४ थी चा तो वर्ग आम्ही सगळे लहान पणा पासूनचे जिवलग मित्र मैत्रीण आज आमच प्रशस्ती पत्रक मिळणार आहे . मी घाई घाई ने तयारी करत घरातून निघाले . मनात अगदी विचारांची गर्दी झाली होती . पास तर होणार पण ७०% कि ८० % हेच विचार सतवत होते . आणि आता आपण पुढच्या वर्गात जाणार प्राथमिक शाळेतून आता आम्ही सगळेच उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेणार आभ्यास वाडूदे पण मज्या येणार
सगळे माहित नाही माझा ग्रुप पास होईल आणि सगळ्यांना एकाच वर्ग मिळावा अस मनापासून वाटत होत . आणि प्रत्येक वर्षी सारखा सगळे पास हि झाले पण त्यातले माझे दोन मित्र शाळा बदलून जात होते . आम्ही सगळे वैतागलो काय यार हे
शी ssssssss .................... अस का कोणी शाळा बदलून जात .
पण काय करणार त्यांच्या बाबांची बदली झाली . मग तर त्याला जाव लागणारच आणि आमचा ग्रुप २ व्यक्तींनी कमी झाला . पण बाकीचे सगळे कॉलेज पर्यंत सोबत होते आम्ही सगळेच ............ सगळे जन खूप छान सेटल झालो आणि अर्ध्यांची लग्न हि झाली . काही वर्षांनी त्यातला आमचा एक मित्र आम्हाला परत हि भेटला पण दुसऱ्या मित्राचा काही पत्ताच नवता तेंव्हाच्या ४ थी तल्या मुलां कडे कुठे असणार फोन वैगरे . असो पण बाकीचे सगळे आहेत सोबत याचा आनंद आहेच मनात . काही जणांनी स्वतःचा बिजनेस सुरु केला तर काही जण नामवंत कंपनी मध्ये उच्च पदावर काम करत आहेत . आम्ही सगळे जण एकमेकांच्या सहवासात आहोत आणि थोड्या थोड्या दिवसांच्या कालावधी नंतर एकमेकांना भेटतोही . असा विचार मी करताच होते कि...............
फोन ची रिंग वाजली यमु चा फोन होता मी आवडीने उचलला आणि तिने अचानक मला विचारल......................
यमू :- अग तो आपल्या ४ थी च्या ग्रुप मध्ये होता न................
तो सदा त्याच्या बाबांच्या बदली मुले शाळा सोडून गेला ........
तो भेटला होता ........
मी :- अया.........हो ...............
किती दिवसा नंतर तो भेटला न ............
यमू :- अग दिवसा काय वर्षांनी बोल.........
आता आपल्या मित्र मैत्रिणीचा शोध संपला एकदाचा ..........
मी :- एकंदरीत सगळा ग्रुप पुन्हा एकत्र आला ................
पण तो तसाच असेल न म्हणजे त्याचा स्वभाव वैगरे ...............
यमू :- तो अगदी बद्दला आहे पण ओळखता मात्र येतो आम्ही दोघ स्टेशनला भेटलो .
थोडा वेळ एकमेकान कडे पाहतच राहिलो कुठे तरी पाहिलं आहे अस.........
आणि जवळ येऊन यमू तूच न............. मी सदा ४ थी पर्यंत आपण एकत्र शाळेत होतो आणि _ _ _ _ _ _ _ .........
मी हसले हो रे............. माझ्या लक्षात आहे आणि तुला पाहिलं आणि मला सगळ आठवल हि . अस मी म्हणाले
मी :- आपण लक्षात आहोत का ग त्याच्या
यमू :- तो सगळ्यांची नाव वर्णन किंव्हा त्यांच्या बद्दलच्या खुणा सांगून सगळ्यांची माहिती विचारू लागला त्याला हि आपण सगळे जण लक्षात आहोत हे ऐकून खूप बर वाटल
अग तुलाही विचारात होता तो .
