Thursday, October 2, 2014

कातरवेळ

                    सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ . त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळात नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही . एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते ,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ . थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं…… 
                     प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा अनुभव सुधा असु शाकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं . निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले  तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत  हि भावनाही तितकीच तीव्र असते . तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल . 
 तर ……………. तर  ती मिसळली त्या रांगेत जणू  कधी ती दुरावलीच नवती अचनक त्यांचा एक भाग झाली होती . 
माणसाच हि असच काही होत असेल का .………? 
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण  नावाच फेरोमोन पेरत असेलच  न………?
 ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….?  
 ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .

 त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले  
कुठे दुरावलास तू ……………?  
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… ! 
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते  अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……! 
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….? 
 मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
 मला आठवण पडली होती त्याची शाळेतल्या त्या एकमेकाना लपून छपून पाहणाऱ्या प्रेमाची .शिकवणीच्या तासाला माझ्या काडे लापून छपून पाहण्याऱ्या त्या डोळ्यांची . शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ  करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान . आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस . सगळे आता चिडवु  लागले होते  काही गोष्टी घरी हि कळल्या होत्या . अल्लड वय म्हणून घरातल्यांचा  खूप आक्रोष हि सहन करावा लागला . अर्धवट शाळा कशी बंद करणार म्हणून दादा आता सोडायला आणायला येऊ लागला होता .मला काही त्रास होऊ नये आणि  आमचं अस वागण सगळ्यांच्या नजरेत येत आहे हे पाहून माझ्याकडे त्याने  बघण बोलण टाकल होत . फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढाच काळात होत . काही दिवस झाले मी आजारी होते म्हणून सुट्ट्या घेतल्या . वाटल एखादा तरी निरोप येईल मैत्रिणी कडे त्याचा पण तस काही झालं नवतं . उलट कळलं कि तो खूप आजारी आहे . नंतर बरं वाटल्यावर रोजनिशी सुरु झाली अजून अशक्त पणा होताच  पण दहावीच वर्ष त्यात परीक्षा जवळ आल्या मुळे शाळेत जाण गरजेच होत . तो दोन दिवस आलाच नाही . जीव कासावीस झाला खूप काळजी वाटू लागली . आणि तिसऱ्या दिवशी कंटाळत शाळेत गेले तर तो आला होता . पण खूप अशक्त . माझे डोळे पाणावले होते त्याला पाहून आणि त्याचे हि . मग नंतर नंतर आमच बोलणच व्हायचं नाही . असेच काही दिवस गेले आणि शाळेचा निरोप समारंभ जवळ आला . आम्ही खुश होतो . थोड बोलायला मिळेल पण आता परीक्षेसाठी सुट्ट्या मिळणार होत्या म्हणून थोड नाराज ही . आम्ही सगळे सजून निरोप समारंभां साठी आलो . थोड  बोलणं झाल मन शांत झाल . गाण्यांच्या भेंड्या खेळलो , खाऊ खाला , वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना .आज दादा आणायला येणार नवता कारण  मैत्रिणीनी घरी येउन मला न्यायचं आणि सोडायचं मान्य केलं होत . मी त्यांना सांगून थोडा वेळ त्याला भेटायला गेले त्या रोजच्या ठिकाणी  खूप रडले मी त्याला बिलगून आणि तो हि . आज आम्ही काही बोलोच  नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .थोडावेळ थांबून मी निघाले मैत्रिणी सोबत .नंतर काही दिवसानी परीक्षा हि सुरु झाल्या . दहावीचा अभ्यास म्हणून सगळे अभ्यासात मग्न झाले होते .काही दिवसांनी परीक्षा संपली . कसे बसे २ महिने गेले . आणि वेळ आली रिजटची . आम्ही सगळे जमलो एकत्र . वर्गात सगळे पास झाले होते . तो हि आणि मी हि . आम्ही खूप आनंदात होतो . शाळे नंतर आम्ही त्या तळया जवळ भेटलो . आमच्याकडे आजही बोलायला काही नवता फक्त रडून हाल झाले होते . त्याने मला सावरल 
डोळे पुसून मला शांत केलं .
 मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी … मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… पण मी येईन नक्की मला तुझ्या सोबत राहायचं आहे . …………. !
मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल . 

