जगताना मी जीवनातला
आनंद जगुन घ्यावे
हसतं जगावे जीवन सारे
दुःख न समजु यावे
खंत नसावी कशाची मज
रहीले काय असावे
निभावली सारी नाती गोती
उरले काय असावे
मरताना मज चेहे-यावरचे
दुःख न कोणा दिसावे
त्रुप्त दिसावे जातान आन
कोनास न काही उमजावे
घडविले ज्यांनी जगण्या करता
उपकार कसे फेडावे
हसतं जगावे आयुष्य आन
दुःख न वाटी यावे
संपले सारे जीवन आता
सुखात मी निजावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.
चैतली कदम
No comments:
Post a Comment