खूप वेळा तुझाच विषय काढला त्याने आणि फोन नंबर हि मागत होता पण मला काही सुचेना काहीतरी वेगळच वाटल त्याचं बोलण आणि त्याच्या चेहेऱ्याच्या हावभावा वरून .
मी :- आधी नको देऊस अग आपण भेटू न तेंव्हा मी बघेन ओक .
यमू :- अग हो न म्हणूनच तस पण मला वाटल तूला विचारते त्याला नंबर देऊ कि नको पण खर तर मला त्याच विचारण वेगळाच वाटलं ग................
म्हणून मी त्याला सहज विचारल ........
ए तू लग्न केलस की नाही............
तो नाही म्हणाला पण त्या प्रश्ना नंतर त्याने परत तुझा विषय काढला म्हणून मी विषय बदलत त्याला म्हणले अरे तीच लग्न झाल आणि तिला एक छानस गोंडस बाळ हि आहे आणि हो अरे आम्ही सगळे भेटतोय या रविवारी तू हि भेट न सगळ्यांना सप्राइज देऊया ओके आणि तो विषय टाळला गेला .
मी :- हा हाहा हा हाहा ............
यमू :- वा छान मी इथे काळजीत आहे आणि हि हसते . अग हसतेस काय बोल न
मी :- बर झाल बाई नाही दिलास अग तो आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटलाय काय माहित त्याचा स्वभाव कसा आहे .वागण बोलन कस आहे . आपण भलेही मित्राच्या नात्याने बोलू पण तो कोणत नात घेऊन बोलेल हे कस कळणार आणि या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल काय माहित .
यमू :- हो न ............
मी :- चल जाऊदे या रविवारी आपण भेयू तेंव्हाच बोल ओक काळजी नको करूस मी ठेवते बाय
यमू :- बाय सोन्याला माझा कडून एक गोड गोड पा दे ओक.......... बाय.............
बघता बघता रविवार आला हि......................
माझ्या सासू बाईन मुळे मी माझ्या सोन्याला म्हणजे माझ्या मुलाला सोडून कामाला किंव्हा बाहेर जाऊ शकते . तो त्यांच्या कडे राहतो त्याला हि आजीचा छान लळा लागला आहे . त्यामुळे माझ काम आणि माझ फीरण हि टळत नाही . तसं त्या खूप संजुदार आहेत आणि ह्यांना हि माहित आहे कि आम्ही सगळे फ्रेंड्स महिन्या दोन महिन्याने भेटतो . माझ्या घरातल्यांची काही हरकत नाही याला . आम्ही सगळे आज आमच्या मैत्रिणी कडे भेटणार होतो . पण मला खूप उशीर झाला होता . तितक्यात यमु चा फोन आला
यमू :- अग कुठे आहेस कधी येणार .............
मी :- थोडा उशीर होईल मी येते पण ........................
यमू :- ओक ...............ए ए ए थांब तो सदा बोलायचं म्हणतोय .
मी :- अग त्याला संग मी येतेच आहे . मग बोलूच.........
यमू :- थांब बोल जरा ...........
मी :- हॅलो .................हॅलो.............
तो :- हॅलो............. रत्ना ................रत्ना कशी आहेस तू ...............
मी :- मी ठीक आहे तू .......... तू कसा आहेस
तो :- मी हि ठीक ..........................
(तिचा आवाज ऐकला आणि मन अगदी कासावीस झाल ४ थी मध्ये असताना ती कशी दिसायची आम्ही किती छान मित्र मैत्रीण होतो आणि मी बाकीच्या मित्र मैत्रीणी पेक्षा मी तिच्याशीच माझ्या सगळ्या गोष्टी शेर करायचो तीच माहित नाही पण मी तिला खूप जवळची मैत्रीण मानायचो आणि मी शाळा सोडून गेलो तरी तिला विसरलो नाही . तिचे ते पाणारलेले डोळे गोरी गोरी पान हसली की गालावर खळी पडायची काळे भोर लांब सडक केस किती निरागस होती ती ते दिवस डोळ्या समोरून फटाफट गेले आणि सगळ शांत झाल मी हि )
मी :- बोल न.............का शांत झालास बोल...........