******************************

                            पण ……… पण ………… तो आलाच नाही .मी बरीच वर्ष वाट पहिली त्याची ……तो कुठेतरी दूर निघून गेला होता माझा विचार न करता . मला न सांगता . पण मग माझी हि काही कर्तव्य होती आणि मग माझ माझ्या आई वडिलांना लग्ना साठी नाही म्हणनं कठीण झाल होत .त्यांनी माझ लग्न लाऊन दिलं . स्वसोईने सुशिक्षित , श्रीमंत ,उच्च घराण सगळ्या सुखसोई सवाईने पडताळून दिल्या होत्या . मी खूप खुश आहे तो खूप छान आहे . एक व्यक्ती म्हणून , मित्र म्हणून , प्रियकर म्हणून आणि नवरा म्हणून हि . मला तो खूप खुश ठेवतो .पण आज तुझी आठवण आली . कारण कुठे तरी मी पोखरली गेलीये तुझ्या मुळे . तुझ्या वरच प्रेम मला या कातरवेळी सतत आठवत राहत आणि मला रीत करत जात . रोज दिवेलागणीच्या वेळी मला ओढ लागते ती त्या तळ्याकाठच्या भेटीची 
वाटतं……………वाटतं  आज हि तू माझी तिथेच वाट पाहत अशील  पण हा माझा निवळ गैर समाज आहे . पण आता मला भूतकाळात आणि वर्तमानकाळात गल्लत नाही करायची . माझा नवरा मला खूप जपतो त्याची पत्नी म्हणून मला खूप मान मिळतो . आणि त्याच्या बद्दल माझी हि काही कर्तव्य आहेत  . माला सगळ मागे ठेऊन त्याच्या सोबत पुढे जावच लागणार . आणि मला ते आवढेल . माझी करतवेळ जरी तुझ्या साठी चुकचुकली तरी  कधी ना कधी ती गोड आठवण होऊन माझ्या नवऱ्या साठी हि चुकचुकेल .
आता ………. आता या गोष्टीला पूर्ण विराम लावला पाहिजे . आणि मी ठामपणे तो डबा बंद केला . 


