊया घरी ...." "थांब ना !थोडा वेळ "आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं . "मी खूप वाट पहिली रे या क्षणाची या एकांताची आणि आज तो दिवस आला ."मला थोडा वेळ असचं बसुदेना .प्लीज !" मी हसलो थोडा वेळ बसून नंतर आम्ही निघालो.........तिला घरी सोडून मी ही घरी गेलो आज मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण झोप मात्र नाही आली दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या वेळेत भेटून बाहेर फीरायला गेलो होतो .ती खूप खुश होती. खूप माज्या केली फिरलो जेवलो एकत्र वेळ काढला आज पर्यंत आम्ही अस कधी फिरलोच नवतो .असेच काही दिवस सरले . आणि एके दिवशी अचानक आमच्या मित्राच्या लग्नाची पत्रिका आम्हाला मिळाली तो  आमचा खूप छान मित्र  .तोआम्हाला त्याचे प्रोब्लेम्स सांगायचा .दोन ते तीन दिवसात तो आम्हाला भेटला पण तो खूप अस्वस्त होता . मी त्याला विचारल काय झाला. ती नवती माझ्या बरोबर .मी  आणि तो एका हॉटेल मध्ये गेलो चहा घेण्याच्या बहाण्याने .गप्पा मारताना त्याने विषय काढला त्याच्या होणारया बायकोचं अस म्हणन आहे कि तिला वेगळ रहायचं आहे  त्याच्या आई वडिलां बरोबर नाही तो खूप बेचेन होता या गोष्टीला घेऊन मी त्याला समजावलं तो घरी गेला आणि मी हि परतलो .माहित नाही का मी त्याला समजावल आणि तो निश्चिंत होऊन घरी गेला पण ........... पण माझ्या  मनात तो  प्रश्न एक वेगळी पोकळी करून गेला होता मला वाटत होता कि मी ही हा प्रश्न तिला विचारावा आम्ही संध्याकाळी भेटलो मित्राच्या बहाण्याने मी तो प्रश्न तिला विचारला 

ती :- "त्यात काय चुकलं तिच भांडत बसण्या परीस लांब राहून नाती जपलेली काय वाईट आहे. आणि तस पण येणजाण चालू असणारच न ."
मी :- "पण माझ्या आई वडिलांच  काय त्यांना सोडून कस राहायच ." 
ती :- "मी नाही का राहणार.आरे एकत्र  राहून नंतर भांडणं ही होणारच .मग आधी पासून तयारी करायची आपल घर सावरण्याची ."
मी :-  "घर तोडून.........घर कस सावरतात गं .........!"
ती :- "अरे वेड्या हे आता तुझ्या वर निर्भर आहे . कि तूं या गोष्टी ला  कशा द्र्ष्टीने घेतोयस ."
मी :- "भांडण हि सर्वच घरात होतात तर मग म्हणून वेगळ होण हा एकमेव उपाय का वाटतो तुला ."
ती :- "एकत्र राहून एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टीनची चीड चीड करून मनातल्या मनात एकमेकांच्या बदल घुसमट होऊन  द्वेष करत राहण्या पेक्षा हे बर ."
"पण आपण का हा विषय बोलतोय ."
मी :- "कारण जर अस असेल तर मग मी पण तुझ्याशी लग्न नाही करू शकत ."
सारकाही शांत झाल ती हि शांत झाली .तो आणि ती म्हणता म्हणता मी आणि तू आणि आपण यावर हा विषय जावून थांबला होता .
ती :- "पण अस का म्हणतोस मी तयार आहे तुझ्या आई वडिलां  बरोबर राहायला ."
मी :- "नही.........नको............"
"मला कोणत्याही दबावात किंव्हा जबरदस्तीने तुझ्याशी लग्न नाही करायचं .तुझ्या मनाला न पटता तू स्वतःची घुसमट करत माझ्या आई वडिलां बरोबर राहणार हे मला नाही पटत म्हणून ."
ती :- "प्लीज !अस बोलू नकोस ."
                       
                       तिने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मला काही ऐकायचं नवतं मुळात मी काही हि न बोलता न ऐकता तीथुन निघून आलो तरी हि तिने मला फोन करून मला रस्त्यात भेटून थांबून समजावण्याचा प्रयत्न केला .पण माझ मन मला तिच काही ऐकून घेण्याची परवानगीच देत नवतं .नंतर काही दिवस ती भेटलीच नाही .मग कळालं कि ती खूप आजारी आहे .पण मी तिला बघायला गेलो नाही .आणि काही दिवसातच आम्ही पुण्याला शिफ्ट झालो .
                        आज सार.......... काही ठीक माझ लग्न हि झालं .तीच हि झालं असेल .आशा करतो कि ती जिथे पण असेल तिथे खुश असेल किंबहुना असुदेत .पण एक गोष्ट नक्की जर मी तिच ऐकल  असतं तर............मी आता पुण्यात राहतो खुश पण आहे . बायको पण खुश आहे .पण सोबत आई बाबा नाहीत .वेगळे राहतो याची खंत वाटते . तेंव्हा हि वेगळ असतो आता हि आहोत पण..............कदाचित खूप खुश असतो .सारं काही समजुदार पणे असतं आणि कदाचित माझ्या मनात जी पोकळी निर्माण झाली ती ही नसती .पण जाऊदे जे आहे ते जगायच नाती जपण्याचा आणि तुटलेली नाती जोडण्याचा प्रयत्न करायचा जे झाल ते परत येणार नाही मग जसं उन पडेल तशी पाठ  फिरवायची .
तरी हि आठवण येतेच ...................
आठवण तिची ............तिच्या माझ्या काही क्षणाची.................
पण मी अजूनही अपूर्ण भासतो स्वतः ला .
कधी हि न पूर्ण होणारा  अपूर्ण 


                                                                                                          

चैताली कदम
                                          

2 comments:

  1. धन्यवाद ! प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.

    ReplyDelete