तो :- काही नाही ग .............तू....................तू ये लवकर मी वाट पाहतोय तुझी ...............
मी :- अरे हो पण काय झाल तुला..................... तुझा आवाज का .................
तितक्यात यमुने फोन घेतला .......
यमू :- ए.........तू ये लवकर काय करतेस . थांब ..............थांब जरा..................मी बाजूला येते . अग काय तो इथे कोपऱ्यात येऊन तुझ्याशी बोलत होता सगळे विचारत होते कोणाशी बोलतोय हा . एक तर तो उमेश मागत होता आणि अनू पण मागतेय फोन तू लवकर ये बगू .सगळे गोंधळ घालतायत इथे बोलायला पण देत नाही सरळ ...............फोन खेचतायत सारखा ....
मी :- अग तो खूप शांत झाला बोलता बोलता ........
यमू :- काय............... काय............. बोलीस तू
मी :- जाऊदे नंतर सांगते......बर बाय मी निघते चल
यमू :- बाय
तो खरच शांत झाला बोलता बोलता अस का केल त्याने . तो काय विचर करत असेल काय चालय त्याच्या मनात . मला खूप भीती वाटतेय .
सगळ काम आटपून मी तयारी करून निघाले आणि तिच्या घरी पोहोचले . सगळे मला विचारू लागले का ग का एवढा उशीर केलास कशी आहेस . आणि तो..............तो अजून लांबच उभा फक्त हसत . मी आत गेले . बसले आजून हि तो पाहतच होता माझ्या कडे .
आता तो जवळ आला कशी आहेस अस म्हणून शांत झाला आणि थोड्या वेळाने .........
एवढ्या दिवसा नंतर माझी सर्वात आवडती मैत्रीण मला भेटली . शाळा सोडून गेल्यावर तुला खूप मिस केला ग .
पण आता आता खूप बर वाटतय तुला समोर पाहून . किती उशीर केलास .
मला खूप कस तरी वाटल .तसं हि त्या यमुने माझ्या मनात नकोते भरल्याने मी खूप घाबरले होते आता त्याला कळायलाच हव माझ लग्न झालाय मला एक मुलगा माझा संसार आहे . माझ माझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे मला त्यांचा विश्वास नाही गमवायचा आणि तुझ्या मुळे तर नाहीच नाही मला माझ्या आयुष्यात काही संकट नको हे अस का वागतोय हा .या हेतूने मी फटा फट म्हणले
अरे नाही........... बाबू खेळत होता न.............. आणि पाहुणे पण आले होते .
हे पण नको जाऊ म्हणत होते आधी एकच तर सुट्टी असते त्यात पण तूं बाहेर जातेस .
हे माझ्यावर खूप प्रेम करतात मला समजून घेतात ...................
मलाच वेळ नसतो त्यांच्या साठी ..............
पण त्यांनीच नंतर मला इथे सोडल .
मी म्हणाले आत चला............. सगळ्यांना भेटा....... मग जा............
नको नको परत कधी तरी.............. इंजोय .............
म्हणून गेले निघून .......................
अस म्हणत मी श्वास सोडला .............गप्प झाले थोडा वेळ
तो हसला आणि म्हणाला एक विचारू........................
हो विचार न सदा
माझ्या वागण्यातून काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस.............
तू माझी मैत्रीण आहेस सर्वात आवडती आणि ती ही बाल पणाची म्हणून तुला पाहण्याची तुझ्याशी बोलण्याची हूर हूर लागली होती . म्हणून मी तुझ्याशी बोलायला तुला भेटायला तड फड करत होतो . आपले लहान पाणीचे मित्र मैत्रीण भेटणार हा विचार करून मी भारावून गेलो . माझ्या वागण्या मुळे तुला इतका त्रास होईल वाटल नाही चुकल असेल तर माफ कर मी विचित्र पणा केला ओवररीयाक्ट झालो सॉरी जास्त विचार नको करूस अग......... मी इथे तुम्हा सगळ्यांना माझ्या लग्नच आमंत्रण द्यायला आलोय .