चैताली कदम 

Thursday, September 25, 2014

पुन्हा नव्याने

ती स्थिरावलेली शांतता आणि नुकताच विजुन गेलेला दिवा त्याचा मंद दरवळणारा सुगंध क़ही तरी वेगळाच वाटतं आहे आज ….! 
पण ती शांतता बाहेर जरी स्थिरावलेली असली तरी कुठेतरी खोल ती अस्थिर होती . 
                          आणि आज माझ्या जीवाला चैनंच पडे  ना………  ! आज का असे वाटते आहे . म्हणजे……म्हणजे आज माझ्या मनाचा ठावच लागत नाहीये मला …… ! नक्की काही तरी आहे . पण काय ……. ? आज अगदी नव्याने उमलल्या सारख वाटत आहे .आणि मला आठवली ती संध्याकाळ . ती पहिली भेट .घरी कोणी नवतं सगळे नाटकाला गेले होते. ऑफिसच्या वर्क लोड मुळे मला जायला मिळाल नवत आणि शनिवार सुट्टी असताना हि ऑफिसचा दिवस भरून घरी आले होते . फ्रेश होऊन अशाच धुरकट वातावरणात बसले असता अचानक फोन वाजला अननोन नंबर म्हणून शंकेने फोन उचला .
'' हॅलो……………."
"आभ ………… !"
(आज बऱ्याच दिवसांनी कोणाला तरी माझी आठवण झाली होती ,थोडी दचकून ओळखीचा आवाज एकल्या सारखी . )
 "हो…. बोलते …. ! "आपण कोण …………?"
"मी…………मी…… शेखात बोलतोय आभा ………….!"
(माझे डोळे पाणावले माझा आवाज थरथरत होता . त्या थरथरत्या आवाजातच स्वतःला आवरत मी म्हणाले . )
"हो …………….बोल  नं कसा आहेस तू ……….?"
"मी ठीक आहे ……! तू कशी आहेस ………?"
"मी ही  ठीक ……!   आज इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी काय झाली रे तुला , आणि होतास कुठे इतके दिवस …………. ? नाही नाही वर्ष म्हणावे लागेल ……………. ! ."
"ते मी सांगेनच पण मला भेटायच आहे तुला आभा ………! भेटशील ……? प्लीज नाही नको म्हणूस ………"
"मी हसऱ्या स्वरात हो म्हणाले …पण कुठे …………?"
"मी तुझ्या घरा जवळच्या चौकातच आहे .……… !"
                             आता माझा थकवा नाहीसा झाला होता . पण मी जितक्या सहज हो म्हणाले होते . तितकीच गडबडले होते . इतक्या वर्षांनी तो भेटणार आहे . काय करू आणि काय नको असे झाले होते . पण कसबस आवरलं . 
''अगं……. वेडे तो वाट पाहतोय तुझी किती वेळ लावतेस…………… '' 
मी स्वतःशीच पुटपुटले .घराच दार लाऊन . 
'' कोणी आलं तर बाहेर गेली म्हणून सांगा काकू , आणि चावी द्या'' म्हणत किल्ली शेजारच्या काकून कडे भिरकावली . आणि निघाले तितक्यात त्याचा फोन . मी पटापट जिना उतरत फोन उचला . आणि घाई घाईत चालत राहिले . 
 '' हॅलो……………"
 "निघालीस का ? आभा ………"
" हो ……. कुठे आहेस तू ……………. ?"
" हा काय तुझ्या समोर ………!"
आणि माझ लक्ष त्याच्या कडे गेलं . मी हसले . तो रस्त्या पलीकडे गाडी जवळ टेकून उभा होता . तो रस्ता पार करता करता माझी धडधड वाढत होती .कदाचित त्याची ही तीच परिस्थिती असावी  अचानक लक्षात आल हातातला फोन मी अजून ठेवला नवता आणि त्याने सुधा .मग  स्वतःच्या गोंधळलेल्या मनाला समजावत फोन ठेवला  आणि आम्ही दोघे ही हसू लागलो .शब्द न सापडल्या मुळे पुन्हा तोच प्रश्न नव्याने विचारला त्याने . 
" कशी आहेस………… ?"
"मी ठीक ……!आणि तू ……………?"
"मी ठीक ……….!थोड बोलायच होता तुझ्याशी . इथे कुठे कॉफी शॉप असेल तर जाऊया मस्त कॉफी पीत बोलता पण यईल सविस्तर ."
"हो चालेल ………!"
त्याने माझ्या साठी गाडीच दार उघडून दिलं .आणि मी बसताच गाडीच दार लावल आणि स्वतःच्या जागी जाऊन बसला . त्याने गाडी सुरु केली आमच्या सोबत आता ती जीवघेणी शांतात सुधा प्रवास करू लागली होती . शाळेत वेण्या खेचून त्रास देणारा शेखर आज इतका वेल मँनर भासला मला .गाडीत पूर्ण शांतता पसरलेली आणि आम्ही अधून मधून एकमेकान कडे पाहत फक्त हसत होतो . आता हि शांतात मोडण गरजेच होत . त्याने पुढाकार घेऊन गाडीतल  एफ . म.  लावलं .
"कूच ना कहो………………………कूच भी ना कहो "………………
गाणं लागताच आम्ही दोघ हि हसू लागलो.इतक्या वेळे दर्वत असलेली ती शांतता त्या गाण्याने संपवली होती .

गाडी एका शांत पार्क जवळ येउन थांबली . आम्ही दोघे हि उतरून शांत चालू लागलो . त्याने सुरवात केली .
"आभा आता काय करतेस तू … ? म्हणजे जॉब वैगरे कि आणखीण काही …………… ?"
"हो मी जॉबला आहे ."आणि आवड असल्या मुळे पेपर हँडिक्राफ्ट शिकते आहे ."
"वा वा प्रगती आहे ……."
"हो का तू सांग ………… ?"
"शिक्षणा नंतर मुंबईत राहून काम करायचं ठरवलं .   सो … ! मी पण मुंबईतच जॉब ला आहे . एका नामवंत कंपनी मध्ये इंजीनियर आहे ."
"अच्छा …"अच्छा …" म्हणून इतके वर्ष गायब होतात राजे …!आणि मी इथे वेड्यासारख तुला शोधत होते . "
"काय ……? शोधत होते म्हणजे ……? "(तो थबकला आणि चालता चालता तिथेच थांबला होता . )
"अरे काही नाही रे सहज म्हणाले . चल तू असा थांबलास का मधेच . "(आणि मी वळले पुढच  पाऊल टाकायला तोच त्याने माझा हात पकडला )
" तू सहज नाही म्हणलीस आभा ……. खर सांग ………?"
मी असहाय होऊन मनातलं सगळं धडाधड बोलत गेले . 
"हो शेखर मी खूप शोधल तुला शाळे नंतर . कुठे गायब झाला होतास रे …… ? "तुझ्या मित्रांना विचारलं तर कळलं तू शिक्षणा साठी बाहेर गेलायस . आणि मी निराश झाले . 
वाटलं ………… वाटलं……तुला एकदा तरी सांगायला हवं होतं . मग तू गेला असतास तर चालं असतं तुला हे कळण खूप गरजेच होतं कि …………. कि माझं ………!"
ओठांवर येताच मी शांत झाले.माझ्या पाणावलेल्या डोळ्यां सोबत मी मान खाली घातली .
"आणि …… काय आभा " हेच ना तुझं मझ्यावर खूप प्रेम आहे . पण खरा तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो . "
तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला .
आणि माझ रडूच आवरेना 
"मी खूप शोधलं रे तुला शेखर . खूप शोधलं. माझं राहून गेलं होतं तुला सांगायचं कि तू मला खूप आवडतोस .खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर .मी नाही राहू शकत तुझ्या विना ."
आणि मी त्याला बिलगले .
"हो आभा मलाही तुला हेच सांगायचं होतं …."
 "रडू नको आभा " म्हणत त्याने माझे डोळे पुसले .आणि माझ्या कापाळावर चुंबन घेतलं त्याच्या स्पर्शाने लाजून माझा थरथराट झाला होता .
तितक्यात  पावसाचे काही थेंब आमच्यावर कोसळले . आम्ही जवळच्या एका झाडा खाली उभे राहिलो. त्याची माझ्यावरची स्थिरावलेली नजर माझी धडधड आजून वाढवत होती. आणि पाऊस थांबायच नावच घेईना .झाडातून पडणार ते पावसाचे थेंब आम्हाला थोड थोड भिजवत होते.मी ती स्थिरावलेली नजर आणि शांतता टाळण्यासाठी काही तरी बोलायच ठरवलं .
माझ्या वर किती प्रेम करतोस रे ………… ?
खूप ………….!
म्हणजे किती ……?
ओंजळी पुढे कर …….
मी ओंजळ पूढे करताच त्याने खिशातून बंध मुठ बाहेर काढली आणि माझ्या ओंजळीत उघडली .
माझी ओंजळी आता चोकलेट ने भरली होती. आणि कसली तरी किल्ली माझ्या हातात पडली .
"कसली किल्ली आहे ही " मी क्षण भर भ्रमित होऊन त्याला विचारलं . 
"ते साप्राईस आहे." तो जरा भाव खात म्हणाला .
थांबलेल्या पावसाचा अंदाज घेऊन तो जवळ येताच मी चटकन म्हंटल .
"चल जाऊया पाऊसही थांबला आहे . "
तो हसला थोडा "हो चल . "
गप्पा मारत चालता चालता आम्ही गाडी जवळ पोहोचलो आणि आमच मन एकमेकात कधी गुंतल कळलंच नाही .
''थांब हा " म्हणत त्याने गाडीच दार उघडून एक सुबक नक्षीदार संगमरावरी बॉक्स काढला . 