तुझ्या या सगळ काही एवढ्या धडाधड समजून सांगण्या वरून तु माझ्या एकंदरीत वागण्याने माझ्या बदल स्वतः चा गैर समाज करून गेतलास अस वाटल म्हणून हा विषय बोलो
कारण तुझ्या मनात माझ्या बदल चुकीची भावना नको निर्माण व्हायला माझी मैत्रीण मला गमवायची नाही . मला माहित आहे तुझ्या मनात माझ्या बदल काही नाही आणि काही आहे ती फक्त मैत्री आणि माझ्या हि मनात काही नाही तुझ्या बदल .
शांत हो आणि आधी तो घाणेरडा विचार काढून टाक मनातून मंद कशी आहेस तू ........
किती वेगळी दिसतेस ग आणि सुंदर हि तितकीच निरागस ............ पण अजून हि तू तशीच आहेस बारीक जाडी हो जाडी ...........
हो.......तसं ssssss .... तुझ लग्न नसत झाल तर मी विचारल असत तुला लग्ना साठी पण ठीक आहे . मी उशीर केला आणि मी तेंव्हाच विषय सोडला जेंव्हा यमु मला म्हणाली तुझ लग्न झालाय छानसं बाळ हि आहे . आणि तसं पण तुझ तुझ्या नवऱ्या वर खूप प्रेम आहे .कस धड धड म्हणत गेलीस अजूनही ४ थी त असल्या सारख
भारत माझा देश आहे............ म्हणाल्या सारख .
आणि तो हसू लागला ...............त्याच्या त्या हसण्याने मला हि हसू आले .
मी किती चुकीचा विचार केला . माझा बावळट पणा वर मला हसू येत आहे .
नाती आधीच जुळलेली असतात . आणि जोतो आपल नशीब सोबत घेऊन आल असतो .आता बघ न देवाने तुला माझी मैत्रीण बनवल . हे हि नात्यातच मोडत न ..................
आणि माझा गैर समाज दूर झाला आम्ही सगळे जुन्या आठवनीन मध्ये रमलो
घरी आले रात्रीच्या जेवण नंतर झोताना मी यांना हे सांगू कि नको अस वाटल पण मी त्यांना ते सांगितल आणि तेही हसू लागले मला कुशीत घेउन समजू लागले ................
कधी कधी काही माणस आपल्या भावना लपवू नाही शकत आणि ते समोरच्या व्यक्तीला नाही खपत या मुळेच समोरची व्यक्ती त्या व्यक्ती बद्दल चुकीचे अंदाज बांधू लागते पण हे चुकीचे अंदाज बदलू हि शकतात फक्त हे अंदाज एकमेकांशी स्पष्ट करायचे . दोन माणसां मध्ये स्पष्ट बोलण्याच नात किंव्हा पद्धत असते .त्या नात्यात विश्वास आणि सत्यता असते .प्रोब्लेम्स बोलून सुटतात गप्प राहून नाही . आणि बघ ते त्याने केल म्हणून हा गैर समाज दूर झाला नाही तर तू असच चुकीच समजत राहिली असतीस आणि एक प्रामाणिक मित्र गमावला असतास .यमुच्या काही हि भरळण्या मुळे तू घाबरून गेलीस ती काळजी पोटी बोलली पण तू त्याला न पडताळता त्याच्या बदल चुकीचा अंदाज बांधलास . त्याने ते स्पष्ट केल हे ठीक केल . आणि मी हि स्पष्ट करण्यात विश्वास ठेवतो त्यामुळे तुझ्या हि बदल काही गैर समज माझ्या मनात नाही होऊ शकत नाही . हे छोटे छोटे प्रोब्लेम्स तू तुझ्या पद्धतीने हाताळ आणि नाही जमल तर मला सांग ओक
तू न ......................माणसाना ओळखायला शिका बाईसाहेब
ह्यांच्या कुशीत गप्पा मारता मारता कधी झोपले कळालच नाही . आणि परत एकदा शाळेच्या त्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेले .
चैताली कदम
No comments:
Post a Comment