"हे काय आहे "
"ती मगाशी दिलेली किल्ली याचीच आहे मँडम ."
मी त्याच्या कडे चमकून पाहिलं तर त्याने डोळ्यानेच खुणवलं . 
उघडून पाहते तर त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि अंगठी होती . मला ते साप्राईज खूप आवडल होत . माझ्या चेहेच्यावर आता फक्त आनंदच दिसत होता .
"माझ्याशी लग्न करशील . "
मी लाजून " हो " म्हणाले आणि त्याच्या कुशीत विसावले जितक्या सहज हे होत गेलं तितक्याच सहज आम्ही लग्न बंधनात अडकलो आणि तो रोमांस कुठे तरी हरवून गेला .आता या प्रियकराचा पक्का नवरा झाला आहे . आणि त्याला माझ्या साठी वेळच नाहीये . पण खरतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत . त्याला माझ्यासाठीच काय तर स्वतःसाठी हि वेळ नाहीये . त्याला माझी , आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत . पण त्याला का कळत नाही कि हे  सगळ काही पूर्ण करता करता तो मला खूप मागे सोडून आला आहे .  आणि याच कारणाने दोन दिवसापूर्वी आमच्यात कडाक्याच भांडण झालं . कारण लग्ना नंतर त्याचे आई बाबा अधून मधुन गावी जात असतात त्याकारणाने घरी फक्त आम्ही दोघेच असतो . रात्र भर कंकणी होतीच पण मी दूर लक्ष केलं .कसबस त्याला डबा बनून दिला.माझी विचारपूस करून . 
" बर वाटत नसेल तर नको जाऊस ऑफिसला " असा सल्ला हि दिला . 
"हो ठीक आहे  . "
आणि तो गेला निघून ऑफिसला .
पण अचानक माझी ताबेत खूप खराब झाली . आणि माझं ऑफिसला जाण रद्द झालं मी बराच वेळ घरी अशीच पडून होते . पण या माणसाने  एकही फोन करून विचारल नाही . उलट आता सहन नाही होत आहे ताप पण भरला म्हणून मीच गेले दोन तास त्याला फोने करत होते . मग म्हंटल जाऊदेत उरलेली भाजी पोळी  खाऊन औषध घेऊन गप्प पडून रहाव . आणि मी कधी झोपून गेले ते कळलंच नाही . उठून पाहिलं तर सात वाजले होते . मी तापाच्या गुंगीत बराच वेळ झोपून होते . आता थोडस बरं वाटतय .घाई घाईत फोन चेक केला पण याचा एकही कॉल नावाता . तितक्यात दारावरची बेल वाजली . उठून दार उघडायला थोडा वेळ लागला तर . 
" किती वेळ "म्हणत चीढला . आता माझा पारा चढला होता .आणि माझा तोल सुटला . 
"खर तर मी तुला हे विचारायला हव आहे ………करत काय होतास तू इतका वेळ …? मी  इतक्या वेळा फोन केला उचालास का तू …….?. अरे मला बर नाहीये साधा फोर्मिलीटी म्हणून तरी फोन करायचास…………. अरे घरी कोणी नसत काही बर वाईट झालं तर कस कळवायचं तुला . तूला वेळ आहे का माझ्या साठी ……………. ? सांग ना शेखर ……………. ?  कळतंय का तुला मी काय बोलते.………….? किती घुसमट होत असेल माझी . अरे इनमिन दोन माणसं आपण तरी आपल्यात काही संभाषण नाही . माझ हसणं दूरवलं आहे माझ्या पासून . माझी काय अपेक्षा आहे रे  तुझ्या कडून थोडसं गोड बोलण आणि थोडस प्रेम बस न . पण तुला वेळच नाही माझ्या साठी . तुझ्यात माझ्यात खूप अंतर निर्माण झालाय . माझा शेखर हरवलाय माझ्या कडून .  तो मला वेळ देत नाहये . "
मी सगळी घुसमट त्याच्या वर काढली . पण तो ………………. तो निघून गेला घरातून . मागे न बघता .
                         

                         तितक्यात वाऱ्याची झुळूक आली आणि खिडकी आपटली . माझं आठवणीत गुंतलेलं मन भानावर आलं . पण आज मी खूप खुश आहे . सकाळी त्याने त्याच्या वागण्यातून मला आशर्याचा धाक दिला आहे .भांडणा नंतरच्या दोन दिव्साच्या अबोल्या नंतर का जाने कुणास ठाऊक आज त्याने माझ्या ओठांवरचा तीळ पुन्हा नव्याने अनुभवला . आज इतक्या दिवसांनी जुनी झालेली गोष्ट त्याला परत नवी कशी वाटू लागली आहे . कदाचित ते प्रेम त्याच्या मनाला पुन्हयांदा स्पर्श करून गेलं असावं . त्याचा डोळ्यात काही तरी वेगळाच जाणवलं आज . किती सुंदर असतेना हि भावना अगदी सुखावणारी आपला प्रियकर पुन्हा नव्याने आपल्याला भेटणार ह्याची जाणीव काही वेगळीच असते . तो जेंव्हा मला हे बोलला तेंव्हा त्याच्या चेहेऱ्या  वरची ती चमक पाहण्या सारखी होती  . मी लाजले त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि अचानक अंगात असंख्य विजा कडाडल्या . श्वास जड झाला आणि माझ मन असच हवेत हलके हलके तरंगत राहील . त्या स्पर्शाला धग होती थंडीत कुडकुडनाऱ्या व्यक्तीला हवी असलेली उब . त्या स्पर्शाची जाणीव आता अंगावर शहरा आणून जाते . तितक्यात तो आला काहीस गुणगुणत .
"आभा…… आभा .……. चल आज कुठेतरी फिरायला जाऊया ."
मी चमकून मागे वळून पाहिलं तर स्वारी जाम खुशीत होती . मी पडत्या फळाची आज्ञा समजून तयारी ला लागले . आटपून बाहेर आले तर साहेब गाडीची किल्ली हातात फिरवत शिटी वाजवत उभे होते .अगदी त्या पहिल्या भेटीची जाणीव झाली आज . आम्ही खूप फिरलो . लॉंग ड्राईव म्हणजे नाकी काय हे मला आज कळल . मस्त कँडल लाईट डिनर करून . आईस क्रीम खात समुद्र किनारी गप्पा मारत फिरलो . 

" आभा ……….मला माफ कर  मला कळली आहे माझी चूक . खर तर आपल्यात दुरावा नाही पण मला आजकाल तुला वेळ द्यायला नाही मिळत , आणि मला ते जाणवलं आपल्यातला दुरावा कमी करण्याचा मी थोडा प्रयत्न केला . आणि पुन्हा तुझी अशी घुसमट होऊ देणार नाही याची काळजी घेईन "म्हणत मला मिठीत घेतलं .
आणि मी विसावले त्याच्या कुशीत …………………
 "आज या नवऱ्याचा प्रियकर झालेला मी नव्याने अनुभवला आहे  . "


चैताली कदम  

 

Monday, September 15, 2014

मी आणि माझ करियर

                        

                       ट्रेन प्ल्याटफॉर्मवर लागली होती.ती धावत पळत गर्दीतून रस्ता काढत धक्के खात धडा धड शिड्या उतरत प्ल्याटफॉर्म वरआली आणि तितक्यातच ट्रेन सुटली .पण ऑफिसला उशीर झाल्या मुळे तिने रोज प्रमाणे धावत ट्रेन पकडली .
हुश ...SSSSS असा आवाज काढत दीर्घ श्वास घेतला .आत पाहिलं तर सगळ्या सीट्स फुल
 "आज शनिवार असून हि बसायला जागा नाही "स्वतःशीच ती पुटपुटली .
पलीकडच्या दाराजवळ उभी राहिली .हँड्सफ्री कानाला लाऊन रेडीओ वरची गाणी ऐकत बँगेतील पुस्तक काडून वाचू लागली.गाणी ऐकत पुस्तक वाचनं हि तिची जुनी सवय .परत तिने पुस्तक बंद केलं.आज कसल्या तरी विचारात होती ती .थोडी गाड्बडलेली .त्या पुस्तकाला कवटाळून डोळे मिठून शांत उभी राहिली ते तिचं स्टेशन येई पर्यंत.जनु ते पुस्तकाच्या कुशीत विसावली असावी .स्टेशन आलं तशी ती उतरीली बँगेत पुस्तक ठेवत .मोबाईल रेडीओचा आवाज वाढवला .इकडे तिकडे पाहत सगळं काहीं नव्याने अनुभवत ती ऑफिस पर्यंत पोहोचली तिची हि रोजची सवय रोज नवीन काहीतरी शोधायचं.आज शनिवार असूनही खूप काम होतं .पण तिने ते सहज निभावलं .जवळ जवळ ऑफिस सुटायची वेळ झाली. सगळ्या मैत्रिणी मिळून आज हॉटेल मध्ये पार्टी करणार होत्या .ती पार्टी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची होती .पार्टी इंजॉय केली .आणि परत आपल्या रस्त्याने घरी निघाली गड्बाडलेली ती परत आपल्या मूळ परिस्थितीत आली काही तरी बनण्याचं स्वप्न मनात घेऊन जगत असलेली ती .आज काचेसारखे स्वप्नाचे तुकडे हातात घेऊन जगात होती .चालता चालता तिची पाऊलं एकांतासाठी आपोआपच जवळच्या बागे कडे वळल.बागेत अगदी शांतता होती .सगळी कडे हिरवळ हवेतील गारवा .जागोजागी लावलेल्या दिव्यांनी बाग अगदी उजळून निघाली होती .ती बागेतील बेंच वर जाऊन बसली .


परत शांत अशी स्वतः मधेच अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती नुकतीच रुमालाने डोळे पुसू लागली .स्वतःशीच पुटपुटली मला तो  M.B.A. कोर्स करायचा होता .पण त्या पेक्षाहि  वाईट वाटल  ते बाबांच्या म्हणण्याचं बाबांनी कसला हि विचार न करता मला असं का म्हंटल माझं शिक्षण झाल्यावर मी भावंडाना सांभाळणार नवते का . M.B.A.ची विचार पूस करण्या खातर आम्ही इंस्टीटूट मध्ये गेलो .फी ऐकल्यावर बाबा त्यांना फक्त "हो आम्ही सांगतो तुम्हाला  नंतर "अस म्हणत बाहेर पडले .
मी बाबान कडे पाहिलं तर म्हणाले 
"कसं जमेल आपल्याला" मी म्हणाले "
"बाबा तुमचे ते सर्विस मिळालं ते वापरूयात का ?म्हणताच बाबा 
"नको तुला दिले तर मग माझ्या दोन मुलाचं काय मी ते पैसे फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवणार आहे
तुम्हा सगळ्यांच्या नावावर "
मला हे ऐकून खूप वाईट वाटलं ते पैसे माझ्या साठी खर्च करून मी माझ्या भावंडाना बघणार नवते का ते पुढच्या शिक्षणा साठी तयार होई पर्यंत मी चांगली कमावती झाले असते .आणि ठाम पणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली असते .हे का नाही कळलं बाबांना .असो त्या वेळी बाबांना जे पटल ते त्यांनी  केलं .मला जे पटत ते त्यांनी कराव अशी माझी अपेक्षा हि नवती . फक्त दुख झाल ते त्यांच्या बोलण्याच.आज मी एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कामाला आहे .माझ्या कुटुंबाला आणि माझ्या भावंडाना व्यवस्तीत सांभाळते आहे आणि ते दोघाही आज शिकून एका चांगल्या कंपनीत नोकरी करत आहेत .माझे कष्ट सार्थकी लागले याच विचाराने सुखावले आहे मी आज .आणि मन दाटून आले सकाळी हि याच विचारात होते मी. पण आज दुख होण्या पेक्षा अभिमान वाटतो आहे स्वतःचाच कि आपण इतक्या छान वडिलांच बाळ आहोत. कारण जरी त्यांनी मला ते पैसे त्या वेळी दिले नसले तरी कदाचित त्यांना माहित होता कि मी माझ आयुष  फक्त त्या कोर्सपुर्तच नाहीये . ते जर का नाही झाल तर मी नवीन पर्याय शोधेनच करियर साठी आणि  मी तो शोधलं हि.  माझ लग्न हि झाल . बाबांनी माझ लग्न लावताना कसलाही विचार न करता ते फिक्स डीपॉंजित मध्ये ठेवलेले सगळे पैसे काढून माझ लग्न खूप धूम धाम मध्ये  केल अगदी माझ्या मनासारखं कसलीही उणीव न ठेवता .तेंव्हा मला कळलं बाबा तेंव्हा नाही का म्हणाले होते त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता कि मी काही तरी मार्ग काढेन किंव्हा नवीन पर्याय शोधेन करियर साठी आणि सगळ निट  करेन पण त्यांना ते पैसे माझ्या लग्नाला वापरायचे होते.त्यांच्या आयुष भाराची कमी त्यांनी माझ्या लग्ना साठी वापरली एकही पैसा न ठेवता. त्यातच सगळ आल किती मोठी आहेना हि भावना त्यात माझाच भवितव्य होत आणि त्यांना माहित होता कि मी माझ्या भवंडाना सोडून नाही राहू शकत. आणि अस घडल माझ करियर त्यातून मी कमावलं माझ्या वडिलांचा प्रेम त्यांच्या आयुष्य भाराची कमाई म्हणजे माझ धामधूम मध्ये झालेलं लग्न जे प्रत्येक बाबांचं स्वप्न असता

चैताली कदम 

Sunday, September 14, 2014

वेडा पाउस


वेडा पाउस चिंब भिजून गेला
नकळतच काही आठवणी देऊन गेला 
आठवणी एकत्र खेळलेल्या 
आठवणी एकत्र रुळलेल्या

कधी त्या दप्तरातून शाळेत गेलेल्या
शाळेच्या खिडकीतून पावसात भिजलेला
बाईंच्या खडूत ठळक उमठ्लेल्या
मित्रांच्या डब्यात पोठ भरून वाटलेल्या

मैदानाच्या मातीत धुंद दरवळलेल्या
कँटीनच्या खाउत मनसोक्त रमलेल्या
मधल्या सुट्टीत कल्लोळ मांडलेल्या
ऑफ तासात भेंड्या खेळलेल्या

कधी हसून टपली मारलेल्या
डोळे पुसून समजूत काढलेल्या
खिश्यातल्या चिंचा लपुन खालेल्या
गृहपाठाच्या वह्या उतरून काढलेल्या

शाबासकी मधून हवेत उढलेल्या
बाईंच्या आशीर्वादात प्रगती गाठलेल्या
रिझल्टच्या दिवशी धडधडून उठलेल्या
मित्रांच्या आठवणीत भरभरून जगलेल्या



                    चैताली कदम 

Tuesday, June 11, 2013

परी स्वप्नातली


थंडीच्या त्या धुक्यात मला शोधणारी ती 
मी दिसता क्षणी मला बिलगणारी ती 
धुंद पावसात चिंब भिजणारी ती 
सर होऊन भिजवणारी ती 

फुलांच्या गंधात दरवळणारी ती 
पाखरांच्या रंगात मिसळणारी ती 
इंद्रधनुषातील रंग उधळणारी ती 
दव होऊन चमकणारी ती 

रात्रीच रुपेरी चांदण ती 
पाण्यातील चंद्राच प्रतिबिंब ती 
वसंत ऋतूचा मोहक मोहर ती 
पालवीचा सुंदर बहर ती  

पावसातील हवेचा गारवा ती 
अंगावर येणारा शहर ती 
माझ्यातला मी पणा जपणारी ती 
तासान तास माझ्यात रुळणारी ती 

ती असावी परी माझ्या स्वप्नातली 
बेधुंद होऊन गाणारी 
मनसोक्त नाचणारी 
खळखळून हसणारी 
रिमझिम बरसणारी 

आणि मी 
तिच्यातच विसावणारा बेभान सा वारा 






चैताली